Home » World War-I History : राजकुमार फ्रांज फर्डिनेंड यांच्या हत्येने सुरू झाले होते महायुद्ध?

World War-I History : राजकुमार फ्रांज फर्डिनेंड यांच्या हत्येने सुरू झाले होते महायुद्ध?

by Team Gajawaja
0 comment
World War-I History
Share

World War-I History : राजकुमार फ्रांज फर्डिनेंड (Archduke Franz Ferdinand) यांची हत्या ही पहिल्या महायुद्धाची (First World War) ठिणगी ठरली, असे मानले जाते. २८ जून १९१४ रोजी झालेल्या या घटनेने संपूर्ण युरोपात खळबळ माजवली आणि त्यातूनच एका महायुद्धाला सुरुवात झाली. याबद्दलचा इतिहास सविस्तर जाणून घेऊया.

हत्या कशी घडली?

फ्रांज फर्डिनेंड हे ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचे युवराज होते. २८ जून १९१४ रोजी ते आणि त्यांची पत्नी सोफी हे सर्बियाच्या सराजेव्हो शहरात एका अधिकृत दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान ‘ब्लॅक हॅन्ड’ (Black Hand) नावाच्या सर्बीयन राष्ट्रवादी संघटनेच्या सदस्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचे ठरवले होते. सकाळी झालेला पहिला बॉम्बहल्ला अपयशी ठरला. मात्र, काही वेळांनी गावीर्लो प्रिंसिप नावाच्या तरुण कटकर्त्याने गोळ्या झाडून फ्रांज फर्डिनेंड आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली.

युरोपातील राजकारण व तणाव

त्या काळात युरोपातील प्रमुख राष्ट्रांमध्ये असुरक्षितता, स्पर्धा आणि गुप्त करार यामुळे वातावरण चिघळलेले होते. ऑस्ट्रिया-हंगेरी हे साम्राज्य सर्बियावर संशय घेत होते की, त्यांनी हत्येमागे हात असलेल्या संघटनांना मदत केली होती. याचा वापर करत ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाला एक कठोर अल्टीमेटम दिला. सर्बियाने काही अटी मान्य केल्या, पण सर्व अटी नाकारल्यामुळे २८ जुलै १९१४ रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर युद्ध जाहीर केले.

World War-I History

World War-I History

युरोपातील युती प्रणालीचा प्रभाव

त्या काळात दोन मोठ्या युती अस्तित्वात होत्या – ट्रिपल अलायन्स (जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, इटली) आणि ट्रिपल एंटेंट (ब्रिटन, फ्रान्स, रशिया). ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर हल्ला केल्यामुळे रशियाने सर्बियाला मदतीचा हात दिला. मग जर्मनीने रशियावर युद्ध घोषित केले. त्यानंतर फ्रान्स, ब्रिटन आणि इतर राष्ट्रेही या संघर्षात ओढली गेली. काही आठवड्यांतच हा संघर्ष संपूर्ण युरोपभर पसरला आणि पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली.

=========

हे देखील वाचा : 

Nelson Mandela : नेल्सन मंडेला यांना अमेरिका का घाबरायची? वाचा कारणे

Nescafé Coffee Success Story : नेसकॅफेच्या कॉफीची या व्यक्तीने केली सुरुवात, वाचा यशाची कथा

Akbar : अकबर महान होता की क्रूर? वाचा त्याच्या व्यक्तीमत्वाचे किस्से

============

युद्धाची व्याप्ती आणि परिणाम

फक्त फ्रांज फर्डिनेंड यांची हत्या ही कारणीभूत नसली तरी ती एक ठोस निमित्त ठरली. या घटनेने आधीच चिघळलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांना पेटवले. १९१४ ते १९१८ या कालखंडात जगभरात अनेक देश युद्धात सहभागी झाले. कोट्यवधी सैनिक मारले गेले, संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आणि राजकीय व्यवस्था बदलल्या.(World War-I History)

फ्रांज फर्डिनेंड यांची हत्या हा पहिल्या महायुद्धाचा तात्काळ कारण ठरले, पण त्या मागे असलेल्या राजकीय असंतोष, साम्राज्यवादी महत्वाकांक्षा, युती व्यवस्था आणि राष्ट्रवाद हे सर्व घटक युद्धाच्या मुळाशी होते. ही घटना एक ठिणगी होती, जिच्या आगीत अख्खा जग होरपळून निघाला.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.