अवघ्या काही तासातच भारताचा स्वतंत्र्य दिन सुरु होईल यंदा भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान दिले. आज याच सर्वच महान लोकांमुळे आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत. उद्या मोठ्या अभिमानाने आणि आदराने लाल किल्ल्यावर आपला राष्ट्र ध्वज फडकेल. (Independence Day)
उंच आकाशी फडकणारा राष्ट्रध्वज कायम आपल्याला त्याग, शौर्य, साहस, देशभक्ती, देशप्रेम, निष्ठा, कर्तव्य आदी गोष्टींची जाणीव करून देतो. आपला तिरंगा आज आपली ओळख बनला आहे. संपूर्ण जगामध्ये आज तिरंगा मोठ्या मानाने आणि डौलाने फडकतो तेव्हा भल्याभल्यांचा उर भरून येतो. आज १५ ऑगस्टच्या पूर्व संध्येला आम्ही तुम्हाला या तिरंग्याची निर्मिती कोणी केली? याबद्दल माहिती सांगणार आहोत. (Top Trending Marathi News)
राष्ट्रध्वजाची रचना ही पिंगली व्यंकय्या यांनी केली होती. पिंगली व्यंकय्या हे गांधींच्या विचारांनी प्रेरित झाले होते. पिंगली यांनी अवघ्या तीन तासांत तिरंग्याची रचना केली होती. कोण होते पिंगली व्यंकय्या? पिंगली व्यंकय्या यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथे झाला. पिंगली व्यंकय्या यांचा जन्म तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हनुमंतरायुडू आणि आईचे नाव वेंकटरत्नम्मा होते. त्यांनी मछलीपट्टणम येथे असलेल्या हिंदू हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. मद्रासमधून हायस्कूल पूर्ण केल्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले.(Todays Marathi Headline)
व्यंकय्या यांनी अवघ्या १९ व्या वर्षी ब्रिटीश इंडियन आर्मीमध्ये सहभागी झाले. दक्षिण आफ्रिकेतील अँग्लो-बोअर युद्धादरम्यान ते लष्करात असताना महात्मा गांधी आणि त्यांची भेट झाली. व्यंकय्या हे गांधीजींना भेटून इतके प्रभावित झाले की ते कायमचे भारतात परतले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. ५० वर्षांहून अधिक काळ ते महात्मा गांधींसोबत होते. व्यंकय्या हे भाषातज्ज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि लेखक म्हणूनही परिचित होते. १९१३ मध्ये त्यांनी जपानी भाषेत भाषण देखील केले होते. यामुळे ते जपान वेंकय्या, पट्टी (कापूस) वेंकय्या, झेंडा वेंकय्या या नावाने देखील ओळखले जाऊ लागले. पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड वेंकैया हे टोपणनाव देण्यात आले होते. त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे. (Latest Marathi News)
१९१६ मध्ये व्यंकय्या यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात भारतीय राष्ट्रीय ध्वज कसा असू शकेल, याचा विचार करून ३० डिझाईन्स तयार केल्या होत्या. पिंगली व्यंकय्या यांनी १९१६ ते १९२१ या काळात जगभरातील देशांच्या ध्वजांचा अभ्यास केला. यानंतर १९२१ मध्ये त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याची रचना केली. यावेळी, १९३१ मध्ये, तिरंग्याच्या डिझाइनचा प्रस्ताव मंजूर झाला. वेंकय्या यांनी डिझाईन केलेल्या राष्ट्रध्वजाला विजयवाडा येथे झालेल्या काॅंग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी मान्यता दिली. (Top Trending News)
=======
Independence Day : भारतासोबतच ‘या’ देशांचा देखील असतो १५ ऑगस्टला स्वातंत्र्यता दिन
Independence Day : भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याचा इतिहास
=======
दरम्यान व्यंकय्या यांच्या घरची गरिबी इतकी होती की त्यांचा धाकटा मुलगा चलपती राव उपचाराविना मरण पावला. पिंगली यांचाही झोपडीत मृत्यू झाला. पिंगली व्यंकय्या यांचे ४ जुलै १९६३ रोजी चित्तनगर येथे निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या झोपडीत किंवा त्याच्याजवळ एक रुपयाही सापडला नाही. ब्रिटिश सैन्यात सेवेसाठी त्यांना दिलेल्या जमिनीवर ही झोपडी बांधण्यात आली होती. १९६३ साली पिंगली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी २००९ साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून त्यांच्या मुलीला सरकारकडून पेन्शन देण्यात येत आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics