माणसे एकमेकांशी संवाद साधतात, त्यानिमित्ताने विचारांचे आदान प्रदान होते. पण आपण कधी असा विचार केला आहे का की, झाडे पण एकमेकांशी बोलत असतील? तुम्ही म्हणाल काही पण काय म्हणताय, झाडे कसं काय बोलतील? पण, जगभरातील वैज्ञानिकांनी संशोधन करून झाडांमधील संवाद कसा चालतो, हे सिद्ध केले आहे. (Do trees have feelings?)
झाडांना माणसांसारखी भावना असतात का (Do trees have feelings?)? त्यांना जखमा होतात का? आणि झाल्या तर त्यांना दुखते का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उठत असतील. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार झाडांमध्ये सामाजिक कौशल्य असतात. आपण जेव्हा जंगलातून चालत असू, तेव्हा जमिनीखालच्या मुळ्या एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतील, हे सुद्धा आपल्याला जाणवत नाही.
झाडे भाषेच्या सहाय्याने नव्हे, तर मुळांच्या मदतीने बोलण्याचा प्रयत्न करत असतात. झाडांची आकाशात जेवढी उंची असते तेवढीच त्याची मुळे जमिनीखाली पसरलेली असतात. एका झाडाची मुळे दुसऱ्या झाडांच्या मुळांशी जोडलेली असतात. प्रत्येक झाडाची मुळे वेगवेगळी असली, तरी ती जमिनीखालून एकमेकांशी जोडली जातात.
झाडे एकमेकांना त्यांच्या मुळांद्वारे अन्न, पाणी आणि कार्बनची देवाणघेवाण करत असतात. खूप कमी लोकांना हे माहित असेल की, एखाद्या झाडाजवळ जर सूर्यप्रकाश पोहोचत नसेल, तर दुसरी झाडे स्वतःच्या फांद्यांचा मार्ग वाळवून दुसऱ्या झाडाला सूर्यप्रकाश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. झाडांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी असते.
झाडांना पाने कधी गळणार, फुले आणि फळे कधी येणार याबद्दल पण माहिती असते. अगदी सूर्य उगवून कधी मावळणार, हे देखील झाडांना माहिती असते. माणसांचे जसे व्यक्तिमत्व असते अगदी तसेच कमी अधिक प्रमाणात झाडांमध्ये व्यक्तिमत्वाला प्राधान्य दिले जाते. माणसांसारखाच झाडांमध्ये भेदभाव होत असल्याचे आढळून आले आहे. (Do trees have feelings?)
एका झाडाची मुळ्या जवळपास २०० मीटर लांब पसरलेली असतात. आपण वर्गात बसलेलो असताना शेवटच्या मुलांपर्यंत जशी वही पोहोचवतो तसेच झाडे जंगलातील झाडांना मदत पोहोचवतात. झाडे एकमेकांशी काय बोलतात, हा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला असेल. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार झाडांमध्ये प्रामुख्याने जिवंत राहण्यासंदर्भात चर्चा होत असते.
====
हे देखील वाचा: घरी बसून जाणून घ्या तुम्ही रोगी आहात की निरोगी! करा फक्त ‘या’ तीन गोष्टी…
====
झाडे ऑक्सिजन आणि कार्बनची एकमेकांशी देवाणघेवाण करत असतातच. काही झाडे एकमेकांना मदत करतात, तर काही झाडे फक्त स्वतःपुरताच विचार करतात. चांगला विचार करणाऱ्या झाडांच्या प्रमाणात वाईट झाडे खूप कमी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. झाडांमध्ये माणसांसारखीच स्मरणशक्ती असते. झाडांना स्वतःची अशी एक बुद्धी असते ज्याद्वारे ते निर्णय घेत असतात, एकमेकांना मदत करत असतात. (Do trees have feelings?)
झाडे आणि मानवाप्रमाणे समुद्र हा जिवंत प्राणी असल्याचा दावा डॉमसारो इमाटो या संशोधकाने केला आहे. याबाबत आपण प्रयोगशाळेत ग्लासातील पाण्याच्या बाबतीत पण करू शकतो. आपण जर पाण्याने भरलेल्या ग्लासच्या परिसरात ‘आय लव्ह यु’ म्हटले तर सूक्ष्मदर्शकाखाली त्या पाण्याचे परीक्षण करून पहा. त्यातून आपल्याला पाण्याच्या द्रव्याचे वेग वेगळे रूप दिसून येईल. आपण जर त्याच ठिकाणी वाईट बोललात तर आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली पाण्याचा बदलेला आकार दिसून येईल. संगीत आणि आजूबाजूच्या वेगवेगळ्या आवाजाच्या परिसरातही हा प्रयोग करून पाहू शकता. जगात जेव्हा सजीव जीवाची निर्मिती झाली तेव्हा पहिला जीव पाण्यातच निर्माण झाला होता.
====
हे देखील वाचा: ‘या’ नैसर्गिक गोष्टीच्या साहाय्याने करा बद्धकोष्टता आणि अपचनावर मात!
====
मानवाच्या बुद्धीप्रमाणेच समुद्राचे पण स्वतःचे एक जाळे असते. त्याप्रमाणेच समुद्रातील पाण्याची हालचाल होत असल्याचे संशोधकांनी शोधल्याचे दिसले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे कंपन होत असते. त्या प्रत्येक कंपनात मानवाच्या भावनांचे आदान -प्रदान होत असते. मानव बोलत असल्यामुळे त्याने संपूर्ण जगावर ताबा मिळवला आहे. उद्या जर झाडे जिवंत झाली, तर काय होईल याचा विचार आपण करायला हवा.
– विवेक पानमंद