Home » Mathura Sridharan : एका टिकलीवरुन अमेरिकेत वाद !

Mathura Sridharan : एका टिकलीवरुन अमेरिकेत वाद !

by Team Gajawaja
0 comment
Mathura Sridharan
Share

भारतीय वंशाची अमेरिकन वकील मथुरा श्रीधरन यांची ओहायो राज्याच्या सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आनंदाच्या बातमीनंतर मात्र मथुराला ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्याला कारण ठरली ती तिच्या कपाळावर असणारी टिकली. ओहायो राज्याची सॉलिसिटर जनरल झाल्यावर मथुराला सोशल मिडियाच्या माध्यममातून ट्रोल करत तिच्या कपाळावर असणारी टिकली आणि तिच्या भारतीय वंशाबाबत प्रश्न विचारण्यात आले. याशिवाय बिगर अमेरिकन व्यक्तिला एवढ्या महत्त्वाच्या जागी कसे बसवण्यात आले, असा प्रश्नही विचारण्यात येऊ लागला. मथुरावर होणारे हे ट्रोलिंग एवढं वाढलं की, मथुराच्या बचावासाठी ओहायोचे अॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट पुढे आले आहेत. त्यांनी मथुरावर टीका करणा-यांना, तिचे नाव किंवा रंग तुम्हाला त्रास देत असेल, तर समस्या तुमच्यात आहे, मथुरा किंवा तिच्या नियुक्तीमध्ये नाही, अशा स्पष्ट शब्दात समज दिली आहे. मथुरा श्रीधरन यांच्या निमित्तानं एरवी प्रगतशील, आधुनिक विचारसरणीचा देश म्हणून मिरवणा-या अमेरिकन नागरिकांची मानसिकता जगासमोर आली आहे. (Mathura Sridharan)

ओहायो हे ईशान्य अमेरिकेतील एक राज्य आहे. अमेरिकेच्या 50 राज्यांमध्ये ओहायो एकूण क्षेत्रफळात 34 व्या क्रमांकावर आहे. तथापि, लोकसंख्येच्या बाबतीत हे राज्य अव्वल स्थानावर आहे. या राज्याचे नाव ओहायो नदीवरून पडले आहे. ओहायो म्हणजे, ज्या नदीचे पाणी महान आहे, असे. ओहायो हे राज्य शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि आधुनिक अमेरिकेचे प्रतिबिंब मानले जाते. मात्र याच ओहायो राज्यातील नागरिकांची संकुचित मानसिकता समोर आली आहे. ओहायो राज्याच्या 12 व्या सॉलिसिटर जनरल म्हणून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या मथुरा श्रीधरन यांची नियुक्ती झाली. ही नियुक्ती जाहीर होताच, मथुरा श्रीधरन यांच्यावर मोठ्याप्रमाणात सोशल मिडियावरुन ट्रोलिंग करण्यात आले. या ट्रोलर्सनी मथुरावर टीका करतांना अत्यंत खालची भाषा वापरली. (International News)

यामुळे मथुराला ओळखणा-यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. शेवटी मथुराच्या बचावासाठी ओहायोचे अॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट पुढे आले. त्यांच्यासोबतच ओहायोचे दोन माजी सॉलिसिटर जनरल, बेंजामिन फ्लॉवर्स आणि इलियट गॅसर हे सुद्धा मथुरासाठी पुढे आले. मथुराच्या नावाची शिफारस आपणच केली असून तिच्यासारख्या हुशार आणि कर्तबगार महिलेला हे पद मिळाल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर मथुरासाठी पुढे आलेल्या अॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट म्हणाल्या की, मथुराच्या नियुक्तीबद्दल मी आनंदी आहे. मथुरा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात ओहायो राज्याच्या वतीने खटला लढवेल. तिचा अभ्यास पद्धती ही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे मथुरावर टीका करणा-यांची तोंड बंद झाली आहेत. (Mathura Sridharan)

मथुराने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, संगणक विज्ञान आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. 2010 मध्ये तिने न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ मधून ज्युरिस डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे. मथुराला अभ्यासाव्यतिरिक्त प्रवास आणि स्वयंपाकाची आवड आहे. ती तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या अनेक पाककृती शेअर करत असते. याशिवाय मथुराने शास्त्रीय गाण्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. ती उत्तम गायिका आहे. तिने 2015 मध्ये अश्विन सुरेशशी लग्न केले. एवढं सगळं करत मथुरानं अमेरिका कोर्ट ऑफ अपील आणि जिल्हा कोर्टाच्या न्यायाधीशांसाठी क्लर्क म्हणूनही काम केले आहे. याच प्रतिभावान मथुराची निवड ओहायो राज्याच्या सॉलिसिटर जनरल म्हणून झाल्यावर ट्रोलर्सनी तिच्या निष्ठा आणि क्षमतेवर शंका व्यक्त केली आहे. काही ट्रोलर्सनी मथुराच्या टिकलीवरही वाईट शब्दात शेरे लावले आहेत. (International News)

===================

हे देखील वाचा : Melania Trump : अमेरिकेची फर्स्ट लेडी युक्रेनची गुप्तहेर !

===================

सध्या जगातील अनेक देशांमधून भारतीयांविरुद्ध वांशिक हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि अमेरिकेतील भारतीय नागरिकांना त्यांच्या रंगामुळे हिंसाचाराचे बळी व्हावे लागले आहे. आता अमेरिकेत उच्च प्रोफाइल पदावर असलेली एक भारतीय महिला वांशिक टिप्पणीची बळी ठरली आहे. मथुराला ट्रोल करणा-यांनी ती कुठल्या धर्माची आहे, आणि तिची निष्ठा ती ज्या मुळ देशाची आहे, त्या देशाशी बांधील असल्याचे सांगितले आहे. मात्र मथुराचा बचाव कऱण्यासाठी पुढे आलेल्यांनी मथुराचा जन्म हा अमेरिकेतलाच असून ती पूर्णतः अमेरिकन आहे. शिवाय तिच्यासारख्या कर्तबगार महिलेल्या हाती ओहायोचे भविष्य सुरक्षित असल्याची हमी देत मथुराला भक्कम पाठिंबा दिला आहे. (Mathura Sridharan)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.