Home » Ashtavinayak : अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती – मयुरेश्वर गणपती

Ashtavinayak : अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती – मयुरेश्वर गणपती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ashtavinayak
Share

आज महाराष्ट्राचा महाउत्सव असणाऱ्या गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा सगळ्यांनाच असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी आनंदात गणेशाचे आगमन होते. कोणाच्या घरी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस बाप्पांचा पाहुणचार केला जातो. याच गणेशोत्सवाच्या काळात गणपती मंदिरांना देखील जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. या उत्सवात भाविक जवळच्या, प्रसिद्ध गणपती मंदिरांमध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेतात. महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपती संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. गणेश उत्सवाच्या काळात या मंदिरांमध्ये भक्तांची तोबा गर्दी असते. (Marathi)

गणपतीच्या या अष्टविनायकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. अष्टविनायकांमध्ये मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा श्री चिंतामणी गणपती, सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्र्वर, लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज, महडचा वरदविनायक आणि पालीचा श्री बल्लाळेश्वर या गणपतींचा समावेश होतो. आजपासून गणेश उत्सवाची सुरुवात होत आहे, त्याच पार्श्वभूमीवर आपण अष्टविनायकांमधील प्रत्येक गणपतीचे महात्म्य दररोज जाणून घेणार आहोत. आज आपण अष्टविनायकांमधील पहिला गणपती असणाऱ्या मयुरेश्वर गणपतीची महिती जाणून घेऊया. (Ganesh Chaturthi)

अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. मयूरेश्वर गणपतीला ‘मोरया’ या नावाने देखील ओळखले जाते. पुण्यापासून ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगाव या गावात कऱ्हा नदीच्या काठावर हे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या परिसराला भूस्वनंदा या नावाने सुद्धा ओळखले जाते. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात या मंदिराच्या दर्शनाने केली जाते. (Marathi News)

=========

Lalbaugcha Raja : ‘लालबागचा राजा’ गणपतीची सुरुवात कशी झाली?

=========

Ashtavinayak

मयूरेश्वर गणपतीची कथा
मयूरेश्वर गणपतीची कथा प्राचीन पुराणांमध्ये आढळते. यानुसार, देवी पार्वतीने बाल गणेशाची निर्मिती केली होती. बाल गणेशाने देवांना त्रास देणाऱ्या सिंधू राक्षसाचा पराभव करण्याचे ठरवले. सिंधूचा वध करण्यासाठी गणपतीने मोरावर आरूढ होऊन युद्ध केले. या युद्धात सिंधूचा पराभव झाला आणि गणपतीने विजय प्राप्त केला. त्यामुळेच या गणपतीला मयूरेश्वर गणपती असे नाव पडले. (Todays Marathi Headline)

मान्यता आहे की, त्रेतायुगात भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी उमाच्या पोटातून गणपतीचा जन्म झाला आणि त्याचे नाव गुणेश ठेवण्यात आले. त्रेतायुगात गणपतीचे वाहन मोर आहे त्याचे वर्णन पांढरे आहे आणि तिन्ही लोकांमध्ये तो मयुरेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्याला सहा हात आहेत. या अवतारात गणपतीने सिंधू नावाच्या राक्षसाचा नाश केला आणि ब्रह्मदेवाच्या कन्या सिद्धी आणि रिद्धी यांच्याशी विवाह केला. (Marathi Latest News)

दुसऱ्या एका कथेनुसार, दैत्य राजा सिंधूच्या अत्याचारापासून देवांना मुक्त करण्यासाठी गणेशाने मयुरेश्वराचा अवतार घेतला. त्यांनी माता पार्वतीला सांगितले की, विनायक या राक्षस राजा सिंधूचा वध करीन. मग आई-वडिलांच्या आशीर्वादाने मोरावर बसून गणपतीने सिंधू राक्षसाच्या नाभीवर हल्ला करून त्याचा अंत केला आणि देवांना विजय मिळवून दिला. म्हणून त्यांना ‘मयुरेश्वर’ हे नाव पडले. (Top Trending News)

मोरगावचे मयूरेश्वर गणपती मंदिर साधारणतः १४व्या शतकात बांधले गेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून, काळ्या दगडांनी बनवलेले आहे. मोरगाव हे गाव पुण्यापासून ५५ किमी अंतरावर करहा नदीच्या काठावर आहे. मयुरेश्वर मंदिराला बुरुज आणि उंच दगडी भिंती आहेत. मंदिराला चार दरवाजे आहेत जे चार युग सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यांचे प्रतीक मानले जातात. नंदी बैलाची मूर्ती, शिवाचे वाहन, मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्थापित केली आहे, ज्याचा चेहरा गणपतीच्या मूर्तीकडे आहे. मंदिराच्या सभोवताली चारही दिशांना छोटे छोटे प्रवेशद्वार आहेत, ज्याला ‘गड’ म्हणतात. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. (Latest Marathi Headline)

Ashtavinayak

मंदिराच्या गर्भगृहात गणेशाची मूर्ती विराजमान आहे, ज्याच्या डाव्या सोंडेसह दोन हात आहेत आणि मूर्तीवर नाग, चक्र, कमळ आणि मोर कोरलेले आहेत. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. मोरगाव हे नाव मोर या पक्ष्यावरून पडल्याची कथा सांगितली जाते. एक काळ होता जेव्हा ही जागा मोरांनी भरलेली होती. काही प्राचीन दंतकथांनुसार, एकदा भगवान शिव आणि नंदी या मंदिर परिसरात विश्रांतीसाठी राहिले होते. नंदीला ही जागा इतकी आवडली की त्याने तिथून जाण्यास नकार दिला आणि इथेच राहिला, तेव्हापासून त्याचा पुतळा येथे बसवला आहे. शिवाचा नंदी आणि गणपतीचा उंदीर, दोन्ही मंदिराचे संरक्षक म्हणून येथे उपस्थित आहेत. (Top Marathi Headline)

मोरेश्वराचे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गावातील लोकांच्या माहितीनुसार सुरुवातीला ही मूर्ती आकाराने लहान होती, परंतु त्यावर अनेक दशके सिंदूर लावल्यामुळे ती आता खूप मोठी दिसते. अशीही एक धारणा आहे की भगवान ब्रह्मदेवाने स्वत: ही मूर्ती दोनदा पवित्र केली आहे, ज्यामुळे ती अविनाशी झाली आहे. (Top Stories)

=========

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?

Ganesh Chaturthi : गणपतीची मूर्ती घरी आणताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

=========

अष्टविनायक यात्रा करणार्‍या भक्तांसाठी मोरगाव हे पहिले स्थान आहे. या मंदिराला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुद्गल पुराणातील २२ व्या अध्यायात मोरगावच्या महानतेचे वर्णन केले आहे. गणेश पुराणानुसार मोरगाव हे गणपतीच्या ३ मुख्य आणि सर्वात महत्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. लोकांच्या श्रद्धेनुसार, मयूरेश्वर गणपतीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भक्तांना जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते.(Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.