ऑगस्ट महिन्यातील पाहिला आठवडा हा जागतिक स्तनपान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक आईसाठी आपल्या बाळाला स्तनपान करणे म्हणजे स्वर्गीय सुख समजले जाते. बाळाला स्तनपान करणे प्रत्येक हा सर्व आईचा हक्कच असतो. किंबहुना तिला निसर्गाने दिलेले एक वरदानच आहे. आईचं दूध म्हणजे बाळासाठी अमृतच असते. जन्माला आल्यानंतर पुढील सहा महिने बाळ याच दुधावर अवलंबून असते. आई बाळाला जे स्तनपान करते, त्यामुळे तिचे आणि बाळाचे नाते घट्ट व्हायला सुरूवात होते. स्तनपान केल्याने अनेक फायदे आईला आणि बाळाला होतात. मुख्य म्हणजे बाळाला स्तनपान केल्यामुळे बाळाचा आजारांपासून बचावही होतो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर पुढील ६ महिने केवळ त्याला आईचे दूधच बाळाला देण्याचा आग्रह डॉक्टर करतात. (Marathi News)
सामान्य प्रकृती असलेल्या आणि नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या बाळाला जन्मानंतर तीस मिनिटांच्या आत आईच्या पोटावर किंवा छातीवर ठेवले जाते. त्यामुळे बाळाला उब मिळते. स्तनपान जेवढ्या लवकर सुरू होईल, तेवढ्या लवकर आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतो. स्तनपान हे फक्त मुलासाठीच फायदेशीर नाही तर आईला अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे देखील देतात. जागतिक स्तनपान सप्ताह १९९२ मध्ये सुरू झाला. आईच्या दुधामुळे मुलाचा योग्य विकास होण्यास मदत होते. मात्र आजच्या आधुनिक काळात अनेक महिला विविध कारणांमुळे स्तनपान करण्यास नकार देतात. पण हे असे करणे त्या बाळाच्या आणि आईच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अजिबातच योग्य नसते. म्हणूनच महिलांमध्ये स्तनपान करण्याचे महत्व अधिकाधिक वाढवण्यासाठी संपूर्ण जगभरात जागतिक स्तनपान दिन साजरा केला जातो. मग स्तनपान करण्याचे महत्व नक्की कोणते? पाहूया. (Todays Marathi Headline)
स्तनपान करण्याचे बाळाला होणारे फायदे
* पहिल्या वर्षभरात बाळाचा मेंदू दुपटीने वाढतो, नवनवीन न्यूरल कनेक्शन्स जोडली जातात. दर सेकंदाला १ मिलियन कनेक्शन्स इतका याचा वेग प्रचंड असतो. अशावेळी जास्तीत जास्त पोषण मिळणे अत्यावश्यक असते. हे सर्व पोषण बाळांना आईच्या दुधातून मिळते.
* आईचे दूध हे एंटीबॉडी आणि एंजाइम आवश्यक पोषण प्रदान करते, जे मुलाच्या वाढीस मदत करते. ज्यामुळे त्याचा बुद्ध्यांकही वाढतो.
* बाळाला आईचे दूध सुरू असेपर्यंत वेगळे पाणी पाजण्याची गरज नसते. दूधातून बाळाला अधिक प्रमाणातील लॅक्टोज, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार आणि पाणी मिळते. त्यामुळे त्याची तहानही भागते. द्रव घटक हे स्तनांच्या अग्रभागातील दूधातून मिळतात आणि मागील भागातील दुधात स्निग्धांश मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे बाळाची भूक भागते. स्तनपानामुळे बाळाची तहान आणि भूक दोन्ही भागते. (Latest Marathi News)
* आईचे दूध त्यांच्यासाठी आदर्श आहार असल्याचे सिद्ध होते कारण त्यात 87% पाणी, 1% प्रथिने, 4% चरबी आणि 7% कार्बोहायड्रेट याशिवाय इतर अनेक पोषक घटक असतात. यासह, आईचे दूध देखील पचण्यास सोपे आहे आणि प्रत्येक बाळाच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केले जाते. जे बाळांच्या निरोगी विकासास मदत करते. (Top Trending News)
* स्तनपान करणाऱ्या बाळांना ऑटिझम स्पेक्ट्रम विकार, एडीएचडी आणि इतर वर्तणुकीशी संबंधित आव्हाने उद्भवण्याची शक्यता कमी असते. याव्यतिरिक्त, अकाली जन्मलेल्या बाळांसाठी, ज्यांना न्यूरोडेव्हलपमेंटल कमतरतांचा धोका जास्त असतो, त्यांच्यासाठी मज्जासंस्थेवर आईचे दूध संरक्षण कवच ठरते. (Top Stories)
==========
Health : जेवणानंतर अंघोळ करणे योग्य की अयोग्य?
Health : घरच्या घरी नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी सोप्या ट्रिक्स….
==========
स्तनपानाचे आईला होणारे फायदे
* स्तनपानामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण कमी होते.
* बाटलीने दूध भरणाऱ्या मातांच्या तुलनेत स्तनपान करणाऱ्या मातांना कमीत कमी कालावधीत वजन कमी करण्यास मदत होते.
* आई आणि बाळाचे नाते दृढ होण्यास मदत.
* स्तनपान करताना ऑक्सिटोसिन हार्मोन सोडला जातो, ते वजन कमी करण्यास मदत करू शकते आणि आई तिचा फिगर परत मिळवू शकते.
* जी माता स्तनपान करते ती ओवरीचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून संरक्षित राहते.
* स्तनपान नंतर बाळ किमान दोन तास शांत झोपत असेल दिवसातून सहा ते आठ वेळा सु-शी करत असेल व बाळाचे वजन योग्यरीत्या वाढत असेल तर याचा अर्थ बाळाला पुरेसे दूध मिळत आहे. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics