जपानमध्ये 5 जुलै रोजी जलजला येणार अशी भविष्यवाणी बाबा वेंगा या प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवेत्त्यांनी केली होती. सोबतच जपानच्या मंगा कलाकार र्यो तात्सुकी यांनीही अशीच भविष्यवाणी आपल्या एका पुस्तकाच्या माध्यमातून केली होती. या दोन्ही भविष्यवाणीमध्ये जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राच्या तळाशी एक मोठी भेग निर्माण होईल, ज्यामुळे भयानक भूकंप आणि त्सुनामी येणार असल्याचे सांगितले होते. याचा परिणम असा झाला की, जपानचा पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थंडावला. जपानमध्ये जाणा-या जगभरातील पर्यटकांनी जून पासूनच पाठ फिरवली. लाखोंचे बुकींग रद्द झाले. समुद्रकिना-यावरील अनेक हॉटेल खाली झाली. जपानमधील जनतेमध्येही या भूकंपाच्या भाकितांनी एवढी दहशत निर्माण केली होती की, येथील जनजीवन ठप्प झालं होतं. बहुतांश समुद्रकिना-यावरील घरे खाली करण्यात आली. मात्र 5 जुलै आला तसा गेलाही. या नंतरच्या दहा दिवसांनीही जपानमध्ये कुठल्याही प्रकारचा भूकंप आणि त्सुनामीसारखी परिस्थिती आली नाही. त्यामुळे या दोन्ही भविष्यवाणी फोल ठरल्या अशी चर्चा रंगली. (Baba Vanga)
जपानमधील जनजीवन पूर्वपदावर आले आणि बरोबर 25 दिवसांनी जपानबाबत सांगितलेलं बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली आहे. फक्त जपानच नव्हे तर बाबा वेंगा यांनी रशिया आणि अमेरिकेतील कॅलिफोर्नियालाही त्सुनामीचा धोका असल्याचे भविष्य व्यक्त केले होते. हे भाकित आता खरे ठरल्यावर जगभरात घबराट पसरली आहे. बुधवारी पहाटे रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर 8.8 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप आला. 1952 नंतरचा हा सर्वात मोठा भूकंप असून यामुळे जपान, अमेरिका, न्यूझीलंड आणि मेक्सिकोसह अनेक देशांमध्ये त्सुनामीचा धोका वाढला आहे. त्यातही जपानला या त्सुनामीचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. जपानमध्ये, किनारी भागातून सुमारे 9 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. (International News)
या भूकंपामुळे काही भागात 60 सेमी उंचीच्या लाटा उसळल्या असून यामध्ये अधिक वाढ होणार असल्यानं अवघ्या जपानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंप आणि त्सुनामीनंतर पुन्हा बाबा वेंगा यांचे नाव चर्चेत आले आहे. बाबा वांगा यांनी 5 जुलै रोजी रशिया आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणात त्सुनामीचा इशारा दिला होता. जपानच्या घटनेने मंगा कलाकार र्यो तात्सुकी यांनीही याच तारखेला जपानमध्ये जलजला येणार असल्याचे भविष्य लिहिले होते. या दोन्ही भविष्यवाणी सत्यात उतरल्यावर बाबा वेंगा यांनी या 2025 साठी अन्य कुठल्या भविष्यवाणी सांगितल्या आहेत, याची शोधाशोध आज सोशल मिडियावर सर्वाधिक करण्यात आली आहे. बाबा वेंगा यांची भाकिते यापूर्वी अनेकवेळा खरी ठरली आहेत. त्यात राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरी यांचा मृत्यू, कोविड-19 चा उद्रेक, मार्च 2011 चा भूकंप आणि त्सुनामी, अमेरिकेच्या ट्विन्स टॉवरवरील हल्ला या भाकितांचा समावेश आहे. मात्र 2025 साठी बाबा वेंगा यांनी जे भाकित व्यक्त केले होते, त्यांनी अनेकांचा थरकाप झाला आहे. त्यात जपानबाबत असलेल्या भाकितामुळे तर अनेक जपानी नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले. (Baba Vanga)
बाबा वेंगा यांच्या पुस्तकात या वर्षी जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राच्या तळाला भेगा पडण्याचा आणि मोठ्या प्रमाणात त्सुनामी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज झालेल्या भूकंपाचा जपान आणि फिलीपिन्सशी थेट संबंध नाही. पण त्याचा जपानवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाबा वेंगा यांच्या भविष्यानुसार जपानवर अजून एक मोठी आपत्ती येणार का, याचीही चर्चा असून चिंता व्यक्त कऱण्यात येत आहे. दरम्यान बाबा वेंगा यांनी 2025 च्या शेवटच्या महिन्यात पृथ्वीवर परग्रही येणार असल्याचे भाकितही केले आहे. यात मनुष्य आणि परग्रही यांच्यामध्ये संपर्क होईल, असेही बाबा वेंगा यांनी भविष्यात सांगितले आहे. हे भविष्यही खरे ठरणार की काय, याची आता चर्चा सुरु झाली आहे, कारण काही खगोलशास्त्रज्ञांनी अवकाशात 3I/ATLAS नावाची एक गुढ वस्तू फिरत असल्याचा शोध लावला आहे. (International News)
===================
हे देखील वाचा : Harry Charles : कोण आहे स्टीव्ह जॉब्सचा जावई ?
===================
ही गुढ वस्तू महणजे, परग्रहींचे जहाज असल्याचाही खगोलशास्त्रज्ञांचा दावा आहे. या वस्तूचा आकार अवाढव्य असून त्याचा वेग हा पृथ्वीवरील कुठल्याही साधनानं रोखता येणार नाही, असा असल्यामुळे शास्त्रज्ञ धास्तावले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ही गुढ वस्तू पृथ्वीच्या कक्षेत येणार असल्यानं आता याचाही बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीसोबत संबंध जोडण्यात येत आहे. यासोबत बाबा वेंगा यांनी 2025 पर्यंत युरोपची लोकसंख्या युद्ध किंवा अंतर्गत परिस्थितीमुऴे झपाट्यानं कमी होणार असल्याचे सांगितले आहे. ही भविष्यवाणीही खरी ठरणार अशी अटकळ व्यक्त होत आहे. कारण अलिकडे युरोपियन देशांतील मुलांच्या जन्माचा दर कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच बाबा वेंगा आणि त्यांच्या भाकितांबाबत सोशल मिडियाच्या माध्यमातून शोधाशोध सुरु झाली आहे. (Baba Vanga)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics