Home » ‘या’ नैसर्गिक गोष्टीच्या साहाय्याने करा बद्धकोष्टता आणि अपचनावर मात!

‘या’ नैसर्गिक गोष्टीच्या साहाय्याने करा बद्धकोष्टता आणि अपचनावर मात!

by Team Gajawaja
0 comment
Natural Remedy For Constipation
Share

जेव्हा पोटात गडबड असते तेव्हा संपूर्ण दिवस खराब जातो, हो ना? तुम्ही अपचनासाठी नॅचरल होम रेमेडीजच्या (Natural Remedy For Constipation)  शोधात आहात का? पचनाशी निगडीत सगळ्या समस्या आणि पोटदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि अगदी सहज उपलब्ध असा उपाय हवा आहे का? मग हा उपाय तुमच्या घरातच… नाही … दारातच आहे. 

अपचन ही खूप साधारण समस्या आहे, पण अपचनाचा त्रास होत असताना कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नाही. तुमचं पोट रिकामं असलं, तरी ते जड वाटू लागतं. आपल्या संपूर्ण शरीरावर अपचनाचा वाईट परिणाम होत असतो. जेव्हा पोटातील ॲसिड उलट अन्ननलिकेत प्रवेश करतं तेव्हा अपचनाचा त्रास होतो. यावर योग्य वेळी उपचार केले नाहीत, तर त्यामुळे मळमळ, पोटदुखी, बद्धकोष्टता आणि न खाता पोट जड होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. 

वारंवार होणाऱ्या अपचनाच्या त्रासावर औषधं उपलब्ध आहेत पण यावर काही घरगुती उपाय देखील आहेत (Natural Remedy For Constipation) ज्यामुळे अपचनाचं दुखणं कायमचं गायब होऊ शकतं. असाच एक घरगुती उपाय म्हणजे ‘तुळस’.

Still hooked to home remedies to beat Covid-19?

भारतीय संस्कृतीमध्ये ‘तुळस’ फारच पवित्र मानली जाते. त्यामुळे धार्मिक कार्यासोबतच आयुर्वेदातही तुळशीचा प्रामुख्याने वापर केला जातो. तुळस पचन सुधारणारी एन्झाईम्सची निर्मिती करते त्यामुळे पचनक्रिया सुधारते. 

====

हे देखील वाचा: घरी बसून जाणून घ्या तुम्ही रोगी आहात की निरोगी! करा फक्त ‘या’ तीन गोष्टी…

====

अपचनाचा त्रास असेल तर तुळशीचा उपयोग कसा करुन घ्यायचा ते पाहूयात (Natural Remedy For Constipation)- 

तुळस चाऊन खा

तुळशीची पानं पचनासाठी उपयुक्त असतात. यामुळे पचनाचा वेग वाढतो आणि पोटातला गॅस होत नाहीत. जर पचनामुळे पोट दुखत असेल, तर तुळशीची पानं चाऊन खाल्ल्याने हे दुखणं कमी होतं. जेवणानंतर ४-५ तुळशीची पानं चाऊन खाल्ल्याने तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवायला सुरुवात होईल.

तुळशीची पानं पाण्यात उकळवा

तुळशीची पानं पाण्यात दहा ते पंधरा मिनिटं उकळून ते पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि अपचन यापासून लगेच सुटका मिळते.

====

हे देखील वाचा: सुपरफूड गाजर: हिवाळ्यात गाजर खाण्याचे ६ महत्वाचे फायदे

====

तुळस, आलं आणि मध यांचं चाटण

स्वच्छ धुतलेली पाच ते सहा तुळशीची पानं आणि मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा खलबत्यात ठेचून त्याची जाडसर पेस्ट करा. या पेस्टमध्ये मध घालून त्याचं चाटण तयार करा. हे चाटण मळमळ, उलट्या अशा समस्यांवर फार गुणकारी ठरते. परंतू हे चाटण ताजे बनवावे, आधीच बनवून ठेऊ नये. आल्यामुळे तोंडात लाळ निर्मितीची प्रक्रिया वाढते. परिणामी पचनक्रियेला गती मिळते. तुळस एन्झाईम्सची निर्मिती करते तर मधामुळे पचनमार्गाच्या स्तराला आराम मिळतो.

–    वेदश्री ताम्हणे

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे त्यास वैद्यकीय सल्ला समजू नये. अधिक त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही उत्तम)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.