Home » Vivek Agnihotri : “अशा लोकांमुळे मराठी संस्कृतीला धोका” विवेक अग्निहोत्रींवर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

Vivek Agnihotri : “अशा लोकांमुळे मराठी संस्कृतीला धोका” विवेक अग्निहोत्रींवर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vivek Agnihotri
Share

‘द काश्मीर फाईल्स’, ‘द बंगाल फाईल्स’ फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतात. विवेक यांना त्यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमामुळे अफाट प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे. सध्या विवेक त्यांच्या आगामी ‘द बंगाल फाईल्स’ सिनेमामुळे चर्चेत आले आहेत. विवेक यांच्या सिनेमामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. मात्र तरीही त्यांनी त्यांच्या चित्रपटातून त्यांना जे मांड्याचे ते मांडले. मात्र आता सध्या विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. खासकरून महाराष्ट्रातून, मराठी लोकांकडून विवेक यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. याचे कारण देखील तसेच आहे. (Todays Marathi Headline)

झाले असे की, नुकत्याच एका शोमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी महाराष्ट्रीय जेवणाला ‘गरिबांचे जेवण’ म्हणून हिणवले आहे. विवेक अग्निहोत्रींनी मराठी जेवणाची खिल्ली उडवली असून, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे कमी की काय तर विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवणाची तुलना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीसोबत केली आहे. यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री यांना तर सुनावण्यास सुरुवात केली आहे सोबतच त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री पल्लवी जोशीला देखील ट्रोल केले आहे. केवळ सामान्य लोकच नाही तर अनेक मराठी कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून विवेक यांच्या बोलण्याचा समाचार घेत त्यांना सुनावत आहे. (Latest Marathi News)

अशातच मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका असणाऱ्या नेहा शितोळेने देखील विवेक अग्निहोत्री यांच्यासाठी तिखट शब्दात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अनेक मुद्दे समोर ठेवत आपला संताप व्यक्त केला आहे. सध्या नेहाची ही पोस्ट खूपच व्हायरल होत असून, सर्वानीच तिला समर्थन दिले आहे. नेहाने तिच्यापोस्टमध्ये लिहिले आहे की, (Entertainment News)

 

View this post on Instagram

 

A post shared by NEHA SHITOLE (@nehanachiket)

“हा व्हिडिओ पाहून माझा संताप अनावर होत आहे. एक एक करून सांगते…

1. मराठी जेवणाविषयी पर्यायाने संस्कृती विषयी वाट्टेल ते बोलतोय हा माणूस… पुढे अजुन एका रील मधे हा म्हणतोय की मी सात्विक अन्न खातो… (Plant based food) (ह्याला सावजी खायला घाला आणि तांबडा पांढरा रस्सा पाजा एकदा)

2. “गरिबांचं” किंवा “किसानांचं” जेवण म्हणजे वाईट असं म्हणून अन्नाचा, शेतकऱ्यांचा आणि भारताच्या जवळ जवळ 25% जनतेचा जी दारिद्र्य रेषेखाली राहते त्यांचा अपमान करतो आहे…

3. आपल्या सगळ्यांची लाडकी पल्लवी जोशी हसून हसून हा विनोद अभिमानाने सांगते आहे… आणि मुळात आम्ही भाज्या फक्त उकडत नाही… उकडीचे मोदक सिंपल नाहीत… पुरणपोळी सिंपल नाही…

4. ज्यांच्या घरी असं जेवण जेवतात, अश्या मुलीशी कसं लग्न करायचं हा विवेक अग्निहोत्री ला पडलेला प्रश्न आहे…

5. आणि हे सगळं YouTube च्या माध्यमातून करोडो लोकं बघतायत…

हा माणूस काश्मीर चं सत्य आपल्या समोर आणतो आहे म्हणून आपण ह्याला डोक्यावर घ्यायचं? ज्या माणसाच्या मनात मुळात इतका भेदभाव आणि चुकीच्या धारणा आहेत भारतातल्या एका राज्याबद्दल, तिथे राहणाऱ्या आणि कष्ट करून कमावून खाणाऱ्या लोकांबद्दल तो काय दुसऱ्या राज्याचं सत्य सांगणार आपल्याला??? आता मराठीचा झेंडा मिरवणाऱ्या सगळ्यांनी ह्याचे सिनेमे Boycott करायला नकोत का? जसा स्टँड अप कॉमेडियन लोकांना “धडा शिकवण्याचा” आपण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याची पण ग्वाही दिली तसा आता ह्यांना कोण शिकवणार “वरण भाताची” किंमत आणि महत्त्व??? (Top Marathi News)

==============

हे देखील वाचा : Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ

===============

ह्या आणि अशा लोकांमुळे खरंतर मराठी भाषेला, माणसाला आणि पर्यायाने संस्कृतीला धोका आहे कारण हे पॉवर पोझिशन मध्ये बसून मराठी लोकांविषयी, भाषेविषयी वाईट, निंदनीय आणि अपमानकारक वक्तव्य करतात… त्यामुळे नाही म्हणलं तरी अनेक स्तरांवर लोकांच्या मनात कळत नकळत परिणाम होतो आणि आपण वरवर च्याच गोष्टी (theatre मिळत नाही, मराठी अनिवार्य नाही, मराठी कंटेंट OTT स्वीकारत नाही… इत्यादी) साठी भांडत बसतो… का भीती वाटते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त मोठ्या माणसाशी पंगा घ्यायची… त्यापेक्षा दुकानदारांना, कष्ट करून जगणाऱ्या गरीब परप्रांतियांना धमकावणं आणि मारणं सोपं आहे नाही का??”(Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.