विद्येची देवता, विघ्नांचा हर्ता, ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सगळीकडेच जय्यत तयारी चालू आहे. सर्व गोष्टी आता अगदी शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. आता कधी २७ ऑगस्टचा दिवस उजाडतो आणि लाडका बाप्पा आपल्या घरी येऊन विराजमान होतो असे झाले आहे. गणेशाचे आगमन झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हर तऱ्हेने त्यांची सेवा करण्यात, त्यांचे लाड करण्यात आपला वेळ व्यतीत करते. बाप्पाची आरती, स्तोत्रे, भजन आदी अनेक गोष्टी याकाळात केल्या जातात. यासोबतच अनेक ठिकाणी बाप्पाच्या आगमनानंतर अथर्वशीर्षाचे देखील पठण केले जाते. (Ganesh Chaturthi)
गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र हे सर्व अथर्वशीर्षांचे शिरोमणी असल्याचे मानले जाते, त्याचे वर्णन अथर्ववेदात आढळते. गणेश अथर्वशीर्ष हे पार्वती नंदन गणेशाला समर्पित करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी या गणपती अथर्वशीर्षाचे पठण सर्वात शुभ आणि लाभदायक मानले गेले आहे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे अथर्व ऋषी यांनी लिहिले होते ज्यांना गणपतीचे दर्शन झाले होते. कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे नामस्मरण करण्याची प्रथा आहे. (Marathi News)
अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले असून, यातील थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे. गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी “गं” हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. (Todays Marathi Headline)
गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल, असे म्हटले आहे. अथर्वशीर्षाचे तीन प्रमुख भाग आहेत. पहिला भाग शांतीमंत्र सुरुवातीला ॐ भद्रं कर्णेभिः आणि स्वस्तिनः इंद्रा….. हे मंत्र आणि शेवटी सह नाववतु ।…… हे मंत्र. दुसरा भाग ध्यानविधी ॐ नमस्ते गणपतये येथपासून ते वरदमूर्तये नमः येथपर्यंतचे दहा मंत्र आणि तिसरा शेवटचा भाग म्हणजे फलश्रुती एतदथर्वशीर्ष योऽधीते इत्यादी चार मंत्र. (Top Marathi Headline)
गणपती अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे
* गणपती अथर्वशीर्षाचे पठण केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. (Top Marathi Stories)
* गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याने जीवनात सर्वांगीण प्रगती होते.
* गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.
* नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते.
* आर्थिक समस्येमध्ये हळूहळू परंतु स्थिरपणे आर्थिक समृद्धी येते.
* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतात.
* विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात.
* गणपतीची कृपा जाणवू लागते.
* सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात.
‘या’ लोकांनी नक्की अथर्वशीर्ष पाठ करावा
> ज्यांच्या कुंडलीत राहू, केतू आणि शनीचा अशुभ प्रभाव असतो त्यांच्यासाठी अथर्वशीर्ष पाठ अतिशय फायदेशीर ठरतं असे धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय. या लोकांनी दररोज पाठ करावा.
> त्याशिवाय मुलांना आणि तरुणांना अभ्यासात रस नसेल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना रोज नियमितपणे अथर्वशीर्ष पाठ करण्यास सांगितलं जातं. (Top Marathi Headline)
अथर्वशीर्ष म्हणताना पाळावयाचे नियम
– उच्चार अगदी स्पष्ट असावे.
– अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.
– अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.
– जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा ‘वरदमूर्तये नमः ।’ येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. (Latest Marathi Headline)
– अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.
– अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.
– अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
– अथर्वशीर्ष पाठ करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.
– अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये, याची काळजी घ्यावी.
– दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
– अथर्वशीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडिलधार्यांना तसेच गुरुंना नमस्कार करावा.
– अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल व्हावे.
– पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान करावे, नमस्कार करावा. (Top Trending News)
गणपती अथर्वशीर्ष
“ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि। त्वमेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्तासि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षादात्माऽसि नित्यं।।१।।
ऋतं वच्मि। सत्यं वच्मि ।।२।। (Latest Marathi News)
अव त्वं माम्। अव वक्तारंम्। अव श्रोतारम्। अव दातारम्।
अवधातारम्। अवानूचानमव शिष्यम्। अव पश्चातात्। अव पुरस्तात्।
अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तात्। अवचोर्ध्वात्तात्। अवाधरात्तात्।
सर्वतो मां पाहि-पाहि समंतात् ।।३।।
त्वं वाङ्मायस्त्वं चिन्मय:। त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ।।४।।
सर्वं जगदिदं त्वत्तो जयाते। सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति। सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति। सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापोन लोनिलो नभ:। त्वं चत्वारि वाक्पदानि ।।५।। (News Updates)
त्वं गुणत्रयातीत:। त्वं अवस्थात्रयातीत:। त्वं देहत्रयातीत: । त्वं कालत्रयातीत: । त्वं मूलाधार स्थितोसि नित्यं। त्वं शक्तित्रयात्मक: । त्वां योगिनो ध्यायंति नित्यम्। त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वमिद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव:स्वरोम् ।।६।।
गणार्दि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम्। अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं। तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपम्। गकार: पूर्वरूपम्। अकारो मध्यमरूपम्। अनुस्वारश्चान्त्यरूप्म। बिन्दुरूत्तररूपम्। नाद: संधानम्। संहितासंधि:। सैषा गणेश विद्या। गणकऋषि: निचृद्गायत्री च्छंद:। गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नम:।।७।। (Top Stories)
===========
Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?
Ganesh Chaturthi : गणपतीची मूर्ती घरी आणताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
===========
एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नोदंती: प्रचोदयात।।८।।
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्। रक्तगंधानु लिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्। भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्। आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते: पुरुषात्परम्।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर: ।।९।।
नमो व्रातपतये। नमो गणपतये नम: प्रमथपतये।
नमस्तेऽस्तु लंबोदरा यैकदंताय। विघ्ननाशिने शिवसुताय।
श्रीवरदमूर्तये नमो नम:।।१०।। (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics