आपल्याकडे देवीची, नववधूची, गरोदर महिलेची ओटी नेहमीच नारळाने भरली जाते. देवाच्या पूजेपासून ते इतर कोणत्याही शुभ कार्यात सर्वात पहिला आणि मोठा मान असतो तो नारळाचा. नारळाशिवाय हिंदू धर्मात कोणतीही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही. लहान मोठ्या मंदिराबाहेर कायम नारळाची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात.. शिवाय घरात छोटी जरी पूजा असली तरी त्यात नारळ लागते. मग नारळाला एवढे महत्व का आहे? का नारळाशिवाय धार्मिक कार्य पूर्ण होत नाही? जाणून घेऊया याच नारळाचे महत्व आणि त्याबद्दल अधिक माहिती. (Marathi News)
नारळाला ‘श्रीफळ’ असेही म्हणतात. प्रत्येक पूजेमध्ये नारळाचे स्थान सर्वोच्च आहे. नारळाशिवाय पूजा-विधी होवू शकत नाहीत. काहीजण नारळाला सजीव रूप देखील मानतात. नारळाला मनुष्याप्रमाणे २ डोळे आहेत. एक तोंड देखील आहे. नारळ फोडल्यावर त्यातून पाणीच येते. ते अमृतासमान मानले जाते. म्हणजेच श्रीलक्ष्मीचे फळ मानल जाते. यामुळेच प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्व आहे. नारळाला पूजेनंतर आशीर्वादस्वरूप म्हणून देखील देण्याची पद्धत आहे. श्रीफळ शुभ, सुख-समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे. सन्मान करण्यासाठी श्रीफळ आणि शाल दिले जाते. सामाजिक चाली-रीतींमध्ये नारळ भेट देण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी नारळाची पूजा केली जाते.
नारळाच्या उत्पत्तीबद्दल एक आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे. भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या होत्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. नारळाच्या झाडाला तर कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक गोष्टीचा वापर होतो त्यामुळे हे झाड कल्पवृक्ष आहे. (Todays Marathi Headline)
==========
Narali Purnima : जाणून घ्या नारळी पौर्णिमा सणाचे महत्व
==========
नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो अशी मान्यता. नारळावर दिसणारे तीन डोळे म्हणजे शंकराचे त्रिनेत्र असल्याचे देखील सांगितले. त्यामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि पूजा-विधीत त्याचा वापर केला जातो. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात नारळाचा उपयोग केला जातो. नारळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. देवतांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाते. (Marathi News)
नारळाचा बाहेरचा भाग कठीण असतो म्हणजे तो मनुष्याच्या अहंकाराचे प्रतीक आहे, तर आतील पांढर शुभ्र मऊ भाग हे शांततेचे सातवा गुणाचे प्रतीक समजले जाते. नारळ फोडण्याचा अर्थ असा असतो की आपण आपला अहंकार देवाच्या चरणी अर्पण करतो. प्रत्येक शुभकार्यात नारळ वाढवला म्हणजे फोडला जातो. असे म्हणतात जर नारळ फोडल्यामुळे शुभ कार्यात कोणतेही विघ्न येत नाही. शुभ कार्य व्यवस्थित पार पडते. (Top Marathi Headline)
नारळाचे अनेक प्रकार आहेत त्यातील एकाक्षी नारळाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक आहे कारण लक्ष्मी मातेला एकाक्षी नारळ फार प्रिय आहे. एकाक्षी नारळ म्हणजे, एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला फक्त एकच “डोळा” असतो. सामान्यतः नारळाला तीन डोळे असतात, पण एकाक्षी नारळामध्ये फक्त एकच असतो. हा नारळ खूप दुर्मिळ मानला जातो आणि हिंदू धर्मात त्याला खूप शुभ मानले जाते. एकाक्षी नारळ माता लक्ष्मीला अर्पण केला तर लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहते आणि घरात सुख-शांती समाधान असते. एकाक्षी नारळ ज्याच्या घरी त्याला धनसंपत्तीची कमी कधीच होत नाही असे म्हणतात. (Marathi Latest Headline)
अत्यंत दुर्मिळ एकाक्षी नारळ हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की ज्याच्याकडे हा नारळ आहे तो आयुष्यात कधीही कोणत्याही आर्थिक समस्यांना तोंड देत नाही. असे मानले जाते की, ज्याच्या घरात परिपूर्ण मंत्र, जीवन-प्रतिष्ठा असलेला एकाक्षी नारळ असतो, त्याच्या घरात कायमस्वरूपी लक्ष्मी निवास करते. असे मानले जाते की जो एकाक्षी नारळ ज्याच्याकडे असतो, त्याला कायम संपत्ती, ऐश्वर्य आणि सर्व प्रकारचे सुख मिळते. (Marathi Trending News)
हिंदू धर्मात महिला नारळ का फोडत नाही?
भगवान विष्णूंनी पृथ्वीवर पाठवलेले फळ आहे त्यावर माता लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच माता लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही. नारळ हे एक बीज आहे असे मानले जाते आणि स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देते, म्हणून नारळ फोडणे स्त्रियांसाठी योग्य मानले जात नाही. असे ही म्हणतात की, जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येते. असे ही सांगतात की विश्वामित्र देवराज इंद्र यांच्यावर खूप क्रोधीत झाले. विश्वामित्र यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला. ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रथम मानवाच्या रूपात नारळाचे रूप धारण केले. त्यामुळे नारळ देखील मानवी रूप मानले जाते. (Latest Marathi News)
यामागे अजून काही कारणं सांगितले जातात जसे की, नारळ फोडण्यासाठी जास्त शक्तीची गरज असते स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये शारिरीक शक्ती जास्त असते, त्यामुळे स्त्रीयांऐवजी पुरूषांना नारळ फोडण्याचे काम सोपवले जाते. या शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे शुभ प्रसंगी स्त्रीया बांगड्या घालतात. नारळ फोडताना त्या बांगड्या फुटू शकतात, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. यासाठी स्त्रीयांनी नारळ न फोडण्याचा सल्ला जुन्याकाळी दिला जात असे. मात्र यामागे कुठली अंधश्रद्धा नाही.(Top Marathi News)
अनेकदा प्रसादामध्ये देखील नारळ दिला जातो, ओटीमध्ये देखील नारळ मिळतो, कोणतीही पूजा झाल्यानंतर आशीर्वादमध्ये देखील नारळ दिला जातो. मग अशा या नारळाचे काय करावे? जर मिळलेला नारळ ताजा असेल, तर खोबऱ्याचे तुकडे करून प्रसाद म्हणून खाता येतो त्याचबरोबर तो इतरांना वाटू शकता. समजा पूजेतील नारळ जर सुका असले, तर त्याचा वापर स्वयंपाकात करता येतो. किंवा या नारळापासून काहीतरी गोड पदार्थ बनवून खावा. काहीजण पुजेत मिळालेला नारळ देवाचा आशीर्वाद म्हणून लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून लॉकरमध्ये ठेवतात. (Top Stories)
===========
Rakshabandhan : जाणून घ्या रक्षाबंधनाची तारीख, शुभवेळ आणि या सणाचे महत्व
===========
काहीजण लाल कपड्यात बांधून तो नारळ मुख्य दरवाज्यावर टांगून ठेवतात. मात्र प्रसाद म्हणून मिळालेला नारळ कधीही दुसऱ्याला देऊ नका. असे करणे म्हणजे श्रीफळाचा तसेच देणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही अपमान असतो. काहीजण तो नारळ कुठे ही ठेवतात तर तसे करु नका, तो नारळ सुरक्षित आणि स्वच्छ जागी ठेवावा. पूजा किंवा ओटीत मिळालेला नारळ कचऱ्याच्या डब्यात फेकणे अशुभ मानले जाते. (Social Updates)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, किंवा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics