अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वाधिक विश्वासू आणि एफबीआय संचालक कश्यप प्रमोद विनोद पटेल म्हणजेच काश पटेल यांची प्रेयसी अॅलेक्सिस विल्किन्सवर मोसादसाठी हेरगिरी करण्याचा आरोप करण्यात आला आहे. काश आणि अॅलेक्सिस 2022 पासून डेट करीत आहेत. काश पटेल यांनी एफबीआय संचालकपदाची शपथ घेतली तेव्हा प्रथम अॅलेक्सिस कॅमे-यासमोर आली. सोबतच त्यांच्या नात्याची माहितीही झाली. आता याच अॅलेक्सिसवर मोसाद या इस्रायली गुप्तहेर संघटनेची एजंट असल्याचा आरोप कऱण्यात येत आहे. अमेरिकेत सध्या गाजत असलेल्या एपस्टाईन फाइल्समध्येही अॅलेक्सिसचेही नाव आहे. (Alexis Wilkins)
मोसादच्या मदतीनं होत असलेल्या या मोहीमेमध्ये अॅलेक्सिस सहभागी असल्याचा गंभीर आरोप कऱण्यात आला आहे. मात्र अॅलेक्सिसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. काश पटेल यांना बदनाम करण्यासाठी आपल्यावर आरोप होत असल्याचा खुलासा तिनं केला आहे. यूएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे प्रमुख काश पटेल यांची प्रेयसी अॅलेक्सिस विल्किन्सवर इस्रायली गुप्तहेर संघटना मोसादसाठी हेरगिरी करण्याचा आरोप झाल्यानं खळबळ उडाली आहे.अॅलेक्सिसनं मोसादसाठी हेरगिरी करण्यासाठीच काश पटेलसोबत प्रेमसंबंध स्थापित केल्याचा हा आरोप आहे. काश पटेल आणि अॅलेक्सिस2022 पासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. अॅलेक्सिस ही काश पटेल यांच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान आहे.
26 वर्षाची अॅलेक्सिस विल्किन्स ही एक अमेरिकन गायिका आहे. ती प्रागरयू नावाच्या कंपनीत काम करत असून या कंपनीचे सीईओ इस्रायली गुप्तचर संस्थेसाठी काम करायचे. त्यांच्याच सल्ल्यावरुन अॅलेक्सिस काश पटेल यांच्या संपर्कात आल्याचा आरोप आहे. अॅलेक्सिस ने अनेक वेळा ज्यू समुदायाशी संबंधित गाणी रेकॉर्ड केली आहेत. ज्यू समुदायाबद्दल तिच्या सोशल मिडियावरही अनेकवेळा शुभ संदेश देण्यात आले आहेत. त्यामुळेच अॅलेक्सिसस ही मोसादसाठी काम करीत असल्याचा आरोप काही माध्यमातून होत आहे. 3 नोव्हेंबर 1998 रोजी अर्कांसस येथे जन्मलेल्या अॅलेक्सिस विल्किन्सचे बालपण इंग्लंड आणि स्वित्झर्लंडमध्ये गेले आहे. त्यानंतर तिचे कुटुंब नॅशव्हिल, टेनेसी येथे स्थलांतरीत झाले. अॅलेक्सिसने बेलमोंट विद्यापीठातून व्यवसाय आणि राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे. 2005 पासून तिने गायिका म्हणून पदार्पण केले. एक कंट्री सिंगर म्हणून, अॅलेक्सिस विल्किन्सने क्रिस यंग, जो निकोल्स, सारा इव्हान्स आणि परमाली सारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत स्टेज शेअर केले आहे. (Alexis Wilkins)
याशिवाय काही वर्षे अॅलेक्सिसने रिपब्लिकन प्रतिनिधी अब्राहम हमाडे यांची प्रेस सेक्रेटरी म्हणूनही काम केले आहे. गाण्याव्यतिरिक्त, अॅलेक्सिसने लेखन क्षेत्रातही स्वतःचे नाव कमावले आहे. अॅलेक्सिस बिटवीन द हेडलाइन्स नावाचा पॉडकास्ट देखील होस्ट करते, यामध्ये अॅलेक्सिस चर्चित घडामोडी आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा करते. अलेक्सिस विल्किन्स आणि काश पटेल ऑक्टोबर 2022 मध्ये ख्रिश्चन नॅशनलिस्ट अमेरिका सिम्पोजियम आणि रॅलीमध्ये भेटले. अॅलेक्सिस कॅपिटल हिलमध्ये काम करु लागल्यावर काश आणि अॅलेक्सिसच्या नात्याची चर्चा सुरु झाली. काश पटेल यांनी अमेरिकेतील सर्वात मोठ्या तपास संस्थेच्या, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालकपदाची शपथ घेतली, तेव्हा अॅलेक्सिस त्यांच्या शेजारी उभी होती. त्यानंतर अॅलेक्सिस आणि काश यांच्या नात्याबाबत माहिती उघड झाली. (International News)
===================
हे देखील वाचा : Samar Abu Jamer : हमासचा दुहेरी चेहरा !
===================
त्यानंतर अॅलेक्सिस, काश पटेल यांच्यासोबत कायम सार्वजनिक कार्यक्रमात दिसू लागली. अॅलेक्सिसने तिच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. ती स्वतःला सच्ची अमेरिकन म्हणवून घेते. तिच्या वडिलांनी कोरियन युद्धादरम्यान अमेरिकन नौदलात सेवा बजावल्याचे ती अभिमानानं सांगते. अॅलेक्सिसवर गुप्तहेर असल्याचा आरोप एपस्टाईन फाइल्स प्रकरणामुळे होत आहे. ट्रम्प प्रशासनानं ही फाईल्स सार्वजनिक करण्यास नकार दिल्याने लोक संतापले आहेत. अमेरिकेत दावा करण्यात येत आहे की, एपस्टाईन प्रभावशाली लोकांना अडकवण्यासाठी मोसादच्या वतीने काम करत होता. एपस्टाईनने त्याच्या मालमत्तेवर अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींना होस्ट केले होते. तिथे लपलेल्या कॅमेऱ्यांनी अल्पवयीन मुलींसह अशा व्यक्तींना रेकॉर्ड केले असल्याचे मानले जाते. यासर्वांमुळेच ही एपस्टाईन फाइल्स डोनाल्ड ट्रम्प प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. आता त्यात काश पटेल आणि त्यांची प्रेयसी असलेल्या अॅलेक्सिसचेही नाव आल्यानं एपस्टाईन फाइल्स प्रकरण लवकर शांत होईल, अशी शक्यता कमी आहे. (Alexis Wilkins)