Home » Harry Charles : कोण आहे स्टीव्ह जॉब्सचा जावई ?

Harry Charles : कोण आहे स्टीव्ह जॉब्सचा जावई ?

by Team Gajawaja
0 comment
Harry Charles
Share

अॅपलचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती स्टीव्ह जॉब्स यांच्या धाकट्या मुलीच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. स्टीव्ह जॉब्स यांच्या या तिस-या आणि धाकट्या मुलीचे नाव इव्ह जॉब्स असून ती या आठवड्यात ब्रिटिश ऑलिंपियन हॅरी चार्ल्स बरोबर लग्न करणार आहे. 2025 मध्ये जी काही चर्चित लग्न झाली आहेत, त्यापैकीच इव्ह आणि हॅरीचे हे लग्न ठरणार आहे. (Harry Charles)

स्टीव्ह जॉब्स यांची मुलगी इव्ह ही फॅशन मॉडेल आहे. तर चार्ल्स एक ऑलिंपिक घोडेस्वार आणि प्रसिद्ध मॉडेल आहे. या शाही लग्नासाठी 6.7 दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात येणार असून यावेळी हॉलिवूडमधील अनेक अभिनेते, जगभरातील उद्योगपती उपस्थित रहाणार आहेत. विशेष म्हणजे, स्टीव्ह जॉब्सचा जावई जसा उत्कृष्ट घोडेस्वार आहे, तशीच त्याची मुलगी इव्हही घोडेस्वारीमध्ये तरबेज आहे. अ‍ॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि लॉरेन पॉवेल यांची मुलगी इव्ह जॉब्स हिचा या आठवड्यात विवाह होत आहे. ऑलिंपिक घोडेस्वारी सुवर्णपदक विजेता हॅरी चार्ल्स हा या जॉब्स परिवाराचा धाकटा जावई होत आहे. गेली काही वर्ष या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होती. 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक दरम्यान इव्ह जॉब्स आणि हॅरी चार्ल्स यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले. (International News)

या ऑलिंपिकमध्ये घोडेस्वारी स्पर्धेत हॅरी चार्ल्सने शो-जंपर म्हणून भाग घेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतरच इव्ह आणि हॅरीच्या लग्नाची घोषणाही कऱण्यात आली. या लग्नासाठी 58 रुपये खर्च होणार आहेत. या लग्नासाठी जगभरातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. पाहुण्यांच्या यादीत अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस, मायक्रोसॉफ्टच्या वारसदार जेनिफर आणि फोबी गेट्स, राजकुमारी बीट्रिस आणि जेसिका स्प्रिंगस्टीन देखील उपस्थित राहणार आहेत. लग्नसमारंभाला अधिक शानदार करण्यासाठी संगीत दिग्गज एल्टन जॉन यांचा शानदार कार्यक्रम होणार आहे. स्टीव्ह जॉब्सची सर्वात धाकटी मुलगी असलेल्या इव्हचा जन्म 1998 मध्ये झाला. तिनं स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर इव्हने फ्लोरिडातील वेलिंग्टन येथील अप्पर एकेलॉन अकादमीमध्ये शिक्षण घेतले. इथेच इव्ह घोडेस्वारीमध्ये तरबेज झाली. 25 वर्षांखालील स्पर्धकांमध्ये इव्हने जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वोत्तम रायडर म्हणून कामगिरी केली आहे. सध्या इव्ह फॅशन मॉडेल म्हणून मान्यवर ब्रॅण्ड प्रमोशन करीत आहे. (Harry Charles)

फॅशन जगतात सुरुवातीला इव्हने ग्लॉसियरच्या हॉलिडे कॅम्पेनमधून मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले, युफोरियाच्या सिडनी स्वीनी आणि नाओमी स्मॉल्स यांच्यासोबत इव्ह दिसली. त्यानंतर व्होग जपानच्या मुखपृष्ठावरही इव्हचे छायाचित्र झळकले आहे. पट्टीची घोडेस्वार असलेल्या इव्ह जॉब्सला 2020 च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हायचे होते. पण कोविड-19 साथीच्या आजारामुळे ऑलिंपिंक पुढे ढकलण्यात आल्यानंतर तिने आपले नाव मागे घेतले. 2016 मध्ये एका मुलाखतीमध्ये इव्हने घोडेस्वारीमुळे तिला एक व्यक्ती म्हणून कशी मदत झाली याबद्दल सांगितले आहे. तिच्यामते, घोडेस्वारी व्यक्तिला नम्र ठेवते. घोडेस्वारीमुळे स्वातंत्र्य, समर्पण आणि चिकाटी यांची शिदोरी मिळाली असून आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर त्याचा उपयोग होईल, असेही इव्हनं सांगितले आहे. इव्ह ज्या हॅरीसोबत लग्न करीत आहे, तोही घोडेस्वारीत तरबेज आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये टीम शो जंपिंग स्पर्धेत त्याने ग्रेट ब्रिटनला सुवर्णपदक जिंकून दिले आहे. (International News)

=========

Cambodia : कंबोडियाला स्वातंत्र्य कसे मिळाले? वाचा इतिहास

=========

या ऑलिंम्पिकमध्ये हॅरी चार्ल्सने त्याच्या घोड्याला दुखापत झाल्यामुळे वैयक्तिक शो जंपिंग फायनलमधून माघार घेतली. अन्यथा त्याच्या नावावर दोन ऑलिंपिक पदके असू शकली असती. विशेष म्हणजे, हॅरीचे वडील पीटर चार्ल्स यांनीही 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये ग्रेट ब्रिटनसाठी सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे. हॅरी चार्ल्सही अनेक ब्रँडचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. ऑलिंम्पिकनंतर इव्ह आणि हॅरी यांना अनेकवेळा एकत्र बघितले गेले. त्यावरुनच या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर या प्रेमी जोडप्यानं प्रेमाची कबुली देत, लग्नाची घोषणा केली. सोशल मीडियावर इव्ह आणि हॅरी दोघांनाही ‘नेपो बेबीज’ म्हणजेच वारशाने प्रसिद्धी मिळालेली मुले असे म्हटले जात असले तरी या दोघांनीही आपल्या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. (Harry Charles)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.