थोडे थोडके नाही तर तब्बल १५० वर्ष ज्या ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले, भारतीयांवर अमानुष अत्याचार केले, भारताचे तुकडे केले अशा क्रूर इंग्रजांच्या तावडीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष पूर्ण होत आहे. भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र्य करण्यासाठी अनेक महान लोकांनी हुतात्म्य पत्करले. इंग्रजांविरोधात तीव्र लढा दिला. आज या सर्वच महान लोकांचे आपण ऋणी आहोत आणि कायम राहू कारण यांच्याचमुळे आपण मोकळा श्वास घेत आहोत. (Independence Day News)
१५ ऑगस्ट ही तारीख आपल्यासाठी खूपच खास आहे. ही तारीख कायम आपल्याला आपला भूतकाळ, त्याग, साहस, शौर्य, देशप्रेम आदी गोष्टींची जाणीव करून देते. दरवर्षी १५ ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान देशाचा तिरंगा फडवकतात आणि आपला तिरंगा मोठ्या डौलात आकाशात फडकत असतो. त्याला आकाशात फडकताना पाहून सर्वच भारतीयांचा उर अभिमानाने भरून येतो. कुठेही आपला तिरंगा दिसला की, आपसूकच आपल्या मनात देशभक्ती, देशप्रेम जागृत होते. तिरंगा केवळ झेंडा नाही तर आपला अभिमान आहे, आपली शान आहे. आज जो तिरंगा आपल्या भारतीयांची ओळख आहे, त्याचा इतिहास देखील खूपच खास आहे. हा तिरंगा आपला राष्ट्रध्वज होण्याआधी आपले ५ राष्ट्रीय ध्वज होते. पारतंत्र्यापासून ते स्वतंत्र भारत अस्तित्वात येईपर्यंत भारताचे ध्वज कसे बदलत गेले याचा प्रवास आपण पाहूया. (Marathi News)
भारताचा पहिला अधिकृत ध्वज प्रथम १९०६ साली कोलकाता येथे फडकवण्यात आला. १९०६ मध्ये भारताचा ध्वज हा आजच्या ध्वजापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्या ध्वजामध्ये हिरवा, पिवळा आणि लाल हे तीन रंग होते त्यावर ८ कमळ, चंद्र आणि सूर्य होते तर, ध्वजाच्या मधोमध वंदे मातरम् असे लिहिले होते. मात्र हा ध्वज जास्त वापरात आला नाही. कारण या ध्वजानंतर केवळ एक वर्षातच पुन्हा आपला ध्वज बदलला गेला. (Todays Marathi Headline)
१९०७ मध्ये, भारताला दुसरा ध्वज मिळाला. भारताचा दुसरा झेंडा मादाम भिकाजी कामांनी जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये १९०७ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला होता. मादाम कामा या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटीश राजवटीविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होत्या. या नवीन ध्वजात लाल रंगाऐवजी भगवा रंग आणि कमळाच्या आठ फुलांऐवजी आठ चांदण्या होत्या. या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा केशरी होता. केशरी पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य होते, तर हिरव्या पट्टयावर 8 तारे होते जे भारताच्या तेव्हाच्या आठ प्रांतांचं प्रतीक मानले जात. पहिल्या ध्वजाप्रमाणेच मधल्या पट्ट्यावरही ‘वंदे मातरम’ ही अक्षरं होती. (Top Marathi Headline)
यानंतर भारताचा तिसरा झेंडा १९१७ मध्ये लोकमान्य टिळकांसह ॲनी बेझंट यांनी ध्वज फडकावला. हा ध्वज खूपच वेगळा होता. लोकमान्य टिळक आणि डॉ. अॅनी बेझंट यांनी होमरुल चळवळ सुरू केली होती, जिने चांगलाच वेग घेतला होता. याच चळवळीदरम्यान या दोन नेत्यांनी भारताचा तिसरा नवीन झेंडा फडकवला. या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते. या झेंड्यांवर आधीच्या झेंड्याप्रमाणे कमळं नव्हती. त्याऐवजी यावर ७ चांदण्या होत्या. या सात चांदण्या आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावरही काढल्या होत्या. (Latest Marathi News)
१८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि १९२० सालापर्यंत टिळक आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरत होती. अशातच जेव्हा १९२१ साली आंध्र प्रदेशातील बेझवाडा म्हणजे सध्याच्या विजयवाडामध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले. पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्याने एक झेंडा तयार केला. व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोन रंगांचे पट्टे होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांच्या ऐक्याचे ते प्रतीक होते. मात्र तेव्हा गांधीजींनी इतर सर्व धर्मांबद्दल आदर राखला जावा यासाठी करण्यासाठी यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचे चिन्ह झेंड्याच्या मध्यभागी जोडले. असा तयार झाला नवीन झेंडा. (Top Marathi News)
=======
Independence Day : भारतासोबतच ‘या’ देशांचा देखील असतो १५ ऑगस्टला स्वातंत्र्यता दिन
=======
१९३१ मध्ये पुन्हा एकदा भारताचा ध्वज बदलला. हा ध्वज काहीसा आजच्या ध्वजासारखा होता. या ध्वजाच्या वरच्या बाजूला भगव्या रंगाचा पट्टा, मध्यभागी पांढरा आणि शेवटी हिरवा पट्टा होता. मध्यभागी पांढऱ्या रंगात एक चरखा होता. यानंतर जेव्हा भारताला स्वतंत्र्य मिळणार असल्याचे नक्की झाले तेव्हा स्वतंत्र्य भारताचा झेंडा कसा असेल याबद्द्दल चर्चा झाली. त्यानंतर जुलै १९४७ मध्ये भारताचा ध्वज शेवटचा बदलण्यात आला आणि तो ध्वज आजतागायत वापरात आहे. या ध्वजात वरच्या बाजूला भगवा रंग, मध्यभागी पांढरा आणि तळाशी हिरवा रंग होता चरख्याची जागा अशोक चक्राने घेतली होती. या ध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती. हाच तिरंगा आजतागायत आपण आपला राष्ट्रीय ध्वज म्हणून अभिमानाने मिरवत आहोत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics