भगवान बुद्धाला मानणाऱ्या दोन आशियाई देशांमध्ये भगवान शंकराच्या मंदिरावरुन भयंकर युद्ध सुरु झाले आहे. थायलंडने कंबोडियाच्या सांस्कृतिक क्षेत्र ता मुएन थॉम आणि प्रेह विहारवर प्राणघातक हल्ले केले आहेत. थायलंडने F-16 विमानांनी कंबोडियावर केलेल्या या हल्ल्यामध्ये 11नागरिक ठार झाले असून 14 हून अधिक जखमी झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून थायलंड आणि कंबोडियामधील सीमा वाद चालू आहे. या दोन देशांमधील तणाव एवढा आहे की, काही दिवसांपूर्वी माजी कंबोडियन नेते हुन सेन यांच्याशी फोनवर बोलल्यामुळे माजी थायलंड पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा यांना राजीनामा द्यावा लागला आहे. (Cambodia and Thailand)
मात्र या वादाचे हिंसक संघर्षात रूपांतर झाले. याशिवाय या दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातमध्ये सातत्यानं गोळीबार होत असून त्यामध्ये सिसा केट प्रांताचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या सर्वामागे भगवान शंकराच्या 1000 वर्षापूर्वीच्या मंदिरावरील ताबा कोणाकडे राहिल हा वाद आहे. भारताचे शेजारी असलेल्या थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशात भगवान बुद्धांच्या विचारांना मानण्यात येते. मात्र आता हेच दोन देश युद्धाच्या वाटेवर आले आहेत. थायलंडच्या F-16 विमानांनी कंबोडियाच्या लष्करी तळांवर जोरदार बॉम्बहल्ला केला. सुरिन प्रांत आणि ओड्डार मीन्चे प्रांतात ता मुएन थॉम मंदिराजवळ या दोन्ही देशातील सैनिकांमध्ये चकमक सुरु झाली. (International News)
कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी थायलंडच्या सैनिकांनी प्रथम गोळीबार सुरु केल्याचा आरोप केला. त्यामुळे आम्ही प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. थायलंडच्या प्रमुखांनीही कंबोडियाचे नाव घेत प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याचे स्पष्ट केले आहे. कंबोडियातून झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर हल्ला करण्यासाठी एफ-16 विमाने पाठवण्यात आल्याचे थायलंडने म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधील युद्ध हे लगेच शांत होणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. गेल्या काही महिन्यापासून या दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव होता. मात्र अचानक युद्ध सुरु झाल्यामुळे नागरिकांची धावपळ सुरु झाली आहे. थायलंडमधील हल्ल्यांमुळे सीमावर्ती भागातून लोक स्थलांतर करू लागले आहेत. थायलंडने सीमेजवळील 86 गावे रिकामी केली आहेत सोबतच 40 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. (Cambodia and Thailand)
हे युद्ध जर असेच सुरु राहिले तर कंबोडियाचा यात फार दिवस निभाव लागणार नाही, हे त्यांच्या लष्करी सामर्थ्यावरुन स्पष्ट होत आहे. थायलंड आणि कंबोडियामधील लष्करी सामर्थ्याची तुलना केली तर कंबोडिया थायलंडपेक्षा खूपच कमकुवत आहे. लष्करी सामर्थ्यासाठी थायलंडचे जागतिक क्रमवारीत 25 वे स्थान आहे. तर कंबोडिया 95 व्या क्रमांकावर आहे. थायलंडमध्ये अंदाजे 3,60,000 सक्रिय सैनिक आहेत. त्यापैकी 1.6 लाख सैन्यात, 4,600 नौदलात आणि 4,200 हवाई दलात आहेत. याशिवाय 2 लाख सैनिक राखिव म्हणून आहेत. कंबोडियाची लष्करी ताकद थायलंडपेक्षा खूपच कमी आहे. (International News)
कंबोडियाकडे फक्त 2 लाख सैनिक आहेत. यासोबतच थायलंडकडे F-16, ग्रिपेन आणि अल्फा जेट्स सारखी आधुनिक लढाऊ विमाने आहेत. कंबोडियाच्या हवाई दलाकडे जुने हेलिकॉप्टर आणि मर्यादित वाहतूक विमाने वगळता विशेष काहीही नाही. थायलंडकडे 493 पेक्षा जास्त विमाने आहेत, तर कंबोडियाकडे फक्त 25 विमाने आहेत. थायलंडच्या सैन्यात 200 हून अधिक रणगाडे, डझनभर स्व-चालित तोफखाना आहे. या सर्वात कंबोडिया खूपच कमकुवत देश आहे. कारण त्यांच्याकडे नौदल लढाऊ जहाजही नाही. यासोबतच महत्त्वाचे म्हणजे, थायलंडचे सैन्य हे प्रशिक्षीत सैन्य म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे युद्ध जर असेच सुरु राहिले तर थायलंडच्या सैन्यासमोर कंबोडियाचा निभाव लागणे मुश्किल मानले जात आहे. या दोन देशांमध्ये जो वाद आहे. तो अनेक वर्ष जुना आहे. या दोन देशांच्या सीमेवरील भगवान शंकराचे मंदिर कोणाच्या ताब्यात असावे, यावरुन ही लढाई सुरु आहे. (Cambodia and Thailand)
भगवान शिवाला समर्पित हे 1000 वर्षांहून अधिक जुने आहे. मंदिर युनेस्कोच्या यादीतही समाविष्ट आहे. जगभरातील हजारो पर्यटक आणि भाविक हे मंदिर बघण्यासाठी येतात. त्यातून मोठा परकीय निधीही येत आहे. याच मंदिराचा विकास केल्यास पर्यटकांची संख्या वाढणार आहे, शिवाय देशाची आर्थिक प्रगतीही साधता येणार आहे. यामुळे या मंदिराचा पूर्ण ताबा मिळावा म्हणून थायलंड आणि कंबोडिया कित्तेक वर्षापासून संघर्ष करीत आहेत. आत्ता कंबोडियाच्या हद्दीत असलेल्या या मंदिराच्या सभोवतालच्या जागेवर थायलंड आपला हक्क सांगत आहे. 2008 मध्ये युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मंदिराचा समावेश केल्यानं मंदिराबाबत कंबोडिया आणि थायलंडमधील वाद वाढला. 2011 मध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने निर्णय दिला. पण थायलंड सरकार आणि तेथील जनतेनही या मंदिरावरील आपला हक्क कधीही सोडला नाही. (International News)
=========
Prince Mohammed bin Salman : स्वप्नातील शहराचा प्रकल्प डबाबंद होणार
=========
या तणावाचा परिणाम म्हणून आता हे युद्ध सुरु झाले आहेत. या दोन्ही देशातील सीमापार व्यापार ठप्प झाला असून बाजारपेठेत वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. कंबोडियाने थाई टीव्ही शो आणि चित्रपटांवरही बंदी घातली आहे. दुसरीकडे, थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट या दोघांनीही हे युद्ध आमच्यावर लादले गेल्याचे सांगितले आहे. युद्ध लवकर न थांबल्यास आम्ही आमच्या विरोधकांना नामशेष करु असा इशाराही या दोन्ही देशांनी दिला आहे. (Cambodia and Thailand)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics