पॅसिफिक महासागराच्या मध्यात एक छोटंसं बेट, अनाताहान आयलंड. जे फक्त 7 किलोमीटर लांब आणि 4 किलोमीटर रुंद होतं. जंगल, केळीची झाडं, नारळाची झाडं आणि या बेटावर आहेत 32 पुरुष आणि फक्त 1 स्त्री. ती या पुरुषांमध्ये फसली आहे. पण ती या बेटावर पोहचली कशी? आणि तिच्या सोबत या बेटावर काय काय झालं जाणून घेऊ.
अनाताहान बेटाची कहाणी अशी आहे की, यावर एकेकाळी स्पेनचा ताबा होता. नंतर स्पेनने हे बेट जर्मनीला विकलं आणि जर्मनीने ते जपानला विकलं. त्यानंतर हे बेट जपानच्या ताब्यात आलं. ही गोष्ट आहे 1939 सालची. जपानमधे जागेची कमतरता होती, आणि लोकसंख्या खूप होती म्हणून जपानी सरकारने एक पॉलिसी बनवली. ती अशी की आसपासच्या पॅसिफिक महासागरातल्या बेटांवर लोकांना पाठवायचं, तिथे शेती करायची आणि तिथून फळं, धान्य मिळवायचं. (Anatahan Island)
याच पॉलिसीअंतर्गत जपानच्या जवळ असणाऱ्या अनाताहान आयलंडवर केळी आणि नारळाची शेती चालायची. इथे एक कंपनी अंतर्गत काम चालायचं, जी या बेटावरच्या शेतीचं सुपरव्हिजन करायची. याच कंपनीत काम करायचा सोईची, एक स्मार्ट, हँडसम तरुण जो सुपरवायझर होता. आणि त्याच्याशी लग्न झालं होतं काजुकोचं, एक 16 वर्षांची सुंदर मुलगी. दोघं लग्नानंतर मजेत आयुष्य जगत होते. पण 1944 मध्ये सोईचीचं ट्रान्सफर झालं अनाताहान आयलंडवर.
नवीन नवीनच लग्न झालं होतं म्हणून सोईचीने आपली बायको काजुकोला आपल्यासोबत घेतलं आणि सोईचीचा बॉस मिशामी असे हे तिघं त्या बेटावर पोहोचले. पण इथूनच सगळं बिघडायला सुरुवात झाली. कारण तेव्हा दुसरं महायुद्ध जोरात सुरू होतं. अमेरिकन सैन्य पॅसिफिकमधल्या बेटांवर बॉम्बहल्ले करत होतं. यामुळे अनाताहान बेटावरचे सगळे शेतकरी घाबरून पळाले. बेट रिकामं झालं. फक्त तीन लोक बेटावर राहिले– सोईची, काजुको आणि मिशामी. (Anatahan Island)
अनेक दिवस ते तिघं तिथे राहत होते. पण एक दिवस सोईचीला बातमी मिळाली की त्याची बहीण आजूबाजूच्याच कोणत्या तरी बेटावर त्याच्या कुटुंबासोबत राहते आहे. ती युद्धात अडकली आहे. बेटावर युद्धाचा धोका जास्त आहे, असं त्याला वाटलं. म्हणून त्याने ठरवलं की, बहिणीकडे जावं आणि तिला रेस्क्यू करून इथे आणावं. म्हणून मग सोईची आपल्या बहिणीची मदत करण्यासाठी त्या बेटांवरून निघून गेला, जाताना काजुकोला त्याने हे सांगितलं की तो परत येईल. शेतकरी आधीच पळाले होते, नवरा निघून गेला, आणि आता या बेटावर फक्त दोन जण होते, काजुको आणि मिशामी. 7 किलोमीटर लांब, 4 किलोमीटर रुंद हे बेट, ज्याच्या चारही बाजूंनी समुद्र होता आणि बेटावर फक्त एक पुरुष आणि एक स्त्री. युद्धाचे दिवस होते बरेच दिवस सोईची परतला नव्हता. अशा परिस्थितीत राहताना काजुको आणि मिशामी यांच्यात जवळीक वाढली. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम वाढलं आणि दोघं पती-पत्नीप्रमाणे बेटावर राहायला लागले.
काही महिने गेले आणि आला स्टोरीमध्ये ट्विस्ट! 12 जून 1944 रोजी जपानी सैन्याचं एक जहाज अमेरिकन सैन्याने पाडलं. त्यातले 31 सैनिक कसेबसे पोहत अनाताहान बेटावर पोहोचले. सगळे तरुण, 16 ते 23 वयाचे सैनिक. त्यांना बेटावर कोणीच दिसलं नाही, आणि अचानक एके दिवशी त्यांना काजुको आणि मिशामी दिसले. हे 31 सैनिक जेव्हा काजुको आणि मिशामीला भेटले, तेव्हा मिशामीला खूप आनंद झाला, कारण त्याने ओळखलं की हे सर्व जपानी सैन्याचे सैनिक आहेत, त्याने सर्वांना मिठी मारली. त्या 31 सैनिकांनाही समजलं की हे दोघे जपानी आहेत, आणि तेही आनंदी झाले. आता काजुको आणि मिशामीने त्या 31 सैनिकांना मदत केली. त्यांना खाण्यापिण्याचं सामान दिलं, फळं कुठे मिळतात, मासे कसे पकडायचे, हे सांगितलं. सगळे एकाच देशाचे असल्याने त्यांच्यात हळूहळू मैत्री झाली.
पण आता बेटावर एकूण 33 लोक होते. 32 पुरुष आणि एक स्त्री! सुरवातीला बेटावर सगळं शांत होतं. पण हळूहळू एक विचित्र गोष्ट घडू लागली. पुरुष आणि स्त्री यांचं प्रमाण असमान असल्याने गोंधळ सुरू झाला. त्या 31 सैनिकांना समजलं की काजुको आणि मिशामी एकत्र राहतात, पण मिशामी हा काजुकोचा खरा नवरा नाही, कारण काजुकोने सुरुवातीला सांगितलं होतं की तिचा खरा नवरा, सोइची, आपल्या बहिणीला आणण्यासाठी गेला आहे. युद्धामुळे तो परत येऊ शकला नाही, कारण परत येण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे त्या 31 सैनिकांच्या मनात विचित्र विचार येऊ लागले. प्रत्येक जण काजूकोच्या प्रेमात पडला. (Anatahan Island)
पण यामुळे वातावरण खराब होऊ नये म्हणून म्हणून त्यांनी असं ठरवलं की, आम्ही काजुकोकडे वाईट नजरेने पाहणार नाही. पण त्यांनी मिशामी आणि काजुकोला सांगितलं की, तुम्ही दोघांनी लग्न करून घ्या, जेणेकरून कोणाच्याही मनात वाईट विचार येणार नाही. काजुकोला काय करावं हे समजत नव्हतं. तेव्हा मिशामीने तिला सांगितलं की, आपण नाटकाप्रमाणे लग्न करू, जेणेकरून कोणीही तुझ्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही. दोघे तयार झाले आणि 31 सैनिकांसमोर त्यांनी लग्न केलं. काही दिवस सगळं ठीक चाललं. कोणीही काजुकोकडे वाईट नजरेने पाहिलं नाही, कारण ती आणि मिशामी पती-पत्नी होते.
पण एके दिवशी अमेरिकेने एका शत्रू देशाचं विमान अनाताहान बेटाजवळ पाडलं. हे विमान पडल्यानंतर 31 जपानी सैनिकांपैकी दोन जण त्या बाजूला फिरत होते. त्यांनी किनाऱ्यावर विमानाचा ढिगारा पहिला दोन मृतदेह पाहिले आणि तिथे त्यांना दोन बंदुका आणि 90 गोळ्या सापडल्या.
या बंदुकीमुळे या शांत बेटावर एक विचित्र गोष्ट सुरू झाली. आता बेटावर एक स्त्री आणि 32 पुरुष होते, आणि प्रत्येकाच्या मनात काजुकोबद्दल विचित्र विचार होते. लग्न करूनही त्यांचं मन शांत झालं नव्हतं. जेव्हा बंदुका बेटावर आल्या, तेव्हा ज्याच्याकडे बंदूक होती, त्याने स्वतःला राजा समजलं. पहिल्या सैनिकाने, ज्याच्याकडे बंदूक होती, त्याने काजुकोला स्वत:ची गर्लफ्रेंड बनण्यासाठी धमकावलं. (Anatahan Island)
त्याने धमकी दिली जर तिने असं केलं नाही तर मी मिशामीला, मारून टाकेल. मिशामीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काजुकोला त्याची गर्लफ्रेंड बनण्यासाठी तयार केलं. कोणताही पर्याय नसल्यामुळे काजुको तयार झाली. काही दिवस गेले, दुसऱ्या सैनिकाकडे, ज्याच्याकडे दुसरी बंदूक होती, त्याने काजुकोला सांगितलं, “तू त्याला सोड आणि माझी गर्लफ्रेंड बन, नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला मारीन.” पुन्हा तेच झालं. आणि दुसऱ्याने सुद्धा जबरदस्तीने तिला गर्लफ्रेंड बनवलं.
आता यामुळे काय झालं ज्या दोन सैनिकांकडे बंदुका होत्या, ते काजुकोसाठी एकमेकांशी भांडले. भांडणात गोळी चालली आणि त्यापैकी एक सैनिक मारला गेला. आता फक्त एकच सैनिक होता, ज्याच्याकडे दोन्ही बंदुका होत्या, आणि बेटावर त्याचीच हुकूमत चालत होती. याच दरम्यान आणखी दोन लोकांचा मृत्यू झाला, आणि तोही रहस्यमय परिस्थितीत. हे दोघेही काजुकोचे चाहते होते, पण बंदुकीसमोर ते कमजोर पडले. आता बेटावर काजुकोमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता. या गोष्टी घडल्यानंतर बेटावर एक सभा बोलावली गेली. त्या सभेत ठरलं की, या बेटावर शांती होती, जोपर्यंत या दोन बंदुका इथे आल्या नाहीत. जर या बंदुका समुद्रात फेकल्या तर बेटावर पुन्हा शांती येईल. सर्वांनी याला मान्यता दिली. ज्याच्याकडे दोन्ही बंदुका होत्या, त्यानेही मान्य केलं. त्याने विचार केला की, असं चाललं तर एक एक करून सगळे मारले जातील, आणि मी एकटा कसा जगणार? त्याने दोन्ही बंदुका समुद्रात फेकल्या. बंदुका फेकल्यानंतर बेटावर पुन्हा शांती आली. (Anatahan Island)
=============
हे देखील वाचा : Rajiv Gandhi : कागदाचा एक तुकडा आणि राजीव गांधींचे खुनी सापडले
=============
पण ही शांती फक्त काही दिवस टिकली. कारण दिवसामागून वर्षं निघत होती, आणि त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. याच दरम्यान त्यांना हेही माहीत नव्हतं की, 15 ऑगस्ट 1947 रोजी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणू बॉम्ब टाकले आहेत आणि जपानने युद्धातून माघार घेतली. पण जवळपासच्या अमेरिकन सैन्याने त्या बेटांवरून वारंवार घोषणा केल्या की, युद्ध संपलं आहे, तुम्ही शरण या, तुम्हाला तुमच्या देशात पाठवलं जाईल. पण सैनिकांना वाटायचं की अमेरिका त्यांना फसवत आहे, आणि जर ते बाहेर आले तर त्यांना मारलं जाईल म्हणून ते लपून राहत होते.
बंदुका फेकल्यानंतर काही दिवस सगळं ठीक होतं, पण पुन्हा काजुकोबद्दल लोकांचं प्रेम जागृत होऊ लागलं. यानंतर मिशामीचा, खून झाला. त्यानंतर सर्वांना समजलं की हे सगळं का घडत आहे. यानंतर एक एक करून एकूण 11 खून झाले. जे त्या सैनिकांमधूनच कोणतरी केले होते. पण या खुणांचं कारण होती, कोजूको. कारण ती या बेटावरील एकमेव स्त्री होती. जे कोणी काजुकोच्या जवळ जायचा, त्याला दुसऱ्या प्रेमी सैनिकाने मारलं.
आता 32 पैकी 11 गेले, म्हणजे उरले फक्त 21 लोक. जेव्हा 11 मृत्यू झाले, तेव्हा पुन्हा एक सभा झाली. आता अनेक वर्षं निघून गेली होती. सभेत असं ठरलं की, एका मुलीमुळे हे सगळं रक्तपात होत आहे. नाहीतर आपण सगळे शांततेत राहू शकतो. मग काय करायचं? असं ठरलं की, जोपर्यंत काजुको जिवंत आहे, तोपर्यंत हे खून थांबणार नाहीत. त्यामुळे जर काजुकोला मारलं तर आपण एकमेकांचा जीव घेणार नाही. त्यांनी ठरवलं की काजुकोला मारायचं. पण यात एक ट्विस्ट आला. ज्या लोकांनी ही सभा घेतली, त्यापैकी एक सैनिक काजुकोवर खूप प्रेम करत होता. त्याला वाटायचं की काजुको फक्त त्याच्यासाठी आहे. जेव्हा सभेत काजुकोला मारण्याचा निर्णय झाला, तेव्हा त्या सैनिकाने आपल्या साथीदारांशी गद्दारी केली. त्याने गुपचूप काजुकोला सांगितलं, “तुझा जीव धोक्यात आहे, तू या बेटावरून पळून जा.” (Anatahan Island)
=================
हे देखील वाचा : Rezang La 1962 : जेव्हा १२४ भारतीय जवान ५००० चीनी सैनिकांना भिडले…
=================
काजुको घाबरली. ती रात्री जंगलात पळाली. बेटाच्या किनाऱ्यावर गेली, किनाऱ्याकिनाऱ्याने फिरत राहिली अनेक दिवस गेले. तेव्हा अमेरिकन जहाजं त्या भागातून येतजात होती. आणि तिच्या नशिबाने तिला एके दिवशी अमेरिकन जहाज दिसलं. त्या जहाजवरील लोक तिला या बेटावर पाहून चकीत झाले पण त्यांनी तिची मदत केली. आणि 33 दिवसांनी काजुको त्या लोकांपासून वाचत जपानला पोहोचली. तिने आपला जीव वाचवला. इकडे बाकीचे लोक तिला शोधत होते, पण ती सापडली नाही. सर्वांना समजलं की ती पळून गेली, पण कुठे आणि कशी, हे त्यांना समजलं नाही.
जेव्हा ती जपानला पोहोचली आणि तिने सांगितलं की, ती 1944 पासून त्या बेटावर होती.काजुकोने सांगितलं की बेटावर अजून 20 सैनिक जिवंत आहेत. जपानी सरकारने त्या बेटावर 200 पत्रं टाकली, “युद्ध संपलंय, घरी परत या.” पण सैनिकांना विश्वासच बसत नव्हता. शेवटी एका सैनिकाने एक पत्र वाचलं. त्याला कळलं, “हे माझ्या बायकोच्या हाताने लिहिलेलं आहे.” तेव्हा सगळ्यांचा विश्वास बसला. 26 जून 1951 रोजी अमेरिकन सैन्याने त्या सैनिकांना वाचवलं आणि जपानला परत आणलं. (Anatahan Island)
पण जपानला परतल्यावर या स्टोरीत आणखी ड्रामा create झाला. काजुकोला कळलं की तिचा खरा नवरा, सोईची, याने दुसरं लग्न केलंय. सैनिकांनाही कळलं की त्यांच्या बायका, कुटुंबांनी त्यांना मेलंय असं समजून पुढे आयुष्य जगायला सुरुवात केली होती आणि त्यांनीही दुसरं लग्न केलं होतं. त्यांना मुलं सुद्धा झाली होती. काजुकोने तिची ही कहाणी मीडियाला सांगितली. जेव्हा माध्यमांनी ही कहाणी ऐकली की, एका बेटावर 32 पुरुष आणि एक स्त्री, आणि त्यांनी सात वर्षं कशी काढली, ही स्टोरी इतकी धक्कादायक होती की त्यावर पुस्तकं लिहिली गेली, नाटक बनवले गेले, चित्रपट बनले. काजुको एक सेलिब्रिटी बनली. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये सांगा!
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics