Home » Carl Tanzler Ttory : प्रेमात वेडा ‘तो’ सात वर्ष तिच्या मृतदेहासोबत झोपला !

Carl Tanzler Ttory : प्रेमात वेडा ‘तो’ सात वर्ष तिच्या मृतदेहासोबत झोपला !

by Team Gajawaja
0 comment
Carl Tanzler Ttory
Share

रोमियो-जुलिएट, लैला-मजनू, हीर-रांझा, अगदी देवदास आणि पारो, आपल्याला प्रेमात वेड लागलेले असे बरेच प्रेमी माहितच आहेत. पण आजची स्टोरी अशाच एका प्रेमात आकंठ बुडालेला डॉक्टरची आहे, ज्याला स्वप्नात पूर्वज दिसले आणि पूर्वजांच्या आदेशानुसार, त्याचं ज्या स्त्रीवर प्रेम होतं, तिची कबर खोदून त्याने तिचा मृतदेह चक्क घरी आणला आणि तिच्यासोबत राहायला लागला. याचं कारण म्हणजे सिर्फ प्यार, प्यार और प्यार… आज आपण अशाच एक सनकी डॉक्टरची विचित्र पण इंटरेस्टिंग कहाणी जाणून घेऊ. ( Carl Tanzler Ttory)

डॉक्टर कार्ल टेंझलर हा जर्मनीमधला एक डॉक्टर होता. तो अमेरिकेत आल्यावर कार्ल फ्लोरिडातल्या मरीन हॉस्पिटलमध्ये एक्स-रे टेक्निशियन म्हणून काम करत होता. त्याला लहानपणी एक स्वप्न पडलं, त्यात त्याला एक काळ्या, लांबसडक केसांची सुंदर मुलगी दिसली आणि त्याच स्वप्नात त्याला एक म्हातारी दिसली. त्याला तिने सांगितलं, “हेच तुझं खरं प्रेम आहे.” त्याला एकदा पडलेलं हे स्वप्न आतासारखं दिसायला लागलं. त्याने त्या मुलीचा बरेचदा शोध घेतला, पण त्याला स्वप्नातली ती कधीच भेटली नाही. मग १८९९ मध्ये कार्लचं डोरिस शेफर नावाच्या बाईशी लग्न झालं. त्याला दोन मुली झाल्या. त्याने त्याच्या बायकोला त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं, त्याला स्वप्नात एक सुंदर मुलगी दिसते आणि त्यांचं खरं प्रेम ती नाही, तर ती स्वप्नातली मुलगी आहे. मग १९२६ मध्ये तो बायको आणि मुलींना जर्मनीत सोडून नोकरीसाठी अमेरिकेत कायमचा राहायला आला.

२२ एप्रिल १९३० चा दिवस होता. कार्ल हॉस्पिटलमध्ये काम करत असताना मारिया एलेना ‘हेलेन’ नावाची पेशंट आली. तिला टीबी झाला होता. त्याने तिला बघितलं आणि त्याचे डोळेच फिरले. कारण ती मुलगी अगदी त्याच्या स्वप्नातल्या मुलीसारखी होती – सेम टू सेम! आता कार्लच्या मनात तिला बघून लड्डू फुटायला लागले. कार्लने एलेनाचा उपचार सुरू केला. मग एलेना उपचारासाठी रोज हॉस्पिटलला यायला लागली. एकदा कार्लने तिला आपल्या स्वप्नातली गोष्ट सांगितली. तेव्हा एलेना म्हणाली की,तिचं लग्न झालंय. हे ऐकून त्याची वो रात अपुन दो बजे पिया अशी हालत होणार होती, पण पुढचं वाक्य ती म्हणाली की, तिच्या नवऱ्याने तिला सोडलं. तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती आणि ती कार्लपेक्षा ३२ वर्षांनी लहान होती!( Carl Tanzler Ttory)

Carl Tanzler Ttory

वयाचं अंतर जास्त होतं तरी कार्लचं तिच्यावचंर प्रेम कमी होत नव्हतं. तो तिला मनातून बायकोच मानायला लागला होता. पण एक गोष्ट म्हणजे, त्या काळात टीबीचा उपचार शक्य नव्हता. शेवटी हॉस्पिटलने एलेनाला घरीच आराम करायला सांगितलला. हे कार्लला कळलं आणि त्याला धक्काच बसला. तो लगेच एलेनाच्या घरी पोहोचला आणि तिच्या आई-वडिलांना म्हणाला, “मी माझ्या खर्चाने तिचा उपचार तिच्याच घरीच करेन.” हे ऐकून तिच्या घरच्यांनीही होकार दिला. आता कार्ल रोज एलेनाच्या घरी उपचाराच्या नावाखाली तिला भेटायला जायला लागला. प्रेमात इतका वेडा झाला होता की, तो तिच्यावर उपचार करायला हॉस्पिटलमधून औषधं आणि मशीन्स चोरून आणायला लागला. पण खूप प्रयत्न करूनसुद्धा त्याला एलेनाला वाचवता आलं नाही. २५ ऑक्टोबर १९३१ ला एलेनाचा टीबीने मृत्यू झाला आणि कार्ल का दिल ही टूट गया. त्याने एलेनाच्या आई-वडिलांना विनंती केली की, तो तिच्या अंत्यसंस्काराचा खर्च करेल. त्याने तिच्यासाठी मोठी कबर बनवली, कबरीची एकच चावी बनवली आणि ती स्वतःकडे ठेवली. एलेनाच्या कुटुंबाला सांगितलं, “कबरीला भेटायचं असेल तर बाहेरूनच बघा.”

ती गेल्यावरसुद्धा कार्लचं प्रेमाचं वेड एवढ्यावर थांबलं नाही. तो रोज तीन दिवसांत तिच्या कबरीजवळ जायचा, तासन्तास तिथेच बसायचा, एकटाच बडबडत राहायचा. तिच्या आई-वडिलांना जेव्हा हे कळलं, तेव्हा त्यांना वाटलं, वेळ जाईल तसं याचं वेड कमी होईल. पण अशीच दोन वर्ष निघून गेली. दोन वर्षांनंतर कार्लला पुन्हा स्वप्नं पडायला लागलं. त्यात आता फक्त ती म्हातारी होती. ती म्हातारी त्याला म्हणाली की, “एलेनाला घरी घेऊन ये आणि तिला तुझ्यासोबत ठेव.” आणि मग काय? हा आशिक एलेनाच्या कबरीजवळ गेला, तिची कबर खोदली आणि एलेनाची डेड बॉडी चोरून तो घरी घेऊन गेला. पण कोणलाच डेड बॉडी चोरल्याचा अंदाजच लागला नाही. त्यात एलेनाचा मृतदेह संपूर्ण सडला होता. त्याला घाणेरडा वास येत होता. मग कार्लने काय केलं? तर वॅक्स आणि प्लास्टर ऑफ पॅरिस घेतलं आणि एलेनाच्या डेड बॉडीला फासून तिला प्रोपर आकार दिला. डोळ्यांना काचेचे गोळे लावले, डोक्याला खोटे केस चिकटवले आणि वास येऊ नये म्हणून रोज महागडे परफ्युम्स मारायचा. आता एलेनाची सडलेली डेड बॉडी नव्याने तयार झाली होती. ( Carl Tanzler Ttory)

==============

हे देखील वाचा : Narsimha : ज्या खांबातून नरसिंह प्रकटले, तो आहे चक्क पाकिस्तानात !

==============

कार्ल आता एलेनाच्या स्वतःच्या हाताने सजवलेल्या डेड बॉडीशी तासन्तास बोलायचा, तिला नाचून दाखवायचा, गाणी म्हणायचा, तिला स्वतःच्या बाजूला बिछान्यावर झोपावायचा, जशी काय ती त्याची बायकोच आहे. मग अशीच सात वर्षं निघून गेली.तोवर ही खबर त्याने कोणालाच कळू दिली नाही. पण एक दिवस एलेनाच्या बहिणीला शंका आली, कारण कार्ल पहिल्यासारखा आता कबरीत येत नाही. म्हणून मग ती अचानक कार्लच्या घरी गेली आणि तिने जे पाहिलं, ते बघून तिला शॉकच बसला. कार्ल एलेनाच्या मृतदेहाशी बोलत होता, ते दृश्य तिने पाहिलं. तिने लगेच पोलिसांना बोलावलं. पोलीस आले. पोलिसांनी कार्लला विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की, तो सात वर्षांपासून एलेनाच्या मृतदेहासोबत राहत होता! मग जेव्हा एलेनाच्या डेड बॉडीची तपासणी झाली, तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे कार्लचे त्या एलेनाच्या डेड बॉडीसोबत शारीरिक संबंध होते. हे ऐकून सगळे हादरले. या विक्षिप्त प्रकरणानंतर पोलिसांनी कार्लला अटक केली, पण तेव्हा अशा गुन्ह्यासाठी कायद्यात काहीच तरतूद नव्हती. कारण कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, असंही कोणी करू शकेल! त्यामुळे कार्लला कोणतीच शिक्षा झाली नाही. त्यानंतर एलेनाच्या घरच्यांनी तिचा मृतदेह पुन्हा दफन केला, पण यावेळी कबर एक्जॅक्ट कुठे आहे, हे कार्लला सांगितलंच नाही—जेणेकरून त्याने जो विक्षिप्तपणा केला तो पुन्हा करणार नाही. पण कार्ल ऐकणारा नव्हता, या सगळ्या प्रकरणानंतरसुद्धा तो मरेपर्यंत एलेनाची कबर आयुष्यभर शोधत राहिला, पण त्याला ती कधीच सापडली नाही. तिला शोधतच त्याचा ३ जुलै १९५२ ला मृत्यू झाला. तर अशी होती एका सनकी डॉक्टरची कहाणी!

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.