गणेश चतुर्थी चालू असल्याने सगळ्यांचाच उत्साह भरभरून वाहत आहे. गणेशोत्सव म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण. या उत्सवाच्या निमित्ताने सर्वच भक्तांचे विविध गणेश मंदिरांमध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे सुरु असते. अष्टविनायक गणपतींचा महिमा काय तो वर्णावा. महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायक गणपतींचे एक वेगळेच महत्व आणि वेगळेच स्थान प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात आहे. त्यामुळे अनेकदा लोकं या अष्टविनायक गणपतीची यात्रा करतात. मात्र गणेश चतुर्थीमध्ये या अष्टविनायकांच्या दर्शनाचे महत्व अधिकच असते. त्यामुळे या काळात अष्टविनायकांचे दर्शन घेतले जाते. आज आपण याच आपल्या अष्टविनायक यात्रेतला चौथा गणपती पाहणार आहोत. हा चौथा गणपती आहे, रांजणगावचा महागणपती. गणेशाचे स्वयंभू स्थान असलेल्या या गणपतीची महती देखील खूपच खास आहे. (Ganesh Chaturthi)
रांजणगांवच्या महागणपतीचे मंदिर पेशवेकालीन असून पेशव्यांचे सरदार किणे यांनी ते बांधले असे सांगतात. मात्र गर्भगृह थोरले माधवराव पेशवे यांनी बांधले. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे द्वार प्रचंड मोठे असून द्वारातच जय विजय यांच्या मूर्ती आहेत. दक्षिणायनाच्या काळात सूर्याची किरणे मूळ मूर्तीवर पडावीत अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम केले गेले आहे. मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे, तर शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकामास इनामाच्या स्वरूपात मोठे साहाय्य केले आहे. माधवराव पेशव्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले. (Ashtavinayak)
रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. मूळ मूर्तीला “महोत्कट’ असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाद्रपद महिन्यात सहा दिवसांचा विशेष उत्सव साजरा केला जातो. यामध्ये गणपतीला पाचव्या दिवशी महानैवेद्य दाखविला जातो. या दिवसात फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये गणपतीची मिरवणूक काढली जाते. (Todays Marathi Headline)
सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की ही मूळ मूर्ती नाही. मूळ मूर्ती तळघरात लपवून ठेवलेली असून ती भुयारात आहे. मूळ मूर्ती दहा सोंड आणि वीस भुजा असलेली आहे. मंदिराच्या आवारात आजही जुन्या मंदिराचे खांब दिसतात. जुने मंदिर ९ व्या व १० व्या शतकात बांधले गेले होते असे पुरावे उपलब्ध आहेत. या स्थानाचे महात्म्य असे की या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान महादेवांनाच गणेशाचा वर मिळाला. (Latest Marathi News)
पौराणिक कथा
आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले आणि मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले.(Top Trending News)
त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली आणि त्याला सांगितले, “यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. पुढे त्रिपुरासुर आणि शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने “प्रणम्य शिरसा देवम्’ या श्लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला “त्रिपुरी पौर्णिमा’ म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते. (Top Stories)
========
Gauri Puja : गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्व
Ashtavinayak : अष्टविनायकांमधील तिसरा गणपती- सिद्धटेकचा सिद्धिविनायक
=========
रांजणगाव येथील महागणपतीला कसे पोहोचायचे?
पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे.
रांजणगाव, ता. शिरूर,पुणे : पुणे-नगर महामार्गावर पुणे-वाघोली-शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे २१ किलोमीटरवर तर पुण्यापासून ५० किलोमीटरवर आहे.
शिरूर आणि पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी एसटीची सोय आहे, तसेच नगरमार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावला उतरता येते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics