Home » Health : बीटचे सेवन केल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

Health : बीटचे सेवन केल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

सध्याची प्रत्येकाची जीवनशैली खूपच विचित्र आणि त्रासदायक बनली आहे. तासंतास काम, वेळी यावेळी झोप, व्यायामाचा अभाव आदी अनेक कारणांमुळे आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान होत आहे. मात्र आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील लोकांना वेळ नाही, हेच नवल आहे. निरोगी आरोग्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यायची अजिबातच गरज नाहीये. रोज थोडा व्यायाम, पोषक सकस जेवण आणि योग्य झोप. या तीन गोष्टी जरी पाळल्या तरी तुम्ही बऱ्यापैकी आजारांना लांब ठेऊ शकता. (Beetroot Benefits)

जर आपण आपल्या जेवणाबद्दल बोलायचे ठरवले तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाज्यांमध्ये देखील मोठे पोषक गुणधर्म भरपूर आहेत. प्रत्येक भाजी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. अशीही एक भाजी किंवा कंद म्हणजे बीट. बीट हे नाव ऐकताच अनेकांना आनंद झाला असेल तर काहींच्या कपाळावर आठ्या आल्या असतील. मात्र बीट आपल्या शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक समजले जाते. बीट खाण्याचे भरपूर फायदे आहेत. महागड्या गोळ्या औषधांनी देखील एवढे चांगले फायदे आपल्याला मिळणार नाही जेवढे एक साधे बीट खाऊन मिळतील. (Health News)

बीट हे एक सुपरफूड आहे. त्यात मुबलक प्रमाणात मॅंगनीज, पोटॅशियम, लोह, फोलेट, व्हिटॅमिन बी6, सी आणि ए सारखे आवश्यक पोषक घटक आढळतात. शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी बीट फायदेशीर ठरू शकते. बीट हे केवळ रक्त वाढवत नाही तर आतडे स्वच्छ करते, मन तीक्ष्ण करते, त्वचेचा पोत सुधारते, रक्तदाब नियंत्रित करते. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे बीटाबद्दल म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जाणून घेऊया बीट खाण्याचे फायदे. (Todays Marathi HEadline)

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी
आजकाल बहुतेक लोकांसाठी उच्च रक्तदाब ही गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. त्यावर पोषक तत्वांनी समृद्ध बीट उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. (Marathi Latest News)

Health

प्रेग्नंसीमध्ये फायदेशीर
बीट गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. ते केवळ अशक्तपणा रोखत नाही तर गर्भाशयातील बाळाच्या विकासात देखील मदत करते. ते पाठीच्या कण्याशी संबंधित स्पायना बिफिडा या आजाराला देखील प्रतिबंधित करते.

रक्त वाढवण्यासाठी
यामध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीरात रक्त प्रवाह वाढतो आणि ॲनिमियापासून बचाव होतो. बीटमध्ये बीटालेन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. कर्करोग आणि इतर आजारांपासून बचाव करण्यास मदत करते.

उत्तम पचनक्रियेसाठी
बीट हा फोलेटचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. पचनासाठी फायदेशीर – बीटरूटमध्ये भरपूर फायबर आढळते, ज्याचे सेवन केल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात. चांगल्या पचनासह, बीटचे नियमित सेवन केल्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित जुनाट आजारांचा धोका देखील कमी होतो. बीटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात, जे वजन कमी करण्यास मदत करते. (Marathi Top HEadline)

ऊर्जादायी
बीटचे सेवन केल्याने स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. नियमित बीटरूट खाल्ल्याने शरीरात ऑक्सिजन वाढतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची ऍथलेटिक कामगिरी सुधारते. सर्वोत्कृष्ट परिणामांसाठी तुम्ही कोणतीही शारीरिक क्रिया करण्यापूर्वी सुमारे २ तास आधी बीटचा रस घेऊ शकता. (Marathi News)

मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी
मेंदू हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. बीट हे नायट्रेट्सने समृद्ध आहे, त्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासोबत रक्त प्रवाह वाढवतो. बीटचे नियमित सेवन केल्याने मेंदूची स्मरणशक्तीही सुधारते.

चांगल्या त्वचेसाठी
बीटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करतात आणि त्वचेच्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. त्यात असलेले व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते, जे त्वचा घट्ट आणि मऊ ठेवते. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी त्वचा चमकदार आणि केस मजबूत करतात. (Marathi Latest Headline)

==========

हे देखील वाचा : Health : छातीत कफ साठल्यामुळे त्रास होतो? ‘हे’ उपाय करा आणि आराम मिळवा  

Coconut Water : आरोग्याच्या दृष्टीने अमृतासमान आहे नारळ पाणी

============

आस्टिओपरोसिसपासून बचाव
बीटमध्ये मिनरल सिलिका असते. या तत्त्वामुळे शरीर कॅल्शियमला प्रभावी रुपात वापरता येऊ शकते. कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. यामुळे दिवसातुन दोन वेळा बीटचे ज्युस प्यायल्याने आस्टिओपरोसिस आणि हाडे व दातांच्या दुसऱ्या समस्या होणार नाही. (Top Stories)

बीट कोणी खाऊ नये
मधुमेह, किडनी स्टोन आणि कमी रक्तदाब असलेल्यांनी बीटचे नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे, याच्या जास्त सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी ते नियमित घेऊ नये. त्यात ऑक्सॅलेट्स देखील असतात, ज्यामुळे स्टोन रूग्णांची समस्या वाढू शकते. (Social Updates)

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.