Home » Religious : देवाची आरती करण्याचे महत्व

Religious : देवाची आरती करण्याचे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Religious
Share

आपल्या हिंदू धर्मामध्ये दररोज सकाळी देवाची पूजा होते. पूजा झाल्यानंतर देवाची शेवट आरती केली जाते. फक्त घरीच नाही तर मंदिरांमध्ये देखील देवाची दररोज दोन वेळा आरती केली जाते. हिंदू धर्मामध्ये देवाच्या आरतीला अनन्यसाधारण महत्व आहे. अनेकदा जर आपण एकाद्या मंदिरात किंवा कोणत्या घरी पूजेसाठी आरतीच्या वेळेस पोहचलो तर आपल्याला आपण खूपच नशीबवान असल्याचे वाटते. याचे कारण म्हणजे देवाची आरती मिळणे खूपच चांगले आणि आशीर्वादस्वरूप मानले जाते. काही घरांमध्ये देवाची दररोज पूजा आणि एकदाच आरती होते. तर काही घरांमध्ये दोनवेळा आरती होते. मात्र गणेशोत्सवामध्ये प्रत्येक घरात आणि सार्वजनिक पंडालमध्ये दोन वेळा देवाची आरती केलीच जाते. मग आरतीला एवढे महत्व का आहे? देवाची आरती करण्यामागे कोणते कारण आहे? आरती करण्याचे फायदे कोणते? चला जाणून घेऊया याच आरतीबद्दल. (Ganesh Chaturthi)

विष्णुधर्मोत्तर पुराणानुसार असे म्हटले आहे, की जो धूप, आरती करतो तसेच पाहतो, त्याच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो. स्कंद पुराण सांगते, जर एखादी व्यक्ती मंत्र जाणत नसेल, पूजेची पद्धत माहीत नसेल पण आरती करत असेल, तर देव त्याची पूजा पूर्णपणे स्वीकार करतात. आरती म्हणणार्‍यांचा ईश्वराप्रती भाव जितका जास्त, तितकी आरती जास्त भावपूर्ण आणि सात्त्विक होते. अशी आरती ईश्वरापर्यंत लवकर पोहोचते.

“आरती” हा शब्द संस्कृतमधील “आरात्रिक” पासून आलेला असून याचा अर्थ, अंधार दूर करणे असा होतो. पूजेच्या शेवटी आरती करणे म्हणजे प्रकाश आणि ऊर्जेचे आवाहन आहे. आरतीचा अर्थ आहे देवाला आठवणे, त्यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त करणे. देवाप्रती पूर्णपणे समर्पित होण्याची भावना म्हणजे आरती. दिव्याद्वारे, तुपाच्या दिव्याने किंवा कापुराने आरती केली जाते. काकड आरती, मंगल आरती, श्रृंगार आरती, धूप आरती, संध्या आरती असे आरतीचे अनेक प्रकार आहेत. (Marathi News)

जेव्हा आपण आरती करतो त्यावेळी दिव्याची ज्योत देवापुढे फिरवली जाते. ही ज्योत भक्ती, प्रकाश आणि आत्मज्ञानाचे प्रतीक आहे. पूजेद्वारे जे काही अर्पण केले गेले, त्याचे अंतिम समर्पण या आरतीमधून होते. पूजेच्या वेळी निर्माण होणारी दिव्य ऊर्जा, आरतीची ज्योत, घंटा, शंख आणि देवाची स्तुती या माध्यमातून संपूर्ण वातावरणात पसरवली जाते. हे कंपन आपले मन, घर आणि आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर करते. (Social Updates)

Religious

==========

Ganesh Chaturthi : गणेशाच्या विवाहामागील आख्ययिका ठाऊक आहे का?

==========

आरतीमध्ये देवतेच्या संपूर्ण मुर्ती किंवा प्रतिमेभोवती दीप ज्योत फिरवली जाते. देवाच्या प्रतिमेची प्रशंसा करून स्वत:ला सकारात्मकतेने भरून टाका. म्हणूनच आरतीला देवाची उपासना करणे म्हणतात, कारण त्यामध्ये देवाची प्रतिमा दिव्याच्या ज्योतीने विशेष प्रकाशित केली जाते. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार कितीही गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. देवाच्या रूपाचे सौंदर्य अतुलनीय आहे. भक्त जेव्हा देवाकडे पाहतो तेव्हा त्याचीही मनोकामना पूर्ण होते. आरतीच्या दिव्याच्या ज्योतीने परमेश्वर सर्व संकटे दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. (Marathi Ganesh Chaturthi News)

भाविक दोन्ही हातांनी देवाची आरती करतात. या दिव्याच्या आधारे देवाच्या प्रतिमेतून तेजस्वीतता बाहेर पडते. त्यातून आपल्याला आपल्या जीवनातील काळोख दूर होण्यास मदत मिळते आणि एक सकारात्मकता आपल्या अंगी येते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचभूतांपासून हे जग निर्माण झाले आहे, त्यामुळे या पाच गोष्टींचाही आरतीमध्ये समावेश आहे. कापूराचा सुगंध म्हणजे पृथ्वी, पाण्याचा गोड प्रवाह म्हणजे तूप, अग्नी म्हणजे दिव्याची ज्योत, वायूमुळे होणारी ज्योतीची हालचाल, घंटा, शंख, मृदंग इत्यादींचा आवाज आकाश दर्शवतो. अशा प्रकारे जगाच्या कानाकोपऱ्यातून परमेश्वराची आरती होते. (Latest Marathi News)

​आरती करण्याची पद्धत
एका ताम्हणात स्वस्तिक बनवा आणि फुल आणि अक्षदा यांच्या आसनावर दिव्यामध्ये तुपाची वात आणि कापूर ठेवून ती पेटवा. देवाची आरती शुद्ध तुपात बुडवलेल्या वातीने करावी. पूजा छोटी असो वा मोठी, आरतीशिवाय ते पूर्ण मानले जात नाही.

ज्याप्रमाणे आरतीच्या दिव्याची वात वरच्या दिशेला असते. त्याचप्रमाणे आरती पाहणे, करणे आणि घेण्याने मानवाला आध्यात्मिक उंच्चता प्राप्त होते. जो नित्यनेमाने भगवान विष्णूची आरती बघतो किंवा करतो, तो सात जन्म ब्राह्मण कुळात जन्म घेतो आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो. कपूराने भगवंताची आरती केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. सोबतच, मनुष्याच्या संपूर्ण कुलाचा उद्धार होतो. तुपाच्या वातीने देवाची आरती करणारा माणूस दीर्घकाळ स्वर्गाची प्राप्ती करतो. (Top Marathi Headline)

पंचारतीने आरती करणे हे अनेकत्वाचे, म्हणजेच चंचलरूपी मायेचे प्रतीक आहे. आरती ओवाळणारा नुकताच साधनेला प्रारंभ केलेला प्राथमिक अवस्थेतील साधक (५० टक्क्यांपेक्षा अल्प आध्यात्मिक पातळी असलेला) असल्यास त्याने देवाला ओवाळतांना पंचारतीने ओवाळावे. एकारतीने आरती करणे हे एकत्वाचे प्रतीक आहे. भाव असलेल्या आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकाने देवीला एकारतीने ओवाळावे. तर ७० टक्क्यांपेक्षा जास्त पातळी असलेला आणि अव्यक्‍त भावात प्रवेश केलेला उन्नत जीव स्वतःतील आत्मज्योतीनेच देवीला  अंतर्यामी न्याहाळतो. आत्मज्योतीने ओवाळणे, हे एकत्वातील स्थिरभावाचे प्रतीक आहे. (Todays Marathi Headline)

Religious

गणेशोत्सवामध्ये तुम्हाला खाली दिलेल्या आरत्या यायलाच पाहिजे.
|| गणपतीची आरती ॥
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची। कंठीं झळके माळ मुक्ताफळांची । जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनः कामना पुरती ॥ ध्रु. ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चंदनाची उटी कुंकुमकेशरा। हिरेजडित मुगुट शोभतो बरा। रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥ जय. ॥ २ ॥ लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावें, निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना । जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शन. ॥ ३ ॥ (Top Trending Marathi News)

॥ श्री शंकराची आरती ॥
लवथवती विक्राळा ब्रह्मांडीं माळा । वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळा । लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओंवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु.॥ कर्पुरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा। विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा । जय देव० ॥ २ ॥ देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें । त्यामाजीं अवचित हलाहल जें उठिलें । तें त्वां असुरपणें प्राशन केलें । ‘नीलकंठ’ नाम प्रसिद्ध झालें || जय० || ३ || व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी। शतकोटीचें बीज वाचे उच्चारी। रघुकुलतिलक रामदासाअंतरी ॥ जय देव० ॥ ४ ॥ (Latest Marathi Headline)

॥ श्री देवीची आरती ॥
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं। वारीं वारीं जन्म-मरणातें वारीं। हारीं पडलों आतां संकट निवारीं ॥ १ ॥ जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी । सुरवर-ईश्वरवरदे तारकसंजिवनी || ध्रु. ।। त्रिभुवनभुवनीं पाहतां तुजऐशी नाहीं। चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं। साही विवाद करितां पडिलें प्रवाही। ते तूं भक्तालागी पावसि लवलाही || जय. ॥ २ ॥ प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनि सोडविं तोडीं भवपाशां। अंबे तुजवांचून कोण पुरवील आशा। नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी । सुरवर-ईश्वरवरदे तारक० ॥ (Marathi Top News)

॥ श्री विठ्ठलाची आरती ॥
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा। चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा।।1।। जय देव जय देव जय पांडुरंगा।। रखुमाईवल्लभा राहोच्या वल्लभा पावें जिवलगा ।।धृ.।। तुळसींमाळा गळां कर ठेवुनि कटीं। कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं। देव सुरवर नित्य येती भेटी। गरुड हनुमंत पुढें उभे राहती ।।जय.।।2।। धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा। सुवर्णाचीं कमळें वनमाळा गळां। राई रखुमाई राणीया सकळा। ओंवाळिती राजा विठोबा सांवळा ।।जय.।।3।। ओंवाळूं आरत्या कुर्वड्या येती । चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती। दिंड्या एताका वैष्णव नाचती। पंढरीचा महिमा वर्णांवा किती ।।जय।।4।। आषाढी कार्तिकी भक्तजन येती। चंद्रभागेमध्यें स्नानें जें करिती। दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवाळिती।। जय देव जय देव जय. ।।5।। (Top Stories)

=========

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?

Ganesh Chaturthi : गणपतीची मूर्ती घरी आणताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

=========

घालीन लोटांगण
घालिन लोटांगण, वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।। प्रेमें आलिंगिन, आनंदें पूजिन। भावें ओवाळिन म्हणे नामा ।।१।। त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥ कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै, नारायणेति समर्पयामि ॥३॥ अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि। श्रीधरं माधवं गोपिकाल्लभं, जानकीनायकं रामचंद्रं भजे ।।४।। (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.