राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी येत आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील आरएम रुग्णालयात उपचारादरम्यान, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली, ते ७९ वर्षांचे होते. गोवा, मेघालय, ओडिशा आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली कार्यभार सांभाळला होता. तत्पूर्वी मलिक यांनी आमदार ते राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास केला. देशातील विविध पक्षांमध्ये त्यांनी काम केले होते. मलिक यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. तसेच, दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. (satyapal malik)
सत्यपाल मलिक यांना मे महिन्यात किडनीच्या गंभीर संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मुख्य म्हणजे सत्यपाल मलिक हे पदावर असताना देखील त्यांनी सरकारवर अनेकदा जोरदार टीका केली होती. या टीकेमुळे ते कायम चर्चेत यायचे. भाजपमध्ये भ्रष्टाचाराचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला होता. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक पक्ष बदलले. मात्र त्यांनी कायम स्वत:ला जाट आणि शेतकरी नेते असल्याचेच सांगितले. ते स्वत:ला लोहियावादी मानत होते. तर चौधरी चरण सिंह यांना राजकीय गुरु असल्याचं सांगायचे. (Marathi News)
सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास
२४ जुलै १९४६ रोजी सत्यपाल मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील हिसावदा गावात झाला. ते एका जाट कुटुंबात जन्माला आले होते. ते दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. खूप कमी वयातच सत्यपाल हे राजकारणाकडे वळाले होते. मेरठ विद्यापीठातून त्यांनी विज्ञान विषयात पदवी घेतली. १९६८-६९ मध्ये मेरठ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले. तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७४ ते १९७७ या कालावधीत ते उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे सदस्य होते. १९८० ते १९८६ आणि १९८६ ते १९८९ या कालावधीत ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेले. १९८९ ते १९९१ या कालावधीत ते अलिगढचे खासदार होते. जनता दलाकडून ते खासदार झाले होते. (Todays Marathi Headline)

=========
Samar Abu Jamer : हमासचा दुहेरी चेहरा !
=========
सत्यपाल मलिक वयाच्या २८ व्या वर्षी १९७४ मध्ये बागपत विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. तर १९८० मध्ये लोकदलाच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. त्यांनी आणीबाणीच्या काळात काँग्रेसला तीव्र विरोध केला. एवढेच नाही तर त्यांना याकाळात तुरुंगातही जावे लागले होते. आणीबाणीवर टीका केल्यानंतर १९८४ मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले. पुढे काही काळानंतर काँग्रेसमधून बाहेर पडत मलिक यांनी जन मोर्चा पार्टी स्थापन केली. १९८८मध्ये त्यांनी जनता दलात त्यांचा हा पक्ष विलीन केला. पुढे १९८९मध्ये अलीगढमधून ते खासदार झाले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. १९९६ मध्ये समाजवादी पार्टीच्या तिकिटावर अलीगढमधून निवडणूक लढले पण यात त्यांचा पराभव झाला. (Poitical News)
२००४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना २०१२ मध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये ते बिहारचे राज्यपाल बनले. २०१८मध्ये जम्मू काश्मीर, २०१९मध्ये गोवा आणि २०२० मध्ये मेघालयचे राज्यपाल झाले. मात्र सत्यपाल मलिक आणि भाजप यांच्यात शेतकरी आंदोलनानंतर ठिणगी पडली. २०२२ मध्ये सत्यपाल मलिक हे मेघालयचे गव्हर्नर होते. त्यावेळी शेतकरी आंदोलन कमालीचे पेटले होते. दिल्लीच्या सीमेवर ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी मलिक यांनी कुत्र्याचा मृत्यू झाला तरी वेदना होतात पण शेतकऱ्यांसाठी एकही चिठ्ठी दिल्लीहून आली नाही असे म्हटले होते. पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकावर गंभीर आरोप केले होते, जवानांना हेलिकॉप्टर देण्याऐवजी बसने पाठविण्यात आल्याचे सांगत त्यांनी हल्ल्याचा वापर भाजपने निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी केल्याचा आरोपही केला होता. या आरोपानंतर ते चर्चेत आले होते. (Top Marathi Headline)
ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत मलिक जम्मू-काश्मीर चे राज्यपाल होते. त्यांच्याच कार्यकाळात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्यामुळे जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द झाला. जम्मू-काश्मीरचं विभाजन करण्यात आलं. दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले गेले. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे केंद्रशासित प्रदेश तयार करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला. (Latest Marathi Headline)
ऑक्टोबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत मलिक यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून काम केलं. २१ मार्च २०१८ ते २८ मे २०१८ या कालावधीत ते ओडिशाचे राज्यपाल होते. जम्मू-काश्मीरची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी केल्यानंतर सत्यपाल मलिक यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आली. गोव्याचे १८ वे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ऑक्टोबर २०२२ पर्यंत ते मेघालयचे राज्यपाल होते. (Top Trending News)

मुख्य म्हणजे आता सत्यपाल मलिक रुग्णालयात भारताची असताना त्यांनी जूनमध्ये सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप देखील केले होते. जून ७ रोजी त्यांनी त्यांच्या एक्स वर एक पोस्ट शेअर केली ज्यात त्यांनी लिहिले, “मी गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहे आणि मला किडनीचा त्रास आहे. काल सकाळपासून मी ठीक होतो पण आज मला पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. माझी प्रकृती खूप गंभीर होत चालली आहे. मी जिवंत असलो किंवा नसलो तरी माझ्या देशवासियांना मला सत्य सांगायचे आहे. (Latest Marathi News)
मी राज्यपाल पदावर असताना मला १५०-१५० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, पण मी माझे राजकीय गुरू, शेतकरी मसीहा दिवंगत चौधरी चरण सिंह जी यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहिलो. मी राज्यपाल असताना शेतकरी आंदोलनही सुरू होते. कोणत्याही राजकीय लोभाशिवाय मी पदावर असताना शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. त्यानंतर महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात जंतरमंतर ते इंडिया गेट पर्यंतच्या प्रत्येक लढतीत मी त्यांच्यासोबत होतो. (Top Marathi News)
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सैनिकांचा मुद्दा उपस्थित केला आला होता, ज्याची चौकशी या सरकारने आजपर्यंत केलेली नाही. सरकार मला सीबीआयला धमकी देऊन खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी निमित्त शोधत होती. ज्या निविदेच्या प्रकरणामध्ये त्यांना मला अडकवायचे होतो ती मी स्वतः रद्द केली होती. मी स्वतः पंतप्रधानांना सांगितले होते की या प्रकरणात भ्रष्टाचार झालाय. त्यांना सांगितल्यानंतर मी स्वतः निविदा रद्द केली. माझ्या पदावरुन हटवल्यानंतर या निविदेवर दुसऱ्याच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. (Top Stories)
=========
Area-51 : अखेर तो दिवस येणार एलियनसोबत युद्ध होणार…
=========
मला सरकार आणि सरकारी संस्थांना सांगायचे आहे की मी शेतकरी समुदायाचा आहे, मी घाबरणार नाही आणि झुकणार नाही. सरकारने माझी बदनामी करण्यासाठी पूर्ण ताकद लावली. मी सरकार आणि त्यांच्या यंत्रणांना विनंती करतो की त्यांनी माझ्या देशातील लोकांना तपासादरम्यान काय आढळले ते जरा सांगावे. खरे हे आहे की ५० वर्षांहून अधिक काळाच्या राजकीय कारकिर्दीत उच्च पदांवर देशाची सेवा करण्याची संधी असूनही, मी अजूनही एका खोलीच्या घरात राहतो आणि कर्जातही बुडालो आहे. जर आज माझ्याकडे पैसे असते तर मी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असते.” (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
