ज्या सणाची संपूर्ण महाराष्ट्र वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, तो गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे, गणपती पंडालमध्ये डेकोरेशन चालू असून, प्रत्येकाच्या घरी देखील बाप्पाच्या स्वागताची तयारी चालू आहे. बाप्पाची मूर्ती, डेकोरेशन, प्रसाद सर्वच गोष्टी मोठ्या उत्साहाने कुटुंबातील सर्वच लोकं करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेश चतुर्थी सणाला ओळखले जाते. गणपती बाप्पाची खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तीने पूजा केल्याने घरात सौभाग्य आणि समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. कलेची बुद्धीची देवता असणाऱ्या लाडक्या बाप्पाचा उत्सव कधी सुरु होत आहे?, गणेश उत्सवाचे महत्व काय? आदी सर्वच गोष्टींची माहिती आपण जाणून घेऊया. (Ganesh Chaturthi 2025)
यंदा गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट अर्थात बुधवारपासून सुरु होत आहे. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी १.५४ वाजता होणार आहे. त्याच वेळी बुधवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४४ वाजता त्याची सांगता होईल. उदयतिथी नुसार गणेश चतुर्थीचा उत्सव २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाची घरोघरी आणि मंडळामध्ये स्थापना केली जाईल. तर शनिवार, ६ सप्टेंबर अनंत चतुर्थीपर्यंत हा उत्सव चालणार आहे. (Marathi News)
गणेशाची स्थापना करण्याचा सर्वात शुभ काळ म्हणजे दुपार. मान्यतेनुसार या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म दुपारी झाला होता. बुधवार, २७ ऑगस्ट रोजी मध्यान्हाच्या काळात गणपती बाप्पाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११.०५ ते दुपारी १.४० पर्यंत असेल. या दिवशी चार दिवस शुभ योग तयार होत आहेत. शुभ योग, शुक्ल योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग हे शुभ योग तयार होत आहे. तसेच हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र देखील तयार होत आहे. (Todays Marathi Headline)
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. शंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्याच दिवशी गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला होता. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस देखील भाद्रपद शुद्ध चतुर्थीचाच होता. त्यामुळे या दिवशी गणेश चतुर्थीचा सण साजऱ्या कर्णयची पद्धत रूढ झाली जी आजही पाळली जात आहे. चतुर्थी तिथी श्रीगणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांपलीकडील तुरीया अवस्था होय. तेच जीविताचे परमाध्य, असे मानले जाते. थोरले माधवराव पेशवे यांनी गणेश चतुर्थीचा उत्सव सार्वजनिकरित्या शनिवार वाड्यात सुरू केला. यानंतर लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक उत्सव समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला भव्य स्वरुप दिले. (Top Marathi News)
गणेश जन्माची कथा
पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एका लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण ओतते. या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते. त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो. त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव देवी तिला भेटण्यासाठी तिथे येतात. (Top Trending News)
त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात. गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि महादेवच आपले पिता आहेत हे गणेश यांना माहीत नसते. त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो. महादेवदेखील ते मान्य करत नाही आणि हा लहान मुलगादेखील मागे हटत नाही. महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात. (Latest Marathi News)
==============
हे देखील वाचा : Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी
Rishi Panchami 2025 : ऋषीपंचमी का साजरी करतात? जाणून घ्या तारखेसह महत्व
===============
तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते. त्यावेळी, भगवान शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात. त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते. अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्रीगणेश पुन्हा जिवंत होतात, अशी ही कथा आहे. (Top Stories)
गणेश उत्सवाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. जे लोक गणेशाची पूजा करतात, ते त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि ध्येये पूर्ण करण्यास सक्षम असतात. गणरायाची मनोभावे पूजा करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते आणि जे कोणी त्याची प्रार्थना करतात, त्यांची पापांची मुक्तता होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics