Home » Temple : रक्षाबंधनाच्याच दिवशी उघडणारे वंशीनारायण मंदिर

Temple : रक्षाबंधनाच्याच दिवशी उघडणारे वंशीनारायण मंदिर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Temple
Share

कायम भारतातल्या अनोख्या मंदिरांची आणि तिथे असणाऱ्या आगळ्या वेगळ्या परंपरांची जगभरात चर्चा होताना दिसते. भारतात अगणित अशी मंदिरं आहेत. मात्र प्रत्येक मंदिराचाच इतिहास, महत्व, प्रथा, रीती या वेगळ्या आहेत. आता मंदिरं म्हटले की आपल्याला माहित असते की, प्रत्येक मंदिरामध्ये दररोज पूजा अर्चना होते. प्रत्येक मंदिरात रोज देवाचे स्नान होते, प्रत्येक मंदिर रोज विशिष्ट वेळेत उघडले जाते. मात्र भारतात अशी देखील काही मंदिरं आहेत, जी रोज उघडली जात नाही. विशिष्ट दिवशी, विशिष्ट काळातच ही मंदिरं उघडली जातात. यामागे मोठा इतिहास आणि परंपरा असल्याचे देखील सांगितले जाते. (Marathi)

असेच एक खूपच आगळ्या वेगळ्या मंदिराबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे मंदिर आणि याची विशेषतः ऐकून तुम्हाला देखील नक्कीच आश्चर्य वाटेल. भारतातील उत्तराखंड राज्यात एक असे मंदिर आहे, जे वर्षातून केवळ एकाच दिवशी उघडले जाते आणि तो दिवस देखील खूपच खास असतो. उत्तराखंड राज्यात बद्रीनाथ जवळच्या उर्गम घाटी येथे वंशी नारायण किंवा बन्सी नारायण मंदिर आहे. हे मंदिर वर्षातले ३६४ दिवस हे मंदिर बंद असते मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी ते उघडले जाते. या दिवशी देवाची पूजा केली जाते आणि देवाला राखी देखील बांधली जाते. आपण आज याच मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. (Marathi News)

रक्षाबंधनाच्या दिवशी जिथे बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या खास दिवशी उत्तराखंडमधील चामोली येथे असलेले वंशी नारायण उघडले जाते. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहेत. मंदिर उघडल्यानंतर या दिवशी महिला भगवान विष्णूंचे दर्शन घ्यायला आणि त्यांना राखी बांधायला दूरदूर वरून येतात. रक्षाबंधनच्या दिवशी देखील हे मंदिर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मंदिर खुले असते. सूर्य मावळल्यावर मंदिर पुन्हा बंद केले जाते. पहाटेपासूनच दूरवरून भाविक येथे पोहोचतात आणि दरवाजे उघडण्याची वाट पाहत असतात.(Todays Marathi Headline)

Temple

पौराणिक मान्यतेनुसार हे मंदिर पांडव काळात बांधले गेले. मान्यता आहे की, वामन अवतारातून मुक्त झाल्यावर भगवान विष्णु सर्वप्रथम याच ठिकाणी आले होते. असे सांगितले जाते की, वंशी नारायण मंदिरात देवर्षी नारद ३६४ दिवस श्रीविष्णूंची पूजा करतात आणि येथे माणसाला फक्त एका दिवसासाठी पूजा करण्याचा अधिकार आहे. हे मंदिर हिमालय पर्वतरांगात १३ हजार फुट उंचीवर असून तेथे जाण्यासाठी ७ किमी पायी चालावे लागते. मंदिराच्या बाहेर श्रीकृष्ण आणि वांदेवतांच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात. (Marathi Trending News)

मुख्य मंदिराबद्दल सांगायचे झाले तर, कत्युरी शैलीमध्ये बनवलेल्या १० फूट उंचीच्या या मंदिराचे गर्भगृह चौरसाकृती असून, येथे भगवान विष्णू चतुर्भुज स्वरूपात स्थित आहेत. मंदिरात असेलल्या मूर्तीमध्ये भगवान विष्णू आणि भोलेनाथ एकत्र पाहायला मिळतात. माणसांना या मंदिरात एक दिवस पूजा करण्याचा अधिकार देण्यामागे एक अतिशय रंजक कथा आहे. पौराणिक कथेनुसार, एकदा राजा बलीने भगवान विष्णूला आपला द्वारपाल बनण्याची विनंती केली. भगवान विष्णूंनी राजा बलीची ही विनंती मान्य केली आणि ते राजा बळीबरोबर पाताळात गेले. (Top Marathi News)

देवी लक्ष्मी अनेक दिवस भगवान विष्णूचे दर्शन न झाल्यामुळे नाराज झाली आणि नारद मुनींकडे गेली. नारद मुनीजवळ पोहोचल्यावर लक्ष्मी मातांनी त्यांना विचारले की भगवान विष्णू कुठे आहेत? त्यानंतर नारद मुनींनी माता लक्ष्मीला सांगितले की ते पाताळलोकात द्वारपाल आहेत. मग लक्ष्मीमाता खूप अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी नारद मुनींना भगवान विष्णूला परत आणण्याचा मार्ग विचारला. (Latest Marathi News)

देवी लक्ष्मींनी भगवान विष्णूंना परत आणण्याचा मार्ग विचारल्यावर देवर्षी म्हणाले की, हे माते, श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला पाताळलोकात जा आणि राजा बलीच्या मनगटावर एक रक्षासूत्र बांधा. यानंतर, राजा बलीला भगवान विष्णूंना परत करण्यास सांगा. यावर माता लक्ष्मी म्हणाली की मला पातळ लोकात जाण्याचा रस्ता माहित नाही, तुम्ही माझ्याबरोबर याल का? यावर त्यांनी माता लक्ष्मीची विनंती मान्य केली आणि ते पाताळात गेले. (Top Stories)

========

हे देखील वाचा : Grishneshwar Temple : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य !

========

रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूंसाठी काळगोठ गावातील प्रत्येक घरातून लोणी येते. या लोण्यापासून प्रसाद तयार केला जातो. श्रावण पौर्णिमेला या मंदिरात भगवान नारायणला सजवले जाते. यानंतर गावातील लोक भगवान नारायण यांना राखी बांधतात आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हे मंदिर अतिशय नेत्रदीपक अशा ठिकाणी स्थित आहे. या मंदिराच्या आजूबाजूला दुर्मिळ फुलझाडे आणि वनस्पती आढळतात. संपूर्ण परिसर अतिशय निसर्गरम्य आणि शांततादायक आहे. मंदिराचा परिसर डोंगरदऱ्यांनी वेढलेला असून येथे आल्यावर एक अध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा येथे कायम जाणवते. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.