Home » Shravan : भूमिज शैलीतील एकमेव ९६३ वर्ष जुने ‘आम्रनाथ’ शिव मंदीर

Shravan : भूमिज शैलीतील एकमेव ९६३ वर्ष जुने ‘आम्रनाथ’ शिव मंदीर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shravan | Top Stories
Share

आज श्रावणी सोमवार. नुसता श्रावणी सोमवार नाही तर आजचा श्रावणी सोमवार खूपच खास आणि महत्वाचा आहे. याचे कारण म्हणजे २०२५ शाळेतल्या श्रावण महिन्यातील आजचा १८ ऑगस्टचा सोमवार हा चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे. त्यामुळे या सोमवारचे महत्व जरा अधिक आहे. आता संपूर्ण श्रावण समर्पित असलेल्या महादेवाची महिनाभर आपण पूजा करतच असतो. मात्र श्रावणातल्या सोमवारी केली जाणारी शिवाची पूजा जरा जास्तच फळ देणारी ठरते. त्यामुळे आज शंकरांच्या मंदिरांमध्ये पूजेसाठी आणि दर्शनासाठी अलोट गर्दी असणार हे नक्की. (Lord Shiva)

श्रावणी सोमवार शिवाची पूजा करत, उपवास केला जातो. काही ठिकाणी रुद्राभिषेक देखील होतो. घरी पूजा केल्यानंतर लोकं महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जातात. भारतात शंकरांची लहान मोठी अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिर खास असते. मात्र तरीही अशी देखील काही शिव मंदिरं आहेत ज्यांचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. त्यामुळे या जुन्या मंदिरांना असलेले महत्व काही औरच. आज श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आपण अशाच एका अतिशय जुनी, ऐतिहासिक मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या मंदिराची वैशिष्ट्ये आणि महत्व ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच इथे जाल.(Shravan 2025)

आज आम्ही तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये असलेल्या प्राचीन शिव मंदिराची माहिती देणार आहोत. अंबरनाथचे शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हे तब्बल ९६३ वर्ष जुनं आहे. अंबरनाथमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत आणि अप्रतिम नमुना आहे. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आपल्याला पाहायला मिळतो. (Marathi News)

Shravan

सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१ मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. (Latest Marathi News)

अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली असून या मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते. या ठिकाणाचे मूळ नाव ‘आम्रनाथ’ असे होते, ज्याचा पुढे अपभ्रंश झाला आणि ते अंबरनाथ झाले. हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते. मात्र, काही अभ्यासकांच्या मते, अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे. हे एकच भूमिज मंदिर आहे, ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे, असे म्हटले जाते.(Todays Marathi Headline)

अंबरनाथचा उगम महाभारत काळापासूनचा आहे. पौराणिक कथेनुसार, पांडवांनी त्यांच्या वनवासातील सर्वात कठीण काही वर्षे अंबरनाथ येथे घालवली, जिथे त्यांनी हे जुने मंदिर एका रात्रीत मोठ्या दगडांमधून बांधले. कौरवांकडून त्याचा सतत पाठलाग होत असल्याने त्याला येथून पळून जावे लागले. त्यामुळे मंदिराचे काम पूर्ण होऊ शकले नाही. हे मंदिर आजही उभे आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या मंदिराच्या आत आणि बाहेर ब्रह्मदेवाच्या किमान ८ मूर्ती आहेत. आजूबाजूला अनेक ठिकाणी ब्रह्मदेवाच्या प्राचीन मूर्ती आहेत, यावरून स्पष्ट होते की, पूर्वी येथे ब्रह्मदेवाची पूजा केली जात होती. शिवरात्रीनिमित्त येथे जत्रा भरते. ही जत्रा तीन ते चार दिवस चालते आणि या जत्रेत मोठी गर्दी असते. गर्भगृहाच्या अगदी वर असलेल्या गर्भगृहाची अनुपस्थिती, जे मंडपाच्या २० पायऱ्या खाली आहे आणि आकाशासह स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन देते. (Top Trending News)

Shravan

देशातील बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे. गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत, अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे जोरून करण्यात आली आहेत. मंडपाच्या खांबांवर कोरीव अशा मूर्ती आहे. या भिंतीवर एकूण ७० प्रतिमा कोरल्या आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती कोरीव आहेत. तसेच मंदिराचा परिसरही अतिशय मनमोहक असल्याचे म्हटले जाते. या मंदिराजवळ एक गुहा असून, ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते. (Top Marathi News)

==============

हे देखील वाचा : Ekadshi : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ‘अजा एकादशी’

Shravan : ‘या’ कारणामुळे उद्याचा चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार ठरणार खास

===============

महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात. युनेस्कोने अंबरनाथ शिव मंदिराला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. वलधान नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आंबा आणि चिंचेच्या झाडांनी वेढलेले आहे. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.