सायबेरियाच्या बर्फाळ जंगलात, तिथं एक अशी थरारक घटना घडली होती, तिथे रशियन सैनिक आणि Aliens यांच्यात लढाई झाली होती. जिथे रशियन सैनिकांना Aliens ने दगड बनवून टाकलं होतं. ही माहिती CIA च्या डीक्लासिफाइड डॉक्युमेंट्समधून समोर आली. पण हे सत्य आहे की, कोणीतरी पसरवलेली अफवा? आणि जर सत्य आहे, तर रशिया आणि अमेरिका आजही याबद्दल का गप्प आहेत? चला तर मग आपण जाणून घेऊ. (Russian Soldiers)
तर, गोष्ट सुरू होते 1989 साली, तेव्हा कोल्ड वॉरचा काळ होता. अमेरिका आणि सोविएत यूनियन यांच्यात कधीही युद्ध पेटू शकत होतं. सोविएत यूनियनमध्येही अंतर्गत गोंधळ कमी नव्हता. त्यामुळे रशियन सैनिक ठिकठिकाणी ट्रेनिंग करत असायचे, कधी काय परिस्थिती येईल, कोणाला माहित? असंच एका नॉर्मल ट्रेनिंग डे ला, सायबेरियाच्या जंगलात 25 सैनिक आपापले इक्विपमेंट्स चेक करत होते. बर्फाचं जंगल, थंडीचा कडाका, सगळं काही नेहमीसारखं वाटत होतं. पण अचानक, त्यांना आकाशात काहीतरी दिसलं! (Top Stories)
लांबून एक विचित्र ऑब्जेक्ट त्यांच्या दिशेने येत होता. जवळ येताच त्यांना कळलं, हे काही नॉर्मल विमान नाही. विचित्र आकाराचं, चकाकणारं, आणि इतक्या कमी उंचीवर उडणारं ते विमान होतं की नाही हेही त्यांना कळत नव्हतं! ते UFO होतं. त्या भागात फ्लाइंग झोन नव्हता, आणि असं काहीतरी त्यांनी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. सैनिकांना वाटलं, कदाचित हा शत्रूचा हवाई हल्ला असेल. कोल्ड वॉरच्या काळात सावध राहणं गरजेचं होतं. त्यांनी लगेच मिसाइल लॉन्चर तयार केलं आणि एक मिसाइल त्या विचित्र विमानावर म्हणजे UFO वर डागलं. मिसाइल अगदी निशाण्यावर लागलं होतं आणि UFO जंगलात कोसळलं. (Russian Soldiers)
सैनिकांना वाटलं, त्यांनी शत्रूचा डाव परतवून लावलाय, कारण इतक्या जबरदस्त हल्ल्यातून कोण जिवंत राहील? पण तरीही, खात्री करायला ते क्रॅश साइटवर गेले. आणि तिथं त्यांना जे दिसलं, त्याने त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली! त्या जळलेल्या UFO मधून कोणीतरी हालचाल करताना त्यांना दिसत होतं. म्हणजे, आत कोणीतरी जिवंत होतं! सैनिकांना वाटलं, या UFO ची माहिती आपल्या हाती लागली आहे, कोल्ड वॉरच्या काळात अशी Intel म्हणजे जॅकपॉट! त्यामुळे ते हळूहळू त्या UFO जवळ गेले. पण, अचानक त्या UFO मधून पाच विचित्र आकृत्या बाहेर आल्या! (Top Stories)
या आकृत्या माणसासारख्या होत्या, पण माणूस नव्हता. छोटी उंची, मोठमोठी डोकी, आणि डोळे इतके काळे, की त्यात फक्त अंधारच अंधार दिसत होता! सैनिक काही समजायच्या आत, या पाच आकृत्यांनी काहीतरी जादू केली. ते एकमेकांत मिसळले, आणि त्यातून एक चमकणारा, भिनभिणणारा, मोठ्या फुटबॉल सारखा गोलाकार तयार झाला. सैनिक उत्सुकतेने आणखी पुढे गेले, पण त्या गोलकाराची चमक वाढतच गेली. इतकी, की ती पाहणं आणि ऐकणंही असह्य झालं. आणि मग… बूम! तो गोलकार फुटला, आणि एक प्रचंड प्रकाश सगळीकडे पसरला. (Russian Soldiers)
25 पैकी दोन सैनिक, जे थोडे लांब उभे होते, त्यांनी डोळे बंद केले. काही सेकंदांनी प्रकाश कमी झाला, तेव्हा त्यांनी डोळे उघडले. आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून ते घाबरले! जिथे त्यांचे 23 सहकारी उभे होते, तिथे आता फक्त पुतळे होते! हो, पुतळे! आणि हे पुतळे त्याच 23 सैनिकांसारखे दिसत होते – त्यांचे चेहरे, त्यांचे उभे राहण्याचे पोज, सगळं तसच! जणू त्या प्रकाशाने त्यांना दगडात बदललं होतं. आणि तो विचित्र गोलकार? तो कुठे गायब झाला, कुणालाच कळलं नाही. (Top Stories)
हे सगळं पाहून त्या दोन सैनिकांना काय करावं, काही कळेना. त्यांनी लगेच आपल्या सीनियर्सना फोन लावला. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसला नाही. अशा गोष्टी कोण विश्वास ठेवणार? पण जेव्हा त्यांना सैनिकांंनच बोलण्यातला सिरियसनेस कळाला, तेव्हा रशियाची गुप्तचर यंत्रणा, KGB, घटनास्थळी पोहोचली. त्यांनी त्या पुतळ्यांना आणि त्या विमानाच्या च्या अवशेषांना मॉस्कोजवळच्या एका गुप्त लॅबमध्ये नेलं. तिथे काय रिसर्च झालं? याबद्दल कधीच काही समोर आलं नाही. पण असं सांगितलं जातं, की त्या पुतळ्यांवर एका विचित्र ऊर्जेचा परिणाम झाला होता, ज्याने त्यांच्या पेशींना चुनखडीसारख्या पदार्थात बदललं होतं. सोविएत यूनियनला असं काहीतरी हाती लागलं होतं, ज्याने जग बदलू शकत होतं. त्यामुळे ही घटना टॉप सीक्रेट ठेवण्यात आली.(Russian Soldiers)
पण गोष्ट इथेच संपली नाही. 1991 साली सोविएत यूनियनचं विघटन झालं. रशिया, युक्रेन, बेलारूससह 15 देश वेगळे झाले. आणि जेव्हा सोविएत यूनियन विघटित झालं, तेव्हा KGB पण बंद झाली. अशा वेळी गुप्तचर यंत्रणांचे सिक्रेट्स लीक होतात, आणि तेच इथे झालं. त्या UFO घटनेची 250 पानांची फाइल CIA च्या हाती लागली. आणि 2000 साली, CIA ने यापैकी एक पान डीक्लासिफाइड केलं आणि त्यांच्या वेबसाइटवर टाकलं. त्या एका पानात या सगळ्या घटनेचा उल्लेख होता. आणि त्या डॉक्युमेंट वरूनच ही गोष्ट आणखी रंगत गेली. वेगवेगळ्या न्यूज रीपोर्ट मध्ये ही घटना छापली गेली. (Top Stories)
================
हे देखील वाचा : El Chapo : जगातील सगळ्यात सिक्युर जेलमधून तो अचानक गायब झाला…
================
पण सत्य काय होतं. हे डीक्लासिफाइड डॉक्युमेंट पाहून सगळ्यांना वाटलं, की ही खरी गोष्ट आहे. पण जेव्हा त्या डॉक्युमेंटचं सत्य तपासलं केलं. तेव्हा काही वेगळंच समोर आलं. त्या डॉक्युमेंटच्या पहिल्याच ओळीत लिहिलंय, की ही माहिती टेनोपिल वेटर्नी नावाच्या न्यूजपेपरमधून घेतलीय. म्हणजे, CIA ची ही स्वतःची माहिती नाही, तर 1993 साली युक्रेनच्या कीव होलोस नावाच्या वृत्तपत्रात छापलेल्या लेखाचं रीप्रिंट आहे. थोडक्यात, CIA ने फक्त त्या लेखाला आपल्या वेबसाइटवर जसंच्या तसं छापलं. याचा अर्थ, CIA काही या गोष्टीला पुष्टी देत नाहीये, तर फक्त सांगतेय की, अशी एक बातमी होती. (Russian Soldiers)
पण मग प्रश्न असा येतो, की जर ही बातमी खरी नाही, तर CIA ने हे का डीक्लासिफाइड केलं? याचं उत्तर आहे – सोव्हिएत युनियनची डिसइन्फॉर्मेशन स्ट्रॅटेजी! त्या काळात सोविएत युनियन आपल्या शत्रूंना आणि कधीकधी स्वतःच्या लोकांना गोंधळात टाकण्यासाठी अशा अफवा पसरवायचं. यामुळे शत्रू देश आपले संसाधनं चुकीच्या गोष्टींवर वाया घालवायचे. आणि या प्रकरणात असंच काहीतरी झालं असावं. CIA ने हे डॉक्युमेंट जाणीवपूर्वक डीक्लासिफाइड केलं, जेणेकरून चर्चा व्हावी आणि लोकांचं लक्ष अमेरिकेवर असलेल्या एलियन टेक्नॉलॉजीच्या आरोपांवरून रशियाकडे वळावं. आणि खरंच, आज 25 वर्षांनंतरही या गोष्टीची चर्चा होतेय, म्हणजे अमेरिकेचा हा डाव यशस्वी झाला!
पण या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? रशिया आणि अमेरिका खरंच एलियन्सबद्दल काहीतरी लपवतायत का? की ही सगळी गोष्ट फक्त एक डिसइन्फॉर्मेशन आहे? तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics