Home » Independence Day : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच तिरंगा का फडकवला जातो?

Independence Day : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच तिरंगा का फडकवला जातो?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Independence Day
Share

अवघ्या काही दिवसांवर १५ ऑगस्ट येऊन ठेपला आहे. आपला राष्ट्रीय उत्सव म्हणून १५ ऑगस्टचा दिवस साजरा केला वाजते. याच दिवशी १९४७ साली भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले. तब्बल १५० वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले. या स्वातंत्र्यासाठी देशातील अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. दरवर्षी या दिवशी संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य सोहळा दिल्लीतील लाल किल्ल्यावर होतो. लाल किल्ला हा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. लाल किल्ल्याचे मूळ नाव ‘किल्ला-ए-मुबारक’ आहे. त्यामुळेच २००७ साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. (Independence Day)

१५ ऑगस्टच्या दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. राजधानी दिल्लीतील लाल किल्ला देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. आज भारतमध्ये अनेक मोठमोठ्या ऐतिहासिक वास्तू आहेत, मात्र तरीही लाल किल्ल्यावरच स्वातंत्र्यदिनाचा सोहळा का होतो? यामागे नक्की कोणते कारण आहे? चला जाणून घेऊया. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला होता. तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधानांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान देशवासियांना संबोधित देखील करतात. (Marathi News)

पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुनच ध्वजारोहण करावे असा कोणताही नियम नाही. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरूनच देशाच्या पंतप्रधानांनी ध्वजारोहण करावे, असा कोणताही उल्लेख संविधानात देखील करण्यात आलेला नाही. मात्र केवळ आपल्या परंपरेनुसार हा सोहळा लाल किल्ल्यावर केला जातो. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी सुरु केलेली परंपरा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत आजही कायम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ध्वजारोहणासाठी लाल किल्ला हे ठिकाण निवडण्यामागचे कारण या ऐतिहासिक वास्तूमध्ये आहे. लाल किल्ला ही फक्त एक इमारत नाही, तर तो भारताची एकता आणि स्वातंत्र्य यांचा गौरवशाली इतिहास दर्शवतो. म्हणूनच, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे ही केवळ एक परंपरा नसून, देशाच्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याची एक कृती आहे. (Todays Marathi Headline)

Independence Day

मुघल सम्राट शाहजहानने १७ व्या शतकात लाल किल्ला बांधला. हा किल्ला बादशहाच्या शक्ती आणि भव्यतेचे प्रतीक म्हणून बांधला गेला. सुरुवातीपासूनच हा किल्ला सत्तेचे केंद्र राहिला आहे. लाल किल्ला १८५७ पर्यंत मुघल साम्राज्याची राजधानी होता. तो भारताच्या इतिहासाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला आणि त्यांचा ध्वज फडकवला. १८५७ मध्ये ज्यावेळी इंग्रजांविरुद्ध क्रांतीची लाट उसळली आणि १८५७ चा उठाव झाला, त्यावेळी मुघल बादशहा बहादूर शाह जफरचे निर्विवाद नेतृत्व मान्य करण्यात आले होते. या पहिल्या लढ्यात भारतीय क्रांतीकारकांराचा पराभव झाला. (Marathi Trending News)

तेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. १८५७ मध्ये ज्यावेळी इंग्रजांविरुद्ध क्रांतीची लाट उसळली त्यावेळी मुघल बादशहा बहादूर शाह जफरचे निर्विवाद नेतृत्व मान्य करण्यात आले होते. या पहिल्या लढ्यात भारतीय क्रांतीकारकांराचा पराभव झाला. याच वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. तेव्हापासून ते १९४७ च्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत लाल किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेणे हेच भारतीयांचे ध्येय झाले.(Latest Marathi Headline)

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ब्रिटिश राजवटीचा ध्वज काढून भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला आणि स्वतंत्र भारताची सुरुवात केली. त्यानंतर ते सत्तेचे केंद्र म्हणून स्थापित केले गेले. तेव्हापासून ही परंपरा प्रत्येक स्वातंत्र्यदिनी सुरू आहे. (Top Marathi News)

लाल किल्ल्याचा इतिहास
मुघल बादशहा शाहजहाँनने लाल किल्ला बांधला. तत्कालिन काळात मोगलांची राजधानी आग्रा ही होती, पण शाहजहाँनने दिल्लीला आपली राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला आणि राजधानीला शोभेल अशा लाल किल्ल्याचे बांधकाम केले. १६३८ मध्ये लाल किल्ल्याची पायाभरणी झाली आणि सुमारे दहा वर्षांच्या परिश्रमानंतर लाल किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार, लाल किल्ल्याचा बराचसा भाग हा पांढऱ्या रंगाचा होता, मात्र जेव्हा या पांढऱ्या भागाची चमक डल होऊ लागली, तेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्या कारकिर्दीत लाल किल्ला लाल रंगाने रंगविण्याचा निर्णय घेतला आणि किल्ल्याची तटबंदी खूप उंच केली. (Top Stories)

===================

हे देखील वाचा :  Cambodia and Thailand : भगवान शंकराच्या मंदिरावरुन दोन देशांमध्ये युद्ध

===================

शाहजहाँन आणि औरंगजेब यांच्या काळात लाल किल्ल्याची ख्याती खूप मोठी होती, परंतु जेव्हा मुघलांच्या कीर्तीचा अस्त व्हायला सुरवात झाली, तेव्हा लाल किल्ल्याचा दर्जाही कमी झाला. लाल किल्ल्याच्या देखभालीसाठी भरपूर पैसा खर्च होत होता. याच कारणामुळे लाल किल्ला जवळपास ३० वर्षे दुर्लक्षित राहिला. १७३९मध्ये पर्शियन शासक नादिर शाहने मोगलांचा पराभव करून लाल किल्ला लुटला. त्यानंतरही, मोगल बादशहा लाल किल्ल्यातच राहिले, आणि लाल किल्ल्याचे वैभव जवळजवळ संपुष्टात आले होते. सुमारे २०० वर्षे लाल किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. त्यानंतर लाल किल्ल्यावर इंग्रजांनी राज्य केले. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.