नेहमीच आपण आपल्या चेहऱ्याची आणि सौंदर्याची थोड्याफार प्रमाणात काळजी घेतलीच पाहिजे. यासाठी सतत पार्लरमध्ये जाणे हे खिशाला परवडणारे नसते आणि तेवढा वेळ देखील नसतो. त्यामुळे अनेक महिला थोड्याफार प्रमाणात घरगुती उपाय करून आपले सौंदर्य अधिक वाढवतात. महिलांच्या चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये येणारा एक मोठा अडथळा म्हणजे ब्लॅक हेड्सचा त्रास. नाकावर, हनुवटीवर, कपाळावर हे ब्लॅकहेड्स जास्त येतात. यामुळे आपला चेहरा खराब दिसतो सोबतच याचा आपल्या चेहऱ्यवरच्या त्वचेला त्रास देखील होतो. (Marathi)
ब्लॅकहेड्स म्हणजे त्वचेच्या छिद्रांमध्ये साठलेले ऑईल, डेड स्कीन सेल्स, आणि घाण असते. जे काळ्या डागासारखे दिसतात. या समस्येवर बाजारात अनेक उपाय उपलब्ध आहेत, पण बहुतेक उपाय ते केमिकलयुक्त असतात किंवा महाग असतात. ब्लॅकहेड्स मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि सहज निघायचे नाव घेत नाहीत. बऱ्याचदा तुमची त्वचा स्वच्छ असते, पण तुमचे नाक हे ब्लॅकहेड्सने भरलेले असते. तर, काही घरगुती उपाय करून तुम्ही ब्लॅकहेड्सची समस्या दूर करू शकतात. जाणून घेऊया हेच उपाय. (Beauty Care Tips)
मध आणि लिंब
मधात असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुण त्वचेवरील अशुद्धी दूर करतात. तसेच, मध त्वचेला पोषण देऊन मुलायम बनवतो. दुसरीकडे, लिंबामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असते, ज्यामुळे त्वचेतील मळ काढून छिद्र स्वच्छ केले जातात. एका चमचा मध घ्या आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. या मिश्रणाला चांगले एकजीव करून घ्या. तयार झालेले मिश्रण नाकाच्या भागावर, ब्लॅकहेड्स लावा. हलक्या हाताने गोलाकार चोळत काही मिनिटं मसाज करा. मसाज केल्यामुळे मिश्रण त्वचेच्या छिद्रात खोलवर जाऊन मळ काढण्यास मदत करते. मसाज झाल्यावर १० मिनिटांसाठी मिश्रण तसेच राहू द्या. त्यानंतर धुवा. (Marathi News)
टोमॅटो
ब्लॅकहेड्स आणि नाकावरील घाण काढण्यासाठी टोमॅटो बारीक मॅश करून पेस्ट तयार करा. या टोमॅटोच्या पेस्टमध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला आणि नाकावर लावा. २० मिनिटांसाठी तसेच राहुद्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. (Todays Marathi Headline)
लिंबू आणि दालचिनी
एका वाटीत दालचिनी पावडर, एक चमचा लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. तयार पेस्ट नाकावर लावा. १५ मिनिटानंतर पेस्ट काढा आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्या यामुळे ब्लॅकहेड्स दूर होतील. (Top Marathi Stories)
ग्रीन टी
ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी ग्रीन टी देखील उपयुक्त आहे. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी एक चमचा ग्रीन टी पाण्यात मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. (Latest Marathi Headline)
तांदळाचे पीठ
त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेण्यात तांदळाचे पीठ फायदेशीर ठरते. कोरफड जेलमध्ये तांदळाचे पीठ मिक्स करून लावल्यास चेहरा उजळतो, ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. आठवड्यातून तीन वेळा या फेस स्क्रबचा वापर केल्यास ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या दूर होईल. (Top Marathi News)
हळद
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध हळद ब्लॅकहेड्सवर प्रभावी ठरते. हळदीमुळे त्वचा एक्सफोलिएट होते आणि त्वचेची खोलवर स्वच्छता होते. हळदीमध्ये खोबरेल तेल घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटं लावून ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. (Marathi Latest News)
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा एक्सफोलिएटर म्हणून काम करतो आणि चेहऱ्यावरील तेल देखील शोषून घेतो. हा उपाय करण्यासाठी एका वाटीत दोन चमचे पाणी घ्या आणि त्यात तीन छोटे चमचे बेकिंग सोडा मिक्स करा आणि त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा. (Top Stories)
==========
Health : जेवणानंतर अंघोळ करणे योग्य की अयोग्य?
==========
वाफ घेणे
आठवड्यातून १-२ वेळा चेहऱ्यावर वाफ घेणे ब्लॅकहेड्ससाठी खूप फायदेशीर आहे. वाफ छिद्रे उघडते आणि साचलेली घाण काढून टाकते. वाफ घेतल्यानंतर, ब्लॅकहेड्स कापसाने हलक्या हाताने स्वच्छ करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि मॉइश्चरायझर लावा. ही पद्धत नैसर्गिक आणि प्रभावी आहे. (Social News)
(टिप : हे उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics