Home » AirForce : 62 वर्षांच्या सेवेनंतर Mig-21 होणार निवृत्त

AirForce : 62 वर्षांच्या सेवेनंतर Mig-21 होणार निवृत्त

by Jyotsna Kulkarni
0 comment
AirForce
Share

कायमच भारताच्या संरक्षण दलाची संपूर्ण जगात चर्चा होताना दिसते. भारत कायमच आपली ताकद या आपल्या संरक्षण दलातून जगाला दाखवत असतो. याच संरक्षक दलाच्या जोरावर आजवर भारताने अनेक मोहिमा यशस्वी फत्ते केल्या आहेत. यातही भारताच्या वायुदलाची बातच निराळी आहे. आताच काही दिवसांपूर्वी भारताने याच वायुदलाच्या जोरावर ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करून दाखवले होते. आता याच वायुदलात एक अतिशय महत्वाचे आणि मोठे विमान निवृत्त होत आहे. अनेक युद्धांमध्ये महत्वाची भूमिका बजावलेले ‘मिग 21’ हे विमान आता निवृत्त होत आहे. (Indian Airforce)

६२ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय हवाई दल अखेर सप्टेंबरमध्ये ‘फ्लाइंग कॉफिन्स’ नावाचे त्यांचे मिग-२१ लढाऊ विमान निवृत्त करणार आहे हा एक चांगला निर्णय आहे. जगातील कोणतेही हवाई दल इतके जुने विमान वापरत नाही. मिग-२१ लढाऊ विमान १९ सप्टेंबर रोजी निवृत्त होईल. चंदीगड एअरबेसवर या लढाऊ विमानाचा निरोप समारंभ आयोजित केला जाईल. त्यानंतर, विमानाच्या सेवा अधिकृतपणे संपतील. (marathi News)

मिग-२१ जेट पहिल्यांदा १९६३ मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. ते भारताचे पहिले सुपरसॉनिक जेट होते, म्हणजेच ते ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उडू शकते. या लढाऊ विमानाचे शेवटचे विमान २३ व्या स्क्वॉड्रनचा भाग आहे, ज्याला पँथर्स म्हणूनही ओळखले जाते. या प्रदीर्घ काळात या विमानाला अनेक अपघात झाले. त्यामुळे ‘उडती शवपेटी’ म्हणून बदनाम झालेले हे विमान सेवेतून काढून टाकण्याची मागणी अनेक वर्षे केली जात होती. या विमानांची जागा आता तेजस मार्क 1ए या स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टने घेणार आहे. (Todays Marathi HEadline)

१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात, १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात, १९९९ च्या कारगिल युद्धात आणि २०१९ च्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात मिग-२१ या लढाऊ विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्याची जागा तेजस एमके१ए लढाऊ विमान घेईल. सुखोई, राफेल सारखी विमाने नंतर खरेदी करण्यात आली. यापूर्वी भारतीय हवाई दल फक्त मिग-१९, मिग-२१ आणि मिग-२९ वर अवलंबून होते. (Top Trending News)

AirForce

भारतीय हवाई दलाच्या शूर वैमानिकांनी आपला जीव धोक्यात घालून ही विमाने उडवणे सुरू ठेवले. संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ४०० हून अधिक मिग-२१ विमाने कोसळली आहेत. यामध्ये २०० हून अधिक वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. म्हणूनच या विमानाला ‘उडणारी शवपेटी’ असे म्हटले जाते. हे विमान रशियाने बनवले असले तरी, त्यात अनेक त्रुटींमुळे ते अनेकदा क्रॅश होते. रशियाने हे विमान १९८५ मध्येच निवृत्त केले होते. इतकेच नाही, तर अफगाणिस्तान आणि बांगलादेशनेही हे विमान निवृत्त केले आहे. (Top Marathi News )

मिग-21 हे एक हलके, सिंगल पायलट फायटर जेट आहे. भारतीय हवाई दलाने हे विमान पहिल्यांदा १९६० च्या दशकात मिग-21 विमानांचा आपल्या ताफ्यात समावेश केला होता. सोव्हिएत रशियाच्या मिकोयान-गुरेविच डिझाइन ब्युरोने १९५९ मध्ये याचे उत्पादन सुरू केले होते. हे विमान १८,००० मीटर उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. हे एअर-टू-एअर क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे. याचा कमाल वेग २२३० किलोमीटर प्रति तास म्हणजेच १,२०४ नॉट्स पर्यंत असू शकतो. १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात मिग-21 विमानांचा वापर झाला होता. (Marathi Top Headline)

या युद्धांत मिग विमानांनी महत्वाची भूमिका निभावली होती. १९७१ मध्ये भारतीय मिगने चेंगडू एफ-७ विमान पाडले होते. हे विमान खूपच जुने आहे. मिग सिरीजच्या विमानांचे वयोमान खूप जास्त आहे. १९६३ मध्ये मिग सिरीजचे पहिले विमान भारताला मिळाले होते. अनेक दशके ते सेवा बजावत आहे. मात्र पायलटच्या प्रशिक्षणासाठी हे विमान सोपे असल्याने ते आजही वापरात होते. अनेक दशकानंतरही अनेक विमाने आपली सेवा देत आहेत. मिग – 21 विमानाला सिंगल इंजिन असल्याने उड्डाणावेळी एक इंजिन खराब झाले तर मदतीला दुसरे इंजिन नसते. त्यामुळे अशावेळी पॅराशूटमधून उडी मारण्याशिवाय पर्याय नसतो. (Marathi Latest News)

==============

हे देखील वाचा : Owana Maria : ‘त्या’ बेटावर ती १८ वर्ष एकटीच राहिली आणि मग… 

Rajguru : राजगुरूंनी शेर मारला सगळेच शांत…मग झालं असं काही…

==============

मिग-२१ विमानाची रचना
या विमानात हवा समोरून आत ओढली जाते. त्यामुळे रडार ठेवण्याची जागा नाही. या कारणामुळे पाश्चात्य देशात हा आराखडा फारसा उपयोगात आला नाही. या विमानात इंधनाच्या टाकीतून एका प्रमाणाबाहेर इंधन वापरले गेले, तर विमानाचा गुरुत्व मध्य मागच्या बाजूला घसरतो. त्यामुळे त्याची क्षमता ४५ मिनिटे उड्डाणाची ठरते. त्रिकोनी पंखाच्या आकारामुळे हे विमान वेगात वर चढू शकत असले, तरी ते वाळवताना मात्र त्याचा वेग खूप कमी होतो. (Top Stories)

हे विमान ४६२५० फुट प्रतिमिनिट इतक्या वेगात हवेत झेप घेते. हा वेग अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-१६ विमानाइतका ठरतो. या विमानात सुधारणा करत मिग-२३ आणि मिग-२७ ची निर्मिती करण्यात आली. या विमानाचे सोपे असलेले नियंत्रण, जोरदार इंजिन यामुळे हे विमान उडवण्यासाठी सोपे आहे. तसेच, विमानाच्या मुख्य पंखामागे असलेल्या छोट्या पंखांमुळे विमानाला स्थिरता लाभते. यामुळे नवख्या किंवा किमान प्रशिक्षण असलेल्या वैमानिकालाही हे विमान सहजतेने हाताळता येते. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.