Home » Ganesh Chaturthi : प्रथम पूजेचा मान गणपतीला का दिला जातो?

Ganesh Chaturthi : प्रथम पूजेचा मान गणपतीला का दिला जातो?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ganesh Chaturthi
Share

अवघ्या काही तासातच गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. वर्षभर आपण बाप्पाच्या आगमची आतुरतेने वाट बघत असतो. अखेर सगळ्यांचा लाडका बाप्पा आता येणार असून दहा दिवस बाप्पामय असणार आहे. यंदाची चतुर्थी तिथी २६ ऑगस्ट दुपारी ०१:५४ वाजेपासून २७ ऑगस्टला दुपारी ०३:४४ वाजेपर्यंत आहे. २७ ऑगस्टला सकाळी ११:१२ ते दुपारी १:४४ या दरम्यान गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा उत्तम मुहूर्त आहे. म्हणजेच काय तर यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होईल आणि ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालेल. गणपती बाप्पा म्हणजे १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती आहे. त्याला आवाहन केले असता सगळी विघ्ने दूर होतात. सुखकर्ता आणि दुःख हर्ता म्हणून गणेशाची ओळख आहे. याच गणेशशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्तीस जात नाही. लहान किंवा मोठ्या कोणत्याही कामाची सुरुवात आधी गणेशाच्या नावाने केली जाते. (Ganesh Chaturthi)

गणेश हा ओंकारस्वरूप आहे. त्यामुळे सर्व धार्मिक आणि मंगल कार्यांमध्ये त्यास अग्रस्थान दिले आहे. तसेच गणेशापासूनच सर्व देवतांची उत्पत्ती झाली, असे अथर्वशीर्षात सांगितलेले आहे. त्यामुळे गणेशास ‘आदिदेव’ असेही म्हणतात. आदिदेव असल्यामुळे गणेशाचे स्मरण सर्वप्रथम करतात. आणखी खास बाब म्हणजे पुराणांमध्ये गणेशाची सर्व देवतांनी स्तुती केलेली आढळते. पद्मपुराण सृष्टिखंडानुसार, माता पार्वतीच्या वरदानानुसार गणेशास हा मान प्राप्त झालेला आहे. गणपतीने मातापित्यांची केलेली सेवा हे त्याचे मुख्य कारण. पद्मपुराणानुसार, सर्वप्रकारची तीर्थस्नाने, दान, यज्ञ, व्रते इत्यादी मातापितापूजनाच्या सोळाव्या भागाची देखील बरोबरी करू शकत नाहीत. गणेशास दिलेल्या प्रथमपुज्यच्या मानाची एक कथा देखील सांगितली जाते. (Todays Marathi Headline)

Ganesh Chaturthi

एकदा काय झाले, अग्रपूजेचा मान कोणाला मिळावा यासाठी देवांमध्ये वाद सुरू झाला. सगळे देवदेवता हा वाद घेवून महादेवाकडे गेले. शंभोमहादेवांनी सगळ्यांचे बोलणे ऐकून घेतले आणि एक स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्व देव-देवता तयार झाल्या. शंभोशंकर म्हणाले, सर्व देवतांपैकी जो कोणी विश्व प्रदक्षिणा करून सर्वात आधी परत पोहोचले त्यालाच अग्रपूजेचा मान मिळेल. सर्व देवता तयार झाल्या आणि आपआपले वाहन घेवून निघाल्या. सगळ्या देवतांची एकच धावपळ सुरु होती. (Latest Marathi News)

गणपती हे सगळे काही पाहत होता. आता त्याचे वाहन होते उंदीर. त्याने विचार केला आपल्याला ही धावपळ जमणार नाही. तो एका जागी बसला आणि विचार करु लागला. बुद्धीची देवता म्हणजे गणपती. त्याला एक छान कल्पना सुचली. शिवशंकर म्हणजे जगाचे निर्माते, हे विश्व त्यांचे प्रतिबिंब आहे. हा विचार मनात येताच गणपती उंदरावर आरुढ झाला आणि त्याने शिवशंकराला प्रदक्षिणा घातली. (Top Marathi Headline)

हळूहळू सगळे देव प्रदक्षिणा घालून परत येवू लागले. त्यांनी पाहिलं गणपती आधीच शिवशंकरासमोर बसलेला आहे. महादेवांना आश्चर्य वाटलं, गणपती कुठेच गेला नाही. सर्व देवता विश्वप्रदशिक्षिणा करून परत आल्या. त्यांनी गणपतीला विचारले, ‘गणराया तू विश्वपरिक्रमा करायला गेला नाहीस?’ तेव्हा गणपती म्हणाला, ‘मी परिक्रमा करुन परत आलो.’ देवगण म्हणाले, ‘हे कसं शक्य आहे? तू आम्हाला दिसला नाहीस.’ (Top Trending News)

=========

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?

=========

तेव्हा गणपती म्हणाला, ‘सर्व विश्व शंभोमहादेव यांच्यात सामावलेलं आहे. त्यामुळे त्यांना प्रदक्षिणा घालणे हीच विश्व परिक्रमा आहे.’ देवतांना गणपतीचे बोलणे पटले कारण तो जे काही बोलला ते निर्विवाद सत्य होते. अखेर सगळ्यांनी बिनविरोध गणपतीला स्पर्धेचा विजेता केलं आणि तेव्हापासून प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.