Home » Trinetra Ganesha Temple : भारतातील सर्वात प्राचीन गणेश मंदिर !

Trinetra Ganesha Temple : भारतातील सर्वात प्राचीन गणेश मंदिर !

by Team Gajawaja
0 comment
Trinetra Ganesha Temple
Share

भारतात कुठलेही धार्मिक कार्य करायचे असेल तर आधी बुद्धीची देवता म्हणून वंदनीय असलेल्या श्री गणेशाची पूजा केली जाते. याच गणरायाच्या भारतालील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर राजस्थानमधील एका किल्ल्यात आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध रणथंभोर किल्ल्यामध्ये असलेले हे श्री गणेश मंदिर त्याबाबतच्या अनेक आख्यायिकांनी देशभर प्रसिद्ध आहे. हे मंदिर त्रिनेत्र गणेश मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे तीन डोळ्यांच्या गणरायाची पूजा केली जाते. येथे भगवान गणेशाच्या तिसऱ्या डोळ्याला ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. या मंदिरात भगवान गणेशासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब विराजमान आहे. येथील भगवान गणेशाची मूर्ती स्वयंभू असल्याची आख्यायिका आहे. (Trinetra Ganesha Temple)

या मंदिरात भाविक शुभ कार्याचे पहिले निमंत्रण पत्र गणेशजींना देतात, हे पत्र भगवान गणेशांना वाचून दाखवले जाते. यानंतर या कार्यात साक्षात भगवान गणेश उपस्थित रहातात, अशी भाविकांची धारणा आहे. भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या या गणेश मंदिराची निर्मिती 1300 मध्ये राणा हमीर यांनी केली. आज राजस्थानसह संपूर्ण भारतातील गणेश भक्त या त्रिनेत्र गणेश मंदिरात भगवान गणेशाच्या चरणी लीन होण्यासाठी गर्दी करतात. भारतातील सर्वात जुन्या गणेश मंदिरांपैकी एक असलेले रणथंभोर गणेश मंदिर, हे रणथंभोर किल्ल्यामध्ये आहे. चौहान राजवंशातील राजा हमीरदेवाने हे मंदिर १३ व्या शतकात बांधले. राजस्थानच्या रणथंभोर किल्ल्यातील या मंदिरात असलेली त्रिनेत्र गणेशाची मूर्ती ही स्वयंभू असून राणा हमीरदेवाला देवानं साक्षात्कार दिल्यावर ती या जागी उत्पन्न झाली, अशी कथा आहे. (Social News)

या मंदिरात दरवर्षी करोडोंच्या संख्येने पत्रे आणि निमंत्रण पत्रिका भगवान गणेशाला पाठवल्या जातात. विशेष म्हणजे, भगवान गणेशाला पाठवलेल्या निमंत्रण पत्रांवर रणथंभोर गणेश मंदिर, रणथंभोर किल्ला, राजस्थान, एवढाच पत्ता लिहिलेला असतो. अशा पत्त्याची रोजची हजारो पत्र या मंदिरात पोस्टमन आणू देतात. या पत्रांचे मंदिरात वाचनही केले जाते. असे मानले जाते की, भगवान त्रिनेत्र गणेशाला निमंत्रण पाठवल्याने प्रत्येक कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. अरवली आणि विंध्याचल डोंगरावर असलेल्या या मंदिराचा संपूर्ण परिसर रमणीय आहे. 1579 फूट उंचीवर असलेल्या या मंदिरात गणेश चतुर्थीला मोठी गर्दी उसळते. या मंदिराच्या इतिहासानुसार, 1299 मध्ये राजा हमीर आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यात रणथंभोर किल्ल्यावरून युद्ध झाले. हे युद्ध अनेक वर्षे चालले. त्यामुळे किल्ल्याच्या गोदामांमध्ये असलेल्या गरजेच्या वस्तू संपत आल्या. किल्ल्यावर असलेल्या जनतेची आणि सैनिकांची धान्यसाठा संपू लागल्यामुळे उपासमार होऊ लागली. (Trinetra Ganesha Temple)

राजा हमीर हा भगवान गणेशाचा एक महान भक्त होता. त्यानं अशा परिस्थितीत गणरायाची आराधना केली. त्यानंतर श्री गणेशानं राजा हमीर देव याला स्वप्नात दर्शन दिले आणि एका विशिष्ट ठिकाणी पूजा करण्यास सांगितले. याच ठिकाणी राजानं पूजा केली, आणि तिथे त्रिनेत्र गणेशाची मूर्ती सापडली. ही पूजा केल्यावर राजाजी गोदामे पुन्हा धन धान्यानी भरली आणि युद्धही संपले. भगवान गणेशाची आपल्यावर कृपा झाली, हे जाणून 1300 मध्ये राजा हमीरने भगवान गणेशाचे मंदिर याच ठिकाणी बांधले. या मंदिरात राजा हमीरने भगवान गणेशासह त्याच्या पत्नी रिद्धी-सिद्धी, शुभ-लाभ ही दोन मले आणि भगवान गणेशाचे वाहन असलेल्या मुषकाही मूर्तीही स्थापित केली. या मंदिरात सौभाग्य आणि संपत्तीची देवता म्हणून भगवान गणेशाची पूजा केली जाते. राजा हमीर आपल्या कुटुंबासह श्री गणेशाची येथे नित्यनियमानं पूजा करीत असे, अशीही माहिती आहे. यासंदर्भात किल्ल्यात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांमध्ये माहिती आहे. (Social News)

==============

हे देखील वाचा :  Ganesh Chaturthi : गणेशाने केले होते गर्विष्ठ कुबेराचे गर्वहरण

============

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येथे मेळा भरतो. यात राजस्थानसह देशभरातील भाविक उपस्थित असतात. भगवान त्रिनेत्राची प्रदक्षिणा सात किलोमीटर लांब आहे. ही प्रदक्षिणा लाखो भाविक पूर्ण करतात. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे, पावसाळ्यात डोंगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाळी धबधबे वाहू लागतात. त्यामुळे येथील वातावरण अधिक रमणीय होते, आणि भाविकांची संख्या दुपटीनं वाढते. (Trinetra Ganesha Temple)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.