एखादा माणूस इतका शातिर कसा असू शकतो? की तो चक्क आयफेल टॉवरसारखी जगप्रसिद्ध वास्तू विकतो, आणि ते सुद्धा दोनदा! हो, खरं आहे! आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका माणसाबद्दल, ज्याने चोरी आणि फसवणुकीला एक कला बनवलं होतं. त्याचं नाव आहे विक्टर लस्टिंग. पण थांबा, हेच त्याचं खरं नाव आहे की नाही, हे आजतागायत कुणालाच माहित नाही! जगातल्या सगळ्यात मोठ्या नटवरलालबद्दल जाणून घेऊ.
विक्टर लहानपणापासूनच एकदम हुशार होता. कोणतीही गोष्ट तो झटकन शिकायचा. पण अभ्यासात त्याला अजिबात रस नव्हता. त्याला सगळ्यात जास्त आवडायचं ते म्हणजे लोकांशी बोलणं, त्यांच्याशी मैत्री करणं. आणि हो, त्यात तो इतका माहीर होता की कोणालाही आपलंसं करायचा! पण त्याच्या घरची परिस्थिती फारच बिकट होती. त्यामुळे लहान वयातच त्याने रस्त्यावर भीक मागायला सुरुवात केली. जेव्हा भीक मिळायची नाही, तेव्हा तो छोट्या-मोठ्या चोऱ्या करायचा, लोकांचे खिसे कापायचा, आणि हे सगळं तो फक्त दोन वेळच्या जेवणासाठी करायचा. (Eiffel Tower)
एकदा असं झालं की, विक्टर एका रेस्टॉरंट बाहेर भीक मागण्यासाठी उभा होता. त्याने आत बघितलं, तर एक श्रीमंत कुटुंब टेबलभर जेवण मागवून बसलं होतं. पण थोड्या वेळाने त्या लोकांनी ते सगळं जेवण तसंच सोडलं आणि बिल भरून निघून गेले. हे बघून विक्टरला खूप राग आला. त्याच्या डोक्यात विचार आला, “जिथे काही लोकांना दोन वेळचं जेवण मिळत नाही, तिथे हे श्रीमंत लोक खाण्याची अशी नासाडी करतात!” बस, तिथूनच त्याने ठरवलं की आता तो फक्त श्रीमंत लोकांनाच फसवणार, ज्यांना पैशाची कदर नाही. त्यांचेच तो खिस्से कापणार.(Top Stories)
काळ पुढे सरकत होता विक्टर आता १८ वर्षांचा झाला. त्याचं डोकं इतकं तल्लख होतं की त्याने पाच वेगवेगळ्या भाषा शिकल्या होत्या! पण तो चोऱ्या करतच राहिला. युरोपातल्या पेरिस, बुडापेस्ट, प्राग, झ्युरिकसारख्या शहरांमध्ये त्याने चोऱ्या केल्या आणि तिथल्या तुरुंगातही गेला. तुरुंगात असताना तो पत्ते खेळायचा आणि नवीन-नवीन ट्रिक्स शिकायचा. आता चोरीतून त्याला फारसं काही मिळत नव्हतं. मग त्याने ठरवलं, “ युरोप सोडून अमेरिकेत जायचं आणि तिथे मोठा हात मारायचा!” (Eiffel Tower)
विक्टर एका जहाजात बसला आणि न्यूयॉर्कला निघाला. त्या जहाजात खूप सारे श्रीमंत लोक प्रवास करत होते. विक्टरने त्यांना फसवायचा प्लॅन आखला. तो त्या लोकांजवळ गेला आणि म्हणाला, “मी एक म्यूजिक कंपोजर आहे.” त्याच्या बोलण्यावर सगळ्यांचा विश्वास बसला. मग त्याने त्यांना एका बनावट प्रोजेक्टबद्दल सांगितलं आणि म्हणाला, “या प्रोजेक्टसाठी मला फंडिंग हवंय. जर तुम्ही पैसे गुंतवले, तर तुम्हाला त्याचा मी फायदा करून देईल!” त्याच्या गोड बोलण्यात काही लोक फसले आणि त्यांनी त्याला पैसे दिले. पण विक्टरने त्यांना फसवून तिथून पळ काढला! (Top Stories)
पुढे यापेक्षा सर्वात खतरनाक स्कॅम त्याने आणला तो म्हणजे पैसे डब्बल करणारी पेटी. त्याने एका सुताराकडून लाकडी पेटी बनवली. त्यात एक रेडियम रील लावली होती. विक्टर लोकांना सांगायचा, “या पेटीत एक डॉलर टाकला की दोन डॉलर बाहेर येतील!” खरंतर त्याने त्या पेटीत आधीच काही डॉलर्स लपवले होते. जेव्हा तो समोर एक डॉलर टाकायचा, तेव्हा आतून दुसरा डॉलर बाहेर यायचा, जे त्याने आधीच तिथे ठेवलेला असायचा. लोकांना वाटायचं की ही पेटी खरंच पैशाला डबल करते! लोभाने अंध झालेली लोकं ती पेटी खरेदी करायला तयार व्हायची. विक्टर आधी नाटक करायचा की ही पेटी तो विकणार नाही. पण जेव्हा समोरचा माणूस जास्त पैसे द्यायला तयार व्हायचा, तेव्हा तो पेटी विकायला तयार व्हायचा. एका पेटीची किंमत तो एक हजार ते तीस हजार डॉलर्स घ्यायचा, जी खरंतर फक्त दोन डॉलर्सची होती! अशा कित्येक पेट्या विकून त्याने लाखो डॉलर्स कमावले. (Eiffel Tower)
पण विक्टर इतका चतुर होता की तो कधीच आपलं खरं नाव किंवा पत्ता कोणालाच सांगायचा नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी FIR दाखल व्हायच्या.
१९२५ मध्ये विक्टर परत युरोपात आला आणि पेरिसमध्ये राहायला लागला. तेव्हा तो ३५ वर्षांचा होता. अमेरिका आणि कॅनडातल्या पोलिसांना त्याचा शोध होता, पण तो त्यांना चकवत होता. तेव्हा पहिलं महायुद्ध संपलं होतं आणि पॅरिसमध्ये development चं काम सुरू होतं. तेव्हा विक्टरला न्यूजपेपर वाचतान आयफेल टॉवरच्या दुरुस्तीबद्दल बातमी मिळाली. आणि बस, इथेच त्याच्या डोक्यात एक शातिर आयडिया आली!
विक्टरने डाक आणि टेलिग्राफ मंत्रालयाच्या डिप्टी डायरेक्टरचा सोंग केलं. त्याने बनावट कागदपत्रं बनवली आणि काही व्यापाऱ्यांना खबर दिली की, “आयफेल टॉवर दुरुस्त करणं सरकारला परवडत नाही, म्हणून ते ते विकताएत. पण ही गुप्त योजना आहे, त्यामुळे जास्त गाजावाजा होणार नाही.” त्याने “हॉटेल दि क्रॉनिकल” मध्ये एक मीटिंग ठेवली आणि व्यापाऱ्यांना सांगितलं की, “आयफेल टॉवरशी लोकांच्या भावना जोडल्या आहेत, त्यामुळे याचा जास्त जास्त लोकांना सांगू नका.” (Eiffel Tower)
त्याच्या डावात एक व्यापारी फसला. त्याला त्या व्यापाऱ्याने फोन केला आणि म्हणाला की तो आयफेल टॉवर खरेदी करायला तयार आहे. विक्टरने त्याच्याकडून मोठी लाच मागितली. व्यापाऱ्याला वाटलं की सरकारी कर्मचारी असं करतातच. त्याने पैसे दिले, पण विक्टरने पैसे घेऊन रातोरात पळ काढला! व्यापारी दुसऱ्या दिवशी हॉटेलात गेला, तेव्हा त्याला कळलं की त्याला फसवलं गेलंय.
================
हे देखील वाचा : Apollo 13 : ३ लाख २२ हजार किमी लांब ते अंतराळात हरवले होते पण…
================
पण थांबा, इथेच कहाणी संपत नाही! सहा महिन्यांनी विक्टर परत पेरिसला आला आणि पुन्हा तीच स्कीम लोकांना त्याने विकली! नवीन व्यापाऱ्यांना फसवून त्याने आयफेल टॉवर पुन्हा विकलं! यावेळीही त्याने मोठी रक्कम उकळली आणि पुन्हा पळाला. पण यावेळी त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही. पहिल्या व्यापाऱ्याने काही बोललं नव्हतं, पण दुसऱ्या व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार केली. तरीही विक्टर पोलिसांना चकवत पळाला. (Eiffel Tower)
पण त्याला खरा धक्का बसला तो त्याच्या गर्लफ्रेंड बिली मे कडून. बिलीला कळलं की विक्टरचं दुसऱ्यांसोबत सुद्धा affair आहे. तिने रागात येऊन FBI ला खबर दिली की विक्टर न्यूयॉर्कमध्ये आहे. १० मे १९३५ ला विक्टरला अटक झाली. कोर्टाने त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण १९४७ मध्ये, वयाच्या ५७ व्या वर्षी, ब्रेन ट्युमरमुळे तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. आणि हो, आजही एक प्रश्न अनुत्तरित आहे: विक्टर लस्टिंगचं खरं नाव काय होतं? त्याने जगाला फसवलं, पण त्याचं खरं नाव कुणालाच कळलं नाही. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics