टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात विवादित शो म्हणून बिग बॉस या शोची ओळख आहे. बिग बॉस हा शो जेव्हा जेव्हा सुरु होतो तेव्हा तेव्हा नानाविध वाद होतातच. हाच या शोचा इतिहास आहे. आजवर बिग बॉसचे जेवढे पर्व आले सर्वच विविध वादांमुळे कमालीचे गाजले. आता पुन्हा एकदा या शो नवीन स्पर्धक, नवीन थीम, नवीन घर, नवे बदल आदी सर्वच नवीन गोष्टींसह प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच बिग बॉसच्या १९ व्या पर्वाचे बिगुल वाजले आहे. (Marathi NEws)
सलमान खान सूत्रसंचालक असलेल्या या शोचा दमदार टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सलमानने यावर्षीच्या शोची घोषणा एक नेता म्हणून केली आहे. यावेळी शोची थीम राजकारणासारखी असणार आहे. समोर आलेल्या टीझरवरून देखील यावेळी बिग बॉसच्या घरात राजकारण होणार हे नक्की. यासोबतच सलमानने हे देखील सांगितले आहे की हा शो येत्या २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावर्षी ‘बिग बॉस’ ‘घरवालों की सरकार!’ या नवीन थीमसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता सत्ता, राजकारण ही थीम असल्यामुळे घरात नवनवीन ‘सत्ता समीकरणं’ पाहायला मिळतील हे नक्की. यावरून घरात आता कसे वाद होतात, कोण सत्तेत येते, कोण राजकारण खेळते? हे पाहायला मजा येणार यात शंका नाही. (Todays Marathi Headline)
सलमान खान हा मागील अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’चा चेहरा प्रसिद्ध आहे. आजवर त्याने अनेक सिझन होस्ट केले असून, यंदा देखील सलमानच या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. बिग बॉसच्या नवीन टीजरमध्ये तो म्हणतो की, ”मित्रांनो आणि शत्रूंनो देखील, तयार व्हा! कारण यावेळी घरातील सदस्यांचे सरकार असणार आहे आणि ‘टू मच फन’ होणार आहे.” ‘बिग बॉस १९’ जिओ हॉटस्टारवर रात्री ९:०० वाजता स्ट्रीम होईल आणि कलर्सवर रात्री १०:३० वाजता प्रसारित होणार आहे. (Entertainment News)
यंदाच्या बिग बॉसच्या पर्वाची अजून खास बाब म्हणजे, बिग बॉसचा लोगो. यंदा बिग बॉसच्या लोगोमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. बिग बॉसच्या लोगोमध्ये अनेक नवीन रंग दिसत असून, रंगसंगतीत अनेक बदल करण्यात आले आहे. हा लोगो अधिक आकर्षक आणि अधिक सुंदर दिसत आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार यंदाच्या पर्वात एक मस्त ट्विस्ट असणार आहे. तो म्हणजे यावेळेस घरात AI स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. ‘हबूबू’ नावाच्या AI डॉलला शोमध्ये आणले जाणार असल्याचे बोलले जात आहे. (Top Stories)
=========
Prince Mohammed bin Salman : स्वप्नातील शहराचा प्रकल्प डबाबंद होणार
=========
‘बिग बॉस ताजा खबर’ नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून संभाव्य स्पर्धकांची नावे शेअर करण्यात आली आहेत, ज्यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यात खुशी दुबे, रिबेल किड म्हणजेच अपूर्वा मुखीजा, गौरव खन्ना, भाविका शर्मा, धनश्री वर्मा, मिस्टर फैजू, जन्नत जुबेर, धीरज धूपर, चित्रांशी ध्यानी, गुरुचरण सिंग आणि हुनर हाली यांचा समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही केवळ चर्चा असून, याबद्दल अजून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. यासोबतच मल्लिका शेरावत आणि डेझी शाह या दोघींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ते या शोचा भाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics