Home » Atharva Sudame : सोशल मीडिया स्टार असलेला अथर्व सुदामे किती पैसे कमावतो?

Atharva Sudame : सोशल मीडिया स्टार असलेला अथर्व सुदामे किती पैसे कमावतो?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Atharva Sudame
Share

सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे कमालीचा चर्चेत आला आहे. कायम आपल्या मजेशीर रिल्समुळे अथर्व नेटकऱ्यांच्या चर्चांमध्ये असतो. तरुणाईच्या तर तो गळ्यातील वाटेतच बनला आहे. मजेशीर रिल्स टाकण्यासोबतच तो आपल्या रिल्समधून सामाजिक संदेश देखील देत असतो. नेहमीच त्याचे रिल्स व्हायरल होत असतात. अथर्व त्याच्या मित्रांसोबत, पत्नीसोबत विविध रिल्स शेअर करत असतो. त्याची लोकप्रियता एवढी जास्त आहे की, कलाकार देखील त्याच्या चित्रपट, मालिका, नाटक यांचे डिजिटल प्रमोशन करताना अथर्वसोबत रिल्स तयार करतात. (Marathi News)

मात्र आता अथर्व त्याच्या रिल्समुळे नाही तर त्याच्या एका वादामुळे सगळीकडे गाजत आहे. आपल्या कॉमेडी रिल्समधून अथर्व लोकांना भेटत असतो. त्याचे रिल्स देखील कायम व्हायरल होत असतात. सध्या अथर्व एका वादामुळे प्रकाशझोतात आला असून, त्याच्यावर चहुबाजूनी टीका होत आहे. गणेशोत्सवानिमित्त अथर्वने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमधून त्यानं हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला. मात्र, या व्हिडिओवरून मोठा गोंधळ निर्माण झाला. अशातच त्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला आहे. (Top Marathi Headline)

स्टार सेलिब्रिटी असलेला अथर्व एक मोठी पर्सनॅलिटी आहे. सुरुवातीला फारसा प्रतिसाद नसणाऱ्या अथर्वच्या व्हिडीओला त्यांच्या कंटेन्टने खरी ओळख मिळवून दिली. कंटेन्ट तयार करणे ही अर्थवची खासियत असली तरी त्याने रिल्समध्ये अभिनय करण्यासाठी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहेत. २०१५ सालापासून अर्थवने व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. अथर्वचे इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर फेसबुकवर ३३७ हजार फॉलोवर्स आहेत. पण त्याच्या आशयपूर्ण आणि विनोदी रील्समुळे तो तरुणाईत आणि सर्व वयोगटातील लोकांमध्ये लोकप्रिय झाला. तो फुल टाईम कंटेन्ट क्रियेटर आहे. अथर्व त्याच्या याच कन्टेन्ट क्रिएशनमधून भरपूर पैसे कमावतो. (Latest Marathi Headline)

Atharva Sudame

अथर्व अनेकदा विविध टेलिव्हिजन शोमध्ये देखील दिसत असतो.अथर्व चित्रपट आणि जाहिरातींमध्येही झळकला. अथर्वने बॉईज ४ या चित्रपटातही झळकला. याशिवाय तो जाहिरातींमध्येही काम करताना पाहायला मिळाला. अशातच का टीव्ही शोमध्ये त्याला त्याच्या कमाईबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्याने या प्रश्नावर अतिशय प्रामाणिकपणे उत्तर दिले. ‘झी युवा’च्या एका कार्यक्रमात अथर्वला कमाईबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्याने उत्तर देताना म्हटले की, “माझा जो काही हिशोब आहे तो सर्व माझी बायको, आई-वडील, माझे मित्र हेच बघतात. मी बघत नाही. त्यामुळे मी एक ठराविक आकडा सांगू शकत नाही. म्हणून मी किती कमावतो याबद्दल सांगू शकत नाही. मी फुल टाइम कॉन्टेन्ट क्रिएशन करु शकतो. माझं लग्न झाले आहे. तरी देखील मी हे काम पूर्ण वेळ करु शकतो. लग्न झाल्यानंतर जबाबदारी असतानाही मी पूर्ण हे काम करु शकतो इतके पैसे मी कमावतो”. (Top Trending News)

दरम्यान अथर्व सुदामेने सध्या त्याच्या वादावर एक माफीनामा देखील शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत माफी मागितली. त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली. तो यात म्हणतो, ‘काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती, ती मी डिलीट केलीये. बरेच लोक नाराज झाले, त्यांना ती व्हिडिओ आवडली नाही. तर, माझा अजिबात असा उद्देश नव्हता की, कोणाला दुखवायचं, कोणाच्या भावना दुखवायच्या. मी आतापर्यंत खूप व्हिडिओ असे केले आहेत जे आपल्या हिंदू सणांवर आहेत, मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत.’ (Top Stories)

==========

Atharva Sudame : ‘त्या’ व्हिडिओ प्रकरणी इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेचा माफीनामा

==========

‘मला असं वाटत नाही की, माझ्याएवढं कोणत्याही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने आपल्या या सणांवर, संस्कृतीवर व्हिडिओ केले आहेत. त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असा कोणता उद्देश नव्हता की, कोणाला दुखवावं किंवा काय. पण तरीही, जर तुम्ही दुखावला असाल तर माफी मागतो.’ असं अथर्वने पुढे म्हटलं आहे. मात्र अथर्वच्या या व्हिडिओनंतर त्याच्यावर सर्वच टीका करत त्याला ट्रोल करत आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.