Home » ChandraGrahan : २०२५ सालातले शेवटचे चंद्रग्रहण कधी आहे?

ChandraGrahan : २०२५ सालातले शेवटचे चंद्रग्रहण कधी आहे?

by Jyotsna Kulkarni
0 comment
ChandraGrahan
Share

यावर्षीचा सप्टेंबर महिना खूपच खास ठरणार आहे. एकत्र सप्टेंबरचा पहिला संपूर्ण आठवडा गणपती बाप्पा आपल्यासोबत असणार आहे. तर दुसऱ्या आठवड्याची आणि सोबतच पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणापासून होणार आहे. हो, यंदा २०२५ सालातले शेवटचे चंद्रग्रहण येत्या ७ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातही दिसणार आहे. याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. ज्योतीषशास्रानुसार ग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. सप्टेंबर 2025 मध्ये दोन ग्रहण लागणार आहे.ज्यात एक सुर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण म्हणजे ही खगोलीय घटना असून ती अतिशय मोजक्या वेळेसच घडते. म्हणूनच वैज्ञानिकांमध्ये ग्रहणांना विशेष महत्व असते. (Marathi News)

चंद्रग्रहण म्हणजे काय?
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली चंद्राच्या संपूर्ण प्रकाशाला व्यापते. जेव्हा चंद्र हळूहळू पृथ्वीच्या मागे येतो तेव्हा त्याचा रंग गडद होतो. या रंगामुळे त्याला रेड ब्लड मूनही म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विपरीत दिशेला असतो. चंद्रग्रहणाच्या स्थितीत पृथ्वी सुर्याचा प्रकाशाला चंद्रापर्यंत पोहचू देत नाही. (Todays Marathi Headline)

ज्यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि तो धुसर किंवा लालसर दिसू लागतो. ही घटना केवळ पौर्णिमेला घडू शकते. सप्टेंबरमध्ये लागणारे चंद्रग्रहण या वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण असणार आहे. भारत, चीन, रशिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका आणि अरब देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना हे पूर्ण चंद्रग्रहण सर्वात चांगले पहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)

ChandraGrahan

कधी आहे चंद्रग्रहण?
२०२५ या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. हिंदू पंचांगानुसार, चंद्रग्रहण रविवार, ७ सप्टेंबर रोजी रात्री १०.५९ वाजता सुरू होईल आणि सोमवार, ८ सप्टेंबर रोजी पहाटे ३.२३ वाजता संपेल. एकूण हे ग्रहण सुमारे ३ तास २८ मिनिटे चालेल. भारतीय वेळेनुसार रात्री ९.५८ वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि ८ सप्टेंबर रोजी पहाटे १.२६ वाजेपर्यंत चालेल. या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३.२८ मिनिटे असेल. पूर्ण ग्रहण ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.०१ वाजता सुरू होईल. पूर्ण चंद्रग्रहण रात्री ११.४२ ते १२.४७ पर्यंत असणार आहे. (Top Marathi Headline)

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणाच्या सुतक काळाला खूप महत्त्व आहे. यावेळी चंद्रग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक काळ देखील भारतात वैध असणार आहे. चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुतक काळ सुरू होतो. त्यामुळे यावेळी सुतक काळाची सुरुवात दुपारी १२.५९ वाजल्यापासून होईल आणि रात्री ग्रहण संपेपर्यंत हा सुतक काळ असणार आहे. या काळात धार्मिक कार्य, पूजा आणि शुभ कार्य करण्याचे टाळावे.  (Top Trending News)

=======

Pitrupaksha : ‘या’ तारखेपासून सुरु होतोय पितृपक्ष, जाणून याचे महत्व

=======

चंद्रग्रहणात काय करू नये?
चंद्रग्रहण सुरु असताना पूजा करु नये. देवाच्या मूर्तीला स्पर्श करु नये. जेवण बनवू नये. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणात खास काळजी घ्यावी घरातून बाहेर पडू नये अशी धार्मिक मान्यता आहे. मंदिरांचे दरवाजे नियोजित वेळेपूर्वी बंद केले जातील आणि धार्मिक कार्यक्रम देखील सुतक कालावधी संपल्यानंतरच होतील. या काळात पूजा, होम यांसारखे कोणतेही धार्मिक विधी करू नये. या काळात तीक्ष्ण हत्यारे वापरू नका असा सल्ला देण्यात आला आहे. चंद्रग्रहणाची सुरुवात भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. पितृपक्ष देखील या दिवसापासून सुरू होतो. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, सुतक काळ सुरू होण्यापूर्वी पौर्णिमा श्राद्ध आणि पितृ कर्म करावेत. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.