सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची साखरपुडा झाला. सध्या सोशल मीडियावर याच साखरपुड्याच्या चर्चा होत आहेत. सचिन तेंडुलकरची होणारी सून आणि व्याही कोण आहेत याबद्दल अनेकांना उत्सुकता वाटत आहे. (Arjun Sachin Tendulkar)
आता सचिन तेंडुलकरचे व्याही म्हटल्यावर त्याच्या तोडीस तोड तर असणार ना…? मग नक्की अर्जुनच्या सासरच्या लोकांचा व्यवसाय काय? त्यांची संपत्ती किती? याबद्दल माहिती घेऊया. (Marathi News)
मिळणाऱ्या माहितीनुसार अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा व्यावसायिक रवी घई यांची नात असलेल्या सानिया चांडोकशी झाला आहे. मुंबईत अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एका खाजगी समारंभात झाला. (Todays Marathi Headline)
घई कुटुंब हे देखील मुंबईतील एक मोठे आणि प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंब म्हणून ओळखले जाते. घई कुटुंब इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि कमी कॅलरी असलेल्या ब्रुकलिन क्रीमरी या आईस्क्रीम ब्रँडचे मालक आहेत. ग्रॅव्हिस गुड फूड्स देखील घई कुटुंबाच्या मालकीचे आहे. (Top Marathi News)
सानिया चंडोक ही उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया मुंबईतील वरळी येथे असलेल्या मिस्टर पॉज या प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअरची संस्थापक आहे. सानियाने लंडनमधील स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. (Latest Marathi News)
Graviss Hospitality Ltd नावाची एक कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे. शेअरची करंट मार्केट प्राइस ४२.९२ रुपये आहे. त्या हिशोबाने कंपनीची मार्केट कॅप ३०२.६७ कोटी रुपये आहे. ट्रेंडलाइननुसार, रवि घई यांच्याकडे कंपनीचे २१ कोटीपेक्षा जास्तचे शेअर्स आहेत. संपूर्ण Graviss Group ची नेटवर्थ आणि प्रायवेट एसेट वॅल्यू ८०० ते १००० कोटीच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. (Top Trending News)
==========
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने उरकला साखरपुडा; जाणून घ्या कोण त्याची होणारी बायको?
==========
२०२१ फॅमिली सेटलमेंट एग्रीमेंट (FSA) आणि २०२३ सप्लिमेंटल एग्रीमेंट यावरून रवी घई आणि त्यांचा मुलगा गौरव घई यांच्यात मोठा कौटुंबिक वाद सुरु आहे. रवी घई यांनी ग्रुपच नियंत्रण मुलाकडे सोपवण्याच्या बदल्यात २३५ कोटी रुपये घेतले होते. तर ५१% प्रमोटर शेअर गौरवला ट्रान्सफर केलेले. आता रवी घई यांनी या कराराच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांनी हा करार रद्द करण्यासाठी मुंबई हाय कोर्टात आर्बिट्रेशनची मागणी केलीय. तर काही दिवसांपूर्वी रवी घई यांनी त्यांच्याच मुलाविरोधात फसवणूकीचा खटला दाखल केला. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics