Home » Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने उरकला साखरपुडा; जाणून घ्या कोण त्याची होणारी बायको?

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने उरकला साखरपुडा; जाणून घ्या कोण त्याची होणारी बायको?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Arjun Tendulkar
Share

आपल्या क्रिकेटच्या कौशल्याने संपूर्ण जगामध्ये मोठा नावलौकिक कमवणारा सचिन तेंडुलकर सतत विविध कारणांमुळे प्रकाशझोतात येत असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेऊनही सचिनची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. मात्र सध्या सचिन आणि त्याचे संपूर्ण कुटुंब एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची साखरपुडा झाला आहे. अचानक आलेल्या या मोठ्या बातमीने सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. सोशल मीडियावरदेखील सध्या याच चर्चा रंगताना दिसत आहे. सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की, अर्जुनाची होणारी बायको आणि तेंडुलकर कुटुंबाची होणारी सून नक्की कोण आहे? चला जाणून घेऊया. (Marathi News)

अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा व्यावसायिक रवी घई यांची नात असलेल्या सानिया चांडोकशी झाला आहे. मुंबईत अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका छोटेखानी खाजगी समारंभात झाला. या साखरपुड्याला केवळ दोन्ही कुटुंबांचे जवळचे सदस्य आणि मित्र उपस्थित होते. तेंडुलकर कुटुंबाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र घई कुटुंब हे देखील मुंबईतील एक मोठे आणि प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंब म्हणून ओळखले जाते. ते इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि कमी कॅलरी असलेल्या ब्रुकलिन क्रीमरी या आईस्क्रीम ब्रँडचे मालक आहेत. (Sachin Tendulkar)

दरम्यान अर्जुन तेंडुलकरबद्दल सांगयचे झाले तर २४ सप्टेंबर १९९९ रोजी अर्जुनचा जन्म झाला. वडिलांप्रमाणे अर्जुने देखील करियरसाठी क्रिकेटचे क्षेत्र निवडले. मात्र, आपल्या वडिलांप्रमाणे त्याला आपली चमक दाखवता आली नाही. मात्र नुकतीच अर्जुनने सुरुवात केली आहे. तो सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो आणि २०२५ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात २०२०/२१ च्या स्थानिक हंगामात मुंबईपासून झाली, त्याने हरियाणाविरुद्धच्या टी-२० सामन्यात पदार्पण केले. वरिष्ठ क्रिकेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, त्याने ज्युनियर स्तरावर मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा तो भाग होता. (Top Marathi Headline)

Arjun Tendulkar

अर्जुनाचे करियर
अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत १७ प्रथम श्रेणी, १८ लिस्ट-ए आणि २४ टी- २० सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये अर्जुनने ३३.५१ च्या सरासरीने ३७ विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याने २३.१३ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये अर्जुनच्या नावावर २५ विकेट्स (सरासरी ३१.२) आणि १०२ धावा (सरासरी १७) आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये २५ वर्षीय अर्जुन तेंडुलकरने २५.०७ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १३.२२ च्या सरासरीने ११९ धावाही केल्या आहेत. अर्जुनने आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स (एमआय) कडून ५ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर ३ विकेट्स आणि १३ धावा आहेत. (Latest Marathi News)

कोण आहे अर्जुनची होणारी बायको सानिया चंडोक?
सानिया ही सोशल मीडियापासून नेहमीच लांब असते. सानियाने तिचा साखरपुडा झाल्यावरही कोणतीही पोस्ट केली नाही. सानिया खूपच खासगी व्यक्ती आहे. सानिया मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातून येते. ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया म्हणजेच अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी ही मुंबईतील वरळी येथे असलेल्या मिस्टर पॉज या प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअरची संस्थापक आहे. सानिया ही अर्जुन तेंडुलकरची बालपणीची मैत्रीण आहे. (Top Trending News)

सानियाने लंडनमधील स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण घेतले असून, सानियाचे प्राण्यांवर विशेष प्रेम आहे. ती अॅनिमल लव्हर असल्याचे देखील सांगितले जात आहे. सानियाचे आजोबा रवी घई हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि कमी कॅलरी असलेल्या ‘ब्रुकलिन क्रीमरी’ या आइस्क्रीम ब्रँडचे मालक आहेत. घई कुटुंब पंचतारांकित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल व्यवसायांमध्ये आहे. इतकेच नाही तर ग्रॅव्हिस गुड फूड्स देखील घई कुटुंबाच्या मालकीचे आहे. (Top Stories)

========

Alaska : पुतिन-ट्रम्प भेटीसाठी अलास्कालाच का निवडले ?

========

प्रियांशू गोयलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की अर्जुन तेंडुलकरने सानिया चांडोकशी साखरपुडा केला आहे, सानिया सारा तेंडुलकरची बेस्ट फ्रेंड आहे. एवढंच नव्हे तर सारानेच अर्जुन आणि सानियाची पहिल्यांदा एकमेकांशी ओळख करून दिली. सारा सोशल मीडियावर सक्रिय असून, साराने सानियासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या अद्यापही या दोन्ही कुटुंबांकडून या साखरपुड्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.