Home » Hindenburg Disaster : हवेत उडणार Titanic, शेवटच्या ३५ सेकंदात जे झालं…

Hindenburg Disaster : हवेत उडणार Titanic, शेवटच्या ३५ सेकंदात जे झालं…

by Team Gajawaja
0 comment
Hindenburg Disaster | International News
Share

३ मे १९३७ चा तो दिवस होता. जर्मनीच्या फ्रँकफर्टवरून हिंडनबर्ग नावाचं एक भलं मोठं एअरशिप अमेरिकेच्या न्यू जर्सीकडे निघालं होतं. हे फ्रँकफर्ट हिंडनबर्ग Titanic of the Sky म्हणून ओळखलं जायचं. याचं कारण म्हणजे हिंडनबर्गची तुलना टायटॅनिकशी व्हायची, कारण हे एअरशिप जवळपास २४५ मीटर लांब होतं, म्हणजे जवळपास १३ मजली इमारतीएवढं! यात सगळ्या प्रकारच्या लक्झरी सुविधा होत्या. ५ च्या दिवशी या एअरशिपमध्ये क्रू मेंबर्ससह एकूण ९७ प्रवासी होते. जे न्यू जर्सीकडे निघाले होते, पण एअरशिपला पोहचण्यासाठी थोडा उशीरच झाला आणि दुसरा दिवस उजाडला. ६ मे १९३७ ला हिंडनबर्ग न्यू जर्सीला पोहोचणार, पण अचानक हवामान खराब झालं. हवामानामुळे पहिल्यांदा एअरशिप लँड होऊ शकलं नाही. (Hindenburg Disaster)

कंट्रोल रूममधल्या ऑफिसर्संनी पायलटला सांगितलं की, “थोडं वादळापासून लांब जा आणि एअरशिप हवेतच फिरवा. कारण एअरशिपची लँडिंग ही काही सोपी गोष्ट नव्हती. जेव्हा हवामान थोडं निवळलं, तेव्हा लँडिंगची परवानगी मिळाली आणि हिंडनबर्ग लँडिंग साइटकडे निघालं. पण थोड्याच वेळात वाऱ्याची दिशा बदलली आणि वारा हिंडनबर्गच्या विरुद्ध दिशेने जोरात वाहायला लागला. आता कॅप्टनसमोर दोनच पर्याय होते: एक म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हळूहळू लँडिंग साइटकडे जाणं, पण यामुळे खूप उशीर झाला असता. म्हणून कॅप्टनने दुसरा पर्याय निवडला आणि जसं Titanic समुद्रात बुडालं होतं, तसंच या Titanic of the Sky सोबत हवेत घडलं. Titanic of the Sky ची ही स्टोरी जाणून घेऊ. (Top Stories)

Hindenburg Disaster

तर कॅप्टनने ठरवलेला दुसरा पर्याय निवडला पण तो महागात पडला. कॅप्टनने वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने एक जोरदार वळण घेतलं आणि ते लँडिंग साइटवर पोहोचणार इतक्यात, त्या जोरदार वळणामुळे हिंडनबर्गच्या मागच्या भागातल्या स्टीलच्या तारा तुटल्या आणि त्यामुळे एक गॅस चेंबर डॅमेज झालं आणि त्या चेंबरमधून गॅस लीक होऊ लागलं. आता लँडिंग साइटजवळ पोहोचण्याआधी कॅप्टनच्या लक्षात आलं की, एअरशिपचा मागचा भाग खाली झुकतोय आणि लँडिंगच्या वेळी एअरशिप बॅलन्स असणं गरजेचं असतं. (Hindenburg Disaster)

त्यामुळे कॅप्टनने मागच्या भागातून पाणी सोडण्याचे तीन वेळा आदेश दिले आणि एअरशिप बॅलन्स करण्यासाठी काही क्रू मेंबर्सना पुढच्या भागात येण्यास सांगितलं, जेणेकरून मागचं वजन कमी होऊन एअरशिप बॅलन्स होईल. ते तसं झालं ही. फायनली हे एअरशिप लँड होणार होतं. एअरशिप लँड करण्यासाठी त्यातून काही दोरखंड खाली फेकले जातात, ज्यांच्या मदतीने एअरशिप खेचलं जातं. हिंडनबर्ग लँडिंग साइटवर पोहोचलं, थांबलं आणि दोरखंड खाली फेकले गेले. क्रू मेंबर्स दोरखंडांनी एअरशिप खेचत असतानाच अचानक जहाजाच्या मागच्या भागाला आग लागली. जहाजात ढीगभर ज्वलनशील हायड्रोजन गॅस भरलेलं होतं आणि तिने एका झटक्यात पेट घेतला. फक्त मोजून ३५ सेकंद आणि हवेतलं टायटॅनिक म्हणून ओळखलं जाणारं हिंडनबर्ग संपूर्ण जळून खाक झालं. (Top Stories)

असं म्हणतात यावेळी काही प्रवाशांनी उडी मारून आपला जीव वाचवला. पण ३५ जणांचा या आगीत मृत्यू झाला आणि जेव्हा हे जळणारं Titanic of the Sky खाली कोसळलं, तेव्हा खाली उभ्या असलेल्या एका क्रू मेंबरचाही मृत्यू झाला. म्हणजे, या घटनेत एकूण ३६ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये Werner Franz नावाचा १४ वर्षांचा मुलगा त्या एअरशिपमध्ये होता. त्याचं नशीब इतकं चांगलं होतं की, या घटनेत जेव्हा वॉटर टँक फुटला तेव्हा त्याचं पाणी चुकून त्याच्या अंगावर पडलं, ज्यामुळे भयंकर आगीत तो बचावला.

==============

हे देखील वाचा : Six Triple Eight : दुसऱ्या महायुद्धात इतिहास रचणाऱ्या 6888 महिला बटालियन…

==============

जेव्हा या घटनेची चौकशी सुरू झाली, तेव्हा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. चौकशीत कळलं की, जेव्हा हे एअरशिप वादळाचा सामना करत होतं, तेव्हा आकाशातल्या विजेमुळे जहाजाचा बाहेरचा भाग आणि आतलं अ‍ॅल्युमिनियमचं स्ट्रक्चर चार्ज झालं. जेव्हा दोरखंड खाली फेकले गेले, तेव्हा सुरुवातीला ते दोरखंड कोरडे होते, त्यामुळे करंटचा जमिनीशी थेट संपर्क झाला नाही. पण हवामान खराब होतं, पाऊस पडला आणि थोड्या वेळात दोरखंड ओले झाले. (Hindenburg Disaster)

यामुळे जहाजाच्या अ‍ॅल्युमिनियम स्ट्रक्चर मधला करंट हळूहळू जमिनीत उतरला. आतला स्ट्रक्चर करंटमुक्त झाला, पण बाहेरचा भाग अजूनही चार्ज होता आणि यामुळे लीक होणाऱ्या हायड्रोजन गॅसमुळे एक ठिणगी पडली आणि मोठा स्फोट झाला. टायटॅनिक आपल्या पहिल्याच प्रवासात बुडालं होतं, पण हिंडनबर्गने ६२ यशस्वी उड्डाणं केली होती, पण ६३ व्या प्रवासात ही भयंकर घटना घडली. या घटनेनंतर Titanic of the Sky च्या लोकांना आणि अधिकाऱ्यांना कळलं की, हायड्रोजन गॅसमुळे हे एअरशिप तर उडायचं, पण हायड्रोजन गॅस खूपच ज्वलनशील आहे. मग या घटनेनंतर लोकांचा एअरशिपवरचा विश्वास उडाला आणि त्याचवेळी कमर्शियल विमानांची सुरुवात झाली. याचा परिणाम म्हणजे काही काळात संपूर्ण एअरशिप इंडस्ट्रीच बंद पडली.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.