आज श्रावणातला तिसरा सोमवार. श्रावण महिना शिवाला समर्पित असल्याने या महिन्यात येणाऱ्या सोमवाराला विशेष महत्व असते. त्यातही तिसरा सोमवार अधिकच खास असतो. श्रावणातल्या सोमवारी शंकरांच्या मंदिरात जाऊन किंवा घरी देवाची पूजा केली जाते, देवाला अभिषेक करतात, बेल वाहतात आणि शिवामूठ वाहतात. यासोबतच श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याची आणि ब्रह्मागिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्याची मोठी परंपरा आहे. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. (shravan 2025)
श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकमध्ये भरपूर भाविक त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी पोहचतात. ब्रह्मगिरी पर्वताला हिंदू धर्मात मोठे महत्व आहे. याच ब्रह्मगिरी पर्वतावर गंगा नदीचा गोदावरी रूपामध्ये उगम झाला आहे, शिवाय येथेच भगवान शिवानी आपल्या जटा आपटल्या होत्या. आज श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारच्या निमित्ताने जाणून घेऊया त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास आणि माहिती. (Marathi News)
महादेवाच्या महत्वाच्या अशा १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ओळखले जाते. हे ज्योतिर्लिंग नाशिक शहरापासून केवळ २८ किलोमीटरवर स्थित आहे. याबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. असे मानले जाते की, येथे स्थित शिवलिंग स्वतः प्रकट झाले होते. म्हणजेच ते कोणी स्थापित केले नव्हते. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आहे. हे मंदिर इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळे आहे. भारतातील एक महत्वाचे ऐतिहासिक मंदिर म्हणून देखील त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे. (Todays Marathi Headline)
त्र्यंबकेश्वर मंदिर निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले आहे. मंदिराच्या आजूबाजूला मोठमोठे हिरवाईने नटलेले डोंगर पहायला मिळतात. पावसाळ्यात तर या मंदिराचे रुपडे अधिकच खुलते. त्र्यंबकेश्वर मंदिराचे बांधकाम काळ्या दगडांचे असून या दगडांवरील कोरीव काम आणि त्याची भव्यता जगभर प्रसिद्ध आहे. संपूर्ण मंदिर काळ्या दगडांनी बनलेले आहे. चौकोनी मंडप आणि मोठे दरवाजे हे मंदिराचे खास वैशिष्ट्ये आहे. (Top Marathi Stories)
===================
हे देखील वाचा : shravan : श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ व्हायची?
===================
मंदिराच्या आत एक सोन्याचा कलश आहे आणि शिवलिंगाजवळ हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांनी जडलेले मुकुट ठेवलेले आहेत. या सर्व गोष्टींना पौराणिक महत्त्व आहे. या मंदिरामध्ये भगवान शिवाच्या पिंडीवर साळुंखी अर्थात जो गोलाकार भाग असतो तो नाहीये. त्याऐवजी इथे तीन खड्डे पाहायला मिळतात. एका छोट्या खड्ड्यात तीन छोटी शिवलिंगे आहेत. ही तीन शिवलिंगे ब्रह्मा, विष्णू आणि शिव म्हणून ओळखली जातात. (Top Marathi Headline)
मुघल काळातील राज्यकर्त्यांनी भारतातील अनेक शहरांतील हिंदू देवतांची देवस्थाने नष्ट केली होती, त्यापैकी एक नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर होते. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या ‘हिस्ट्री ऑफ औरंगजेब’ या पुस्तकात याबद्दल उल्लेख केलेला दिसतो. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, १६९० मध्ये मुघल शासक औरंगजेबाच्या सैन्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंग तोडले. मंदिराचेही मोठे नुकसान केले. त्यांनी मंदिरावर मशिदीचा घुमट बनवला होता. (Marathi Latest Headline)
औरंगजेबानेही नाशिकचे नावही बदलले होते. पण १७५१ मध्ये मराठ्यांनी पुन्हा नाशिक काबीज केले, त्यानंतर हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक हजेरी लावतात. (Top Trending News)
नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५ – १७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. मंदिराच्या कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला. (Top Marathi News)
त्र्यंबकेश्वर मंदिराची आख्ययिका
प्रचलित असलेल्या आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी ब्रह्मगिरी पर्वतावर देवी अहिल्येचे पती ऋषी गौतम यांनी वास्तव्य करून तपश्चर्या केली होती. या परिसरात असे अनेक ऋषी होते जे गौतम ऋषींचा हेवा करत होते आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत होते. एकदा सर्व ऋषींनी गौतम ऋषींवर गायींच्या हत्येचा आरोप केला. या हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी गंगा देवीला येथे आणावे लागेल, असे सर्वांनी सांगितले. त्यानंतर गौतम ऋषींनी शिवलिंगाची स्थापना करून पूजा सुरू केली. (Latets Marathi News)
ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव आणि माता पार्वती तेथे प्रकट झाले. देवाने वरदान मागायला सांगितले. तेव्हा गौतम ऋषींनी गंगा देवीला त्या ठिकाणी पाठवण्यासाठी शिवाकडे वरदान मागितले. देवी गंगा म्हणाली की, जर शिव देखील या ठिकाणी थांबले तर ती देखील येथेच राहील. भगवान शिवाने गंगेच्या विनंतीवरून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तेथे वास्तव्य करण्याचे मान्य केले आणि गंगा नदी गौतमीच्या रूपाने तेथे वाहू लागली. गोदावरी हे गौतमी नदीचे नाव आहे. (Top Stories)
===================
हे देखील वाचा : Uttarakhand : फक्त राखीपौर्णिमेलाच उघडतात या मंदिराचे दरवाजे !
===================
त्र्यंबकेश्वर मंदिराचे अजून अनेक वैशिष्ट्ये आहेत. येथे दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात. मंदिराजवळ तीन पर्वत आहेत, जे ब्रह्मगिरी, निलगिरी आणि गंगा द्वार म्हणून ओळखले जातात. ब्रह्मगिरी हे शिवाचे रूप मानले जाते. नीलगिरी पर्वतावर निलंबिका देवी आणि दत्तात्रेय गुरु यांचे मंदिर आहे. गंगा द्वार पर्वतावर गोदावरी किंवा गंगा देवीचे मंदिर आहे. मूर्तीच्या पायातून पाण्याचे थेंब थेंब थेंब पडतात, जे जवळच्या तलावात जमा होते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics