येत्या २९ जुलै रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. श्रावण महिन्यातला नागपंचमीचा दिवस खूपच महत्वाचा समजला जातो. श्रावण हा भगवान महादेवांना समर्पित असलेला महिना असल्याने या महिन्यात येणाऱ्या नागपंचमीला विशेष महत्व लाभले आहे. या दिवशी संपूर्ण देशात नागांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. या दिवशी त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि निरोगी आयुष्याची कामना केली जाते. नागपंचमीच्या पूजा करताना आपण नागांच्या फोटोची किंवा रांगोळीने काढलेल्या नागाची पूजा केली जाते. मात्र महाराष्ट्रात एक गाव आहे, जिथे चक्क जिवंत नागांची पूजा केली जाते. या गावात अशी पूजा करण्याची खूपच जुनी प्रथा आहे. (Nagpanchami NEws)
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे मागील अनेक दशकांपासून नागपंचमीसाठी जिवंत साप, नाग पकडून त्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या दिवशी या सापांची पूजा होते. त्याचे खेळ होतात. तसेच प्रदर्शनही भरवले जाते. त्यांच्या मोठय़ा मिरवणुका काढल्या जातात. मुख्य म्हणजे ही प्रथा केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात हे बत्तीस शिराळा गाव याच प्रथेसाठी ओळखले जाते. या गावात जशी नागपंचमी साजरी होते तशी नागपंचमी कुठेच होत नसेल. आज आपण याच गावातील नागपंचमीच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया. (Marathi News)
दहाव्या अकराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करण्याचे हेतूने सांगलीतील शिराळ्यात आले होते. श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते गावातील महाजनांच्या घरी गेले. त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती. पूजेमुळे गोरक्षनाथांना तिला भिक्षा द्यायला वेळ झाला. स्त्रीला वेळ लागला यामुळे गोरक्षनाथांनी वेळ लागण्याचे कारण तिला विचारले. तिने नाग पूजा करत असल्याने भिक्षा द्यायला वेळ लागला असे सांगितले. त्यावेळी त्यांनी तिला जिवंत नागाची पूजा करणार का, असे विचारले आणि तिने देखील त्यांना लगेच होकार दिला. तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली असे सांगितले जाते. येथील भगिनी नागाला आपला भाऊ मानतात. त्याचा उपवास करतात. तो सूक्ष्म रूपाने घरात येईल, त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकात चिरणे, तळणे वर्ज्य केले जाते. (Todays Marathi HEadline)
१९५३ साली नागपंचमी कशी साजरी केली जायची, याची माहिती १९५४ च्या किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. याच माहितीवरून एक व्हिडिओ तयार केला गेला आणि हा व्हिडिओ अमेरिकेत दाखवण्यात आला. त्यानंतर नॅशनल जिऑग्राफीने शिराळ्यात येऊन या प्रथेबद्दल एक शॉर्ट फिल्म बनवली आणि ती टेलिकास्ट केली. यानंतर या शिराळ्यातील नागपंचमीला संपूर्ण जगभर प्रसिद्धी मिळाली. नागपंचमीच्या दिवशी या गावातील कोतवाल कुटुंबीय राजगिरा, शेवगा, वांगी, दोडका, वाटणा, वरणा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी, गवारी, श्रावण घेवडा, मुळा, चवळी, मेथी, शेपू, तांबडा, भोपळा, भोपळीची भाजी, आळूवाडी, बिन, लोणचे अशा २१ भाज्यांचा नैवेद्य नागाला दाखवतात. (Top Trending NEws)
कोतवाल कुटुंबातील महिला सकाळी लवकर उठून वारुळ पूजा करून नंतर अंबाबाईच्या मंदिरात पूजेला जातात. त्यानंतर घरी आल्यावर त्या नागाच्या तुळईची पूजा करतात. रामचंद्र आणि तुकाराम कोतवाल यांच्या घरात एक वर्षी कुठेच नाग सापडला नाही. नैवेद्य तर तयार होता, पण नाग नसल्याने हा नैवेद्य कोणाला दाखवायचा याच चिंतेत हे कुटुंब होते. मात्र अचानक तुळईवर नाग आला. सगळ्यांना आनंद झाला, त्यानंतर या ठिकाणी नागाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवण्यात आला. अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून आजवर नागाची आणि तुळईची पूजा केली जात आहे. येथील मातीच्या नागाची पूजा केल्या शिवाय महिला उपवास सोडत नाहीत. (Top Marathi HEadline)
हे वाचून नक्कीच सगळ्यांना आश्चर्य वाटेल. जसे गावोगावी गणेश मंडळं असतात तसेच शिराळा गावात ६५ ते ७० नाग मंडळे आहेत. या मंडळाच्या माध्यमातून नागपंचमी साजरी केली जाते. आधी एक महिना अगोदरच बेंदूर सणा पासून अंबामाता मंदिरात नारळ फोडून नाग पकडण्यास सुरुवात केली जायची. नागपंचमी निमित्त शिराळ्यात उंच उभा राहणारा नाग, जाड नाग, उत्कृष्ट नाग,अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जायचे. नागपंचमी नंतर या पकडलेल्या नागांना सोडले जात होते. (Latest Marathi News)
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?
Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’
=========
मात्र या गावात आता अशी नागपंचमी साजरी केली जात नाही. प्राणी हक्क संघटनांच्या आक्षेपानंतर २००२ साली सर्वोच्च न्यायालयाने जिवंत नागाची पूजा बंद करण्याचे आदेश दिले आणि या प्रथेत खंड पडला. प्राणिमित्र आणि इतर सामाजिक संघटनांनी जिवंत नागांच्या पूजेवर बंदी आणण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर वन्यप्राणी कायद्यानुसार न्यायालयाने जिवंत नागांच्या पूजेवर निर्बंध घातले. शिराळा गावात जिवंत नागांच्या पूजेची परंपरा खंडित झाली. आजसुद्धा शिराळा गावातील लोकं जिवंत नागांची पूजा करण्याच्या परवानगीची मागणी करीत आहेत. सध्या नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांच्या ऐवजी प्रतीकात्मक नागांची पूजा करून शिराळा गावातील लोकं नागपंचमी साध्या पद्धतीने साजरी करतात. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics