Home » Janmashtami :श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती आणि पूजा विधी

Janmashtami :श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती आणि पूजा विधी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Janmashtami | Top Marathi Headlines
Share

नुकताच आपण रक्षाबंधनाचा सण साजरा केला. आता सगळ्यांना वेध लागले ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे. अवघ्या काही दिवसांवर जन्माष्टमीच्या उत्सव येऊन ठेपला आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी या तिथीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जन्म दिवस हा कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो.(Marathi)

भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णांनी जन्म घेतला होता. संपूर्ण भारत देशामध्ये तसेच भारताबाहेर देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठया उत्साहामध्ये साजरी केली जाते. हा सण मोठ्या उत्साहाने कृष्ण मंदिरांसोबतच घरांमध्ये साजरा केला जातो. यासाठी आता सर्वत्र जोरदार तयारी चालू असेल. जन्माष्टमीचा सण म्हणजे कृष्ण भक्तांसाठी किंबहुना सर्वच लोकांसाठी एक मोठा सोहळा असतो. यंदा जन्माष्टमी नक्की कधी आहे? हा सण कसा साजरा करतात? जन्मष्टमीचा इतिहास काय? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण या लेखातून माहिती जाणून घेऊया. (Marathi News)

हिंदू कालगणनेनुसार श्रावण महिन्यात तर इंग्रजी कॅलेंडर नुसार ऑगस्ट महिन्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. श्रावण पौर्णिमेनंतर भाद्रपद महिना सुरू होतो. या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. वैदिक कॅलेंडरनुसार, कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. श्रीकृष्णाचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला रात्री १२ वाजता झाला होता त्यामुळे अनेकजण बरोबर मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्णाचा पाळणा हलवून जन्माष्टमी पारंपारिक आणि धार्मिक पद्धतीने साजरी करतात. (Top Marathi Headline)

Janmashtami

कृष्ण जन्माष्टमी तिथी
अष्टमी तिथी प्रारंभ : १५ ऑगस्ट : रात्री ११.४९, अष्टमी तिथी समाप्ती : १६ ऑगस्ट : रात्री ९.३४
आपण सर्वच सण सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार किंवा उदय तिथीनुसार साजरे करतो, म्हणूनच कृष्ण जन्माष्टमी यंदा १६ ऑगस्ट रोजी साजरी करावी. कृष्ण जन्माष्टमीसाठी काही शुभ मुहूर्त देखील आहेत. निशिता वेळ : पहाटे १२:०४ ते १२:४७ पर्यंत, ब्रह्म मुहूर्त : पहाटे ०४:२४ ते ०५:०७ पर्यंत, विजय मुहूर्त : दुपारी ०२:३७ ते ०३:३० पर्यंत, संधिप्रकाश वेळ : संध्याकाळी ०७:०० ते ०७:२२ पर्यंत. (Latest Marathi Headline)

===================

हे देखील वाचा : Janmashtami : २०० वर्ष जुने ऐतिहासिक नाशिकमधील मुरलीधर मंदिर

===================

दरवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी भाविक भक्त रात्री जागरण करतात, भजन करतात, गवळणी म्हणून जन्मोत्सव साजरा करतात. बाळ कृष्णाला सजवून त्याला सुंदर अलंकार करून पाळण्यामध्ये ठेवले जाते आणि कृष्णगीत किंवा सुंदर भजने म्हटली जातात. अनेक घरांमध्ये जनामाष्टमीच्या या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात़ त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. कृष्ण जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णाचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. या दि‍वशी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्यास श्रीकृष्णाचा आशीर्वाद अधिक ​प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतो. (Todays Marathi Headline)

सर्वप्रथम ज्या ठिकाणी पूजन करावयाचे आहे, ती जागा स्वच्छ करून घ्यावी. देवतेच्या आसनाखाली रांगोळी काढावी. बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. ज्यांना श्रीकृष्णाची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य नाही, त्यांनी ‘पंचोपचार पूजा’ करावी. अर्थात देवाला गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप ओवाळून नैवैद्य दाखवावा. कृष्ण पूजन करतांना ‘सपरिवाराय श्रीकृष्णाय नमः ।’ हा नाममंत्र म्हणत एक एक उपचार श्रीकृष्णाला अर्पण करावा. श्रीकृष्णाला दही-पोहे आणि लोणी यांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करावी. पूजन झाल्यानंतर काही वेळ श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा जप करावा. (Marathi Trending News)

Janmashtami

श्रीकृष्ण जन्म कथा
आख्यायिकेनुसार कंसने आपल्या वडील उग्रसेन राजाचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले. कंसाला देवकी नावाची बहीण होती. देवकीवर त्यांचे खूप प्रेम होते. कंसने देवकीचे लग्न वासुदेवाशी लावले. पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल अशी आकाशवाणी होती.(Top Marathi News)

आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी व वसुदेवांना तुरुंगात टाकले. यानंतर क्रूर कंसाने देवकी आणि वसुदेवाच्या सात मुलांचा वध केला. पण जेव्हा देवकीचे आठवे अपत्य जन्माला येणार होते, तेव्हा आकाशात वीज चमकली. समजुतीनुसार मध्यरात्री 12 वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तेथे देखरेख करणारे सर्व सैनिक गाढ झोपेत गेले. असे म्हणतात की त्या वेळी भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वसुदेव-देवकीला सांगितले की ते देवकीच्या पोटातून जन्म घेणार आहे.  (Latest Marathi News)

यानंतर त्यांनी स्वत:ला अवतारला गोकुळात नंद बाबा जवळ सोडून याला सांगितले आणि त्यांच्या घरी जन्माला आली कन्येला मथुरेत कंसाकडे सोपवून द्यावे असे सांगितले. यानंतर वसुदेवाने परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. त्यांनी कान्हाला नंदा बाबांकडे सोडले आणि गोकुळातून आणलेली मुलगी कंसाकडे सोपवली. नंदा आणि यशोदांनी श्रीकृष्णाचे संगोपन केले. (Top Stories)

===================

हे देखील वाचा : Shravan : श्रावण विशेष : त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास

Tulsidas: रामचरितमानस ग्रंथाची रचना करणाऱ्या संत तुलसीदासांची आज जयंती

===================
लहानपणी कृष्णाने महान कार्य केले जे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नव्हते. त्याच्या जन्माच्या काही काळानंतर, त्यांनी कंसाने पाठवलेल्या राक्षसी पुतनाचा वध केला, त्यानंतर शाक्तसुर, त्रिनवर्त इ. राक्षसांचे वध केले. नंतर गोकुळ सोडून नंद गावी आल्यावर तेथेही त्यांनी अनेक लीला केल्या. ज्यात गोचरण लीला, गोवर्धन लीला, रास लीला इत्यादी प्रमुख आहेत. यानंतर श्रीकृष्णाने मथुरेत मामा कंसाचा वध केला. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.