उत्तर कोरियाचा हुकूमशहा, किम जोंग उन हा त्याच्या सणकी स्वभावासाठी ओळखला जातो. किमच्या मनात कधी काय येईल, याचा नेम सांगता येत नाही. आता हा किम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, तो त्याच्या वाढलेल्या वजनामुळे. सव्वाशे किलोचे वजन पार केल्यामुळे आता किमने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी त्यानं परदेशातून औषधे मागवली आहेत. यात विक्षिप्तपणा काय, असा प्रश्न पडला असेल तर जरा थांबा…कारण किमला त्याचे वजन कमी करायचे आहे, पण यासाठी किम सुरुवातीला त्याच्या देशातील नागरिकांवर प्रयोग करणार आहे. (Kim Jong Un)
किमने जी औषधे वजन कमी करण्यासाठी परदेशातून मागवली आहेत, त्या औषधानी खरोखर वजन कमी होते का, किंवा त्याचा शरीराला काही त्रास होतो का, याची चाचपणी किम त्याच्या देशातील नागरिकांवर करणार आहे. त्यासाठी किमच्या वजनाइतक्या नागरिकांची निवड करण्यात आली आहे. उत्तर कोरियाच्या या नागरिकांना वजन कमी करण्याचे औषध देण्यात येणार आहे. या नागरिकांचे वजन कमी झाले, आणि त्याचा शरीरावर काहीही दुष्परिणाम झाला नाही, तरच किम ही औषधे घेणार आहे. अर्थात याच किमच्या याच स्वभावामुळे त्याला सणकी हुकूमशहा म्हणून ओळखले जात आहे.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याला त्याच्या वाढत्या वजनाची काळजी वाटू लागली आहे. किम याला उच्च रक्तदाब आणि मधुमेहासह लठ्ठपणाशी संबंधित आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे तो त्याच्या वाढत्या वजनाबाबत जागरुक असतो. आता किमनं त्याच्या या वाढलेल्या वजनाला कमी करण्यासठी ओझेम्पिक या परदेशी औषधाचा वापर करण्याचे ठरवले आहे. ओझेम्पिक हे औषध टाइप 2 मधुमेह असलेल्यां रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी वापरले जाते. या औषधामुळे वजही कमी होते. हे वजन कमी करणारे औषध आता किम वापरणार आहे. पण यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे, या औषधांची चाचणी किम प्रथम त्याच्या देशातील नागरिकांवर करणार आहे. किमनं त्याच्या अधिका-यांना ओझेम्पिक औषध मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. ही औषधे उत्तर कोरियामध्ये आल्यावर त्याचा प्रथम किमसारख्याच वजनाच्या व्यक्तींवर करण्यात येणार आहे. (Kim Jong Un)
यापूर्वीही किम जोंग उन याचे वजन 140 किलो झाले होते. तेव्हाही त्याच्या तब्बेतीबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. 2021 मध्ये किमनं आपलं वजन कमी केलं. तेव्हा त्यानं परदेशी औषधाचा वापर केला, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता किमचे वजन पुन्हा वाढले आहे. 125 किलोहून अधिक वजन आता झाल्यानं किमनं ओझेम्पिक या औषधाचा वापर करण्याचे निश्चित केले आहे. हे औषध खरेदी करण्याच्या सूचना त्यानं आपल्या अधिका-यांना दिल्या आहेत. शिवाय उत्तर कोरियामधील 125 किलो वजन असलेले नागरिकही शोधायचा आदेश त्यानं दिला आहे. या नागरिकांवर ओझेम्पिक या औषधाची चाचणी आधी घेण्यात येणार आहे. किमचे वडील किम जोंग इल यांनी देखील अशाप्रकारचे प्रयोग केले आहेत. किम जोंग इल हे कुठलेही औषध घेण्यापूर्वी ते आपल्या सहका-यांना घ्यायला लावायचे. त्यांच्या शरीरावर काही दुष्परिणाम झाले नाहीत, तर किम जोंग इल ते औषध घ्यायचे. आता त्यांचा मुलगाही तसाच प्रयोग करीत आहे. (International News)
हे सर्व होत असतांना किम जोंग उन आपली शाही जीवनशैली मात्र सोडायला तयार नाही. किम हा त्याच्या सिगरेट आणि दारुच्या व्यसनासाठी ओळखला जातो. उत्तर कोरियामध्ये परदेशी अन्नपदार्थ खाण्यास बंदी असली तरी स्वतः किम हा परदेशी खाद्यापदर्थांचा शौकीन असल्याची माहिती आहे. त्यात किमच्या वडीलांनाही उच्च रक्तदाबआणि ह्दयविकार होता. आता किमलाही हेच आजार आहेत. किम उच्च रक्तदाब, मधुमेह आणि संधिरोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती आहे. किमचे किमच्या वडीलाचा आणि आजोबांचा मृत्यू ह्दयविकारानं झाला आहे. त्यामुळे किम आपल्या तब्बेतीची अधिक काळजी घेतो, पण या सर्वात आवश्यक असलेले खाद्यवेळापत्रक मात्र किम कधीच पाळत नाही. त्यामुळेच त्याचे वजन वाढत आहे. आता किम हे वजन कमी करतांना त्याच्या नागरिकांवर प्रयोग करणार असल्यामुळे किमसारखे वजन वाढलेल्या नागरिकांना भीती वाटू लागली आहे. (Kim Jong Un)
================
हे देखील वाचा : Dalai Lama : दलाई लामांना भारताने आश्रय तर दिला, पण चीनमुळे …
==============
वजन कमी करण्यासाठी किम जे औषध घेणार आहे, ते ओझेम्पिक औषध हे टाइप 2 मधुमेह आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी देखील या औषधाचा वापर केला जातो. ओझेम्पिक इन्सुलिनचा स्राव वाढवून, पोट रिकामे होण्याचे प्रमाण कमी करून आणि यकृताद्वारे साखरेचे उत्पादन कमी करून कार्य करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारते, जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक नियंत्रित होते. त्यामुळे वजनही कमी होते. आता याच औषधामुळे किमचे वजन कमी होईल, तेव्हा होईल, पण त्या आधी उत्तर कोरियाच्या नागरिकांना भीती वाटू लागली आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics