Home » Mohammed Yunus : संतापजनक…बांगलादेशात हिंदूंवर जिझिया कर….

Mohammed Yunus : संतापजनक…बांगलादेशात हिंदूंवर जिझिया कर….

by Team Gajawaja
0 comment
Mohammed Yunus
Share

भारतामध्ये औरंगजेबानं 1679 मध्ये बिगर मुस्लिम नागरिकांकडून जिझिया कर वसूल करायला सुरुवात केली. भारतातील हिंदूंकडून हा कर इस्लामिक राज्यात राहण्याची परवानगी देण्याच्या बदल्यात घेतला जात असे. यामागे औरंगजेबाचा उद्देश इस्लामचा प्रचार करणे आणि हिंदू धर्म कमकुवत करणे हा होता. आता असाच उद्देश ठेऊन पुन्हा जिझिया कर हिंदूंकडून वसूल करण्यात येत आहे. आपल्या शेजारी असलेल्या बांगलादेशातील हिंदूंना हाच जाचक जिझिया कर द्यावा लागत आहे. बांगलादेशच्या सध्याच्या सरकारची सहयोगी संघटना असलेल्या जमात-ए-इस्लामने, बिगर-मुस्लिमांना समान हक्क हवे असतील तर त्यांना जिझिया कर भरावाचलागेल लागेल असा आदेश जाहीर केला आहे. हा कर हिंदूंकडून वसूल केला जात असतांना याबाबत तेथील मोहम्मद युनूस सरकार मात्र गप्प बसून आहे, त्यामुळेच नोबेल पुरस्कार प्राप्त युनूस यांचा या जिझिया कराला पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. (Mohammed Yunus)

भारताचा एकेकाळी मित्र असलेला बांगलादेश इस्लामिक देश म्हणून वाटचाल करत आहे. या देशातील हिंदूंना सध्या नरकयातना म्हणजे काय, याचा अनुभूव होत आहे. बांगलादेशात शेख हसीना सरकारच्या काळात 2013 मध्ये जमात-ए-इस्लामीवर बंदी घालण्यात आली होती. त्याच जमात-ए-इस्लामच्या ताब्यात आता अवघा बांगलादेश आला आहे. शेख हसीना यांची उलथवून टाकल्यावर मोहम्मद यनूस यांचे अंतरिम सरकार बांगलादेशात आले आहे. (International News)

अंतरिम सरकारने 28 ऑगस्ट 2024 रोजी जमात-ए-इस्लामवरील बंदी उठवली आणि संपूर्ण बांगलादेश कट्टरवाद्यांच्या हाती गेला आहे. सुरुवातीला जमात-ए-इस्लामनं बांगलादेशातील तमाम हिंदू मंदिरांना लक्ष केलं. अगदी छोट्यांपासून ते मोठ्या मंदिरांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. बांगलादेशातील हिंदू मुलींनाही लक्ष कऱण्यात आलं. जमात-ए-इस्लामच्या अनेक कार्यकर्त्यांनी हिंदू मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या सर्वांची कुठलिही नोंद पोलीस दरबारी नाही, आणि संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली नाही. आता या सर्वात जमात-ए-इस्लामनं पुढचं पाऊल टाकले आहे. या संघटनेनं बांगलादेशाच्या विकासामध्ये आणि आर्थिक घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणा-या हिंदू समाजावर जिझिया कर लादला आहे. यामुळे बांगलादेशातील हिंदू समाजामध्ये संतापजनाक प्रतिक्रीया उमटत आहेत. (Mohammed Yunus)

बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात, देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल असल्याचा उल्लेख होत आहे. बांगलादेशमध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी सुरुवातीपासून जमात-ए-इस्लामी प्रयत्नशील आहे. मात्र शेख हसीनांनी या संघटनेवर बंदी घातली होती. पण आता या संघटनेच्या हाती देश गेला असून जमातला पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचाही पाठिंबा असल्यानं बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार वाढले आहेत. या सर्वात येथील युनूस सरकारने मौन बाळगल्यानं युनूस मोहम्मद यांचा या जिझिया कराला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे मानले जात आहे. (International News)

सध्या बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामीने 1 ऑगस्ट 2025 पासून हिंदू आणि गैर-मुस्लिमांकडून जझिया वसूल करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी 25 जुलै रोजी जमातचे प्रमुख डॉ. शफीकुर रहमान मुस्लिम जकात देतात तसाच गैर-मुस्लिमांनाही हा कर भरावा लागेल, अशी जाहीर घोषणा केली होती. शिवाय बांगलादेशातील सर्व समुदायांना समान हक्क हवे असतील तर हिंदू आणि गैर-मुस्लिमांना जिझिया कर भरावा लागेल असे सांगितले होते. जमात-ए-इस्लामनं यापूर्वीही बांगलादेशामधील हिंदूंवर अत्याचार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. जमात-ए-इस्लामीचा इतिहास बांगलादेशातील वाद आणि क्रूरतेशी जोडलेला आहे. 1971 च्या मुक्तीयुद्धादरम्यान, जमात-ए-इस्लामनं पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यानंतर पाकिस्तानी सैन्यासह बंगाली नागरिकांचे हत्याकांड घडवून आणले. यात हिंदू नागरिकांची संख्या अधिक होती. हजारो महिलांवर अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळेच आता बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामचे वाढते वर्चस्व पाहून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Mohammed Yunus)

=========

North Korea : जन्मलेलं मुलं देशद्रोही, या देशाचे नियम म्हणजे…

=========

मोहम्मद युनूसच्या सरकारच्या काळात बांगलादेशातील हिंदूंची स्थिती बिकट होत चालली आहे. 5 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात पळून आल्या आणि बांगलादेशमध्ये अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार आले. आता हे सरकार कट्टरपंथीयांच्या हातचे बाहुले असल्यासारखे काम करत असल्याचे या जिझिया करावरुन स्पष्ट झाले आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.