आपण या जगात येतानाच आपल्यासोबत सर्व नाती घेऊन येतो. ही नाती आपल्या आवडीची असो किंवा नसो पण ती कायम आपल्यासोबत जोडली जातात. मात्र मैत्रीचेच एकमेव नाते असे आहे, जे आपण आपल्या आवडीने आणि ठरवून जोडतो. हे नाते तयार करताना आपण पूर्ण विचार करून मगच आपल्या आयुष्यातील मैत्राची जागा कोणाला देतो. सगळ्यांसाठीच मैत्रीचे नाते खूपच खास असते. आपल्या सुख-दुःखात कोणी आपल्यासोबत सोबत असो किंवा नसो पण आपले मित्र कायम आपल्यासोबत असतात आणि आपल्याला साथ देतात. खूप कमी असे नशीबवान लोकं असतात ज्यांना खरे मित्र मिळतात. (Marathi News)
चांगले मित्र मिळायला नशीब लागते आणि हे मित्र टिकवायला आपली निष्ठा लागते. आपण आपल्या आयुष्यातील सर्वच खास नाती खास दिवशी साजरे करत असतो. यासोबतच मैत्रीचे नाते देखील साजरे करण्यासाठी वर्षात एक दिवस राखीव ठेवलेला असतो. मैत्री साजरी करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते, मात्र तरीही वर्षातला एक दिवस मैत्रीच्या नावे असतो, यालाच फ्रेंडशिप डे असे म्हटले जाते. (Todays Marathi HEadline)
संपूर्ण जगात ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या दिवशी सर्व मित्र एकत्र येतात आणि संपूर्ण दिवस एकेमकांच्या सोबत मजामस्ती करत घालवतात. आपल्या आवडत्या मित्रासाठी खास भेटवस्तू घेणे, तो आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे याची जाणीव त्याला या दिवशी करून दिली जाते. मात्र हा दिवस साजरा करण्याची प्रथा कधी रूढ झाली?, या दिवसाला नक्की कोणता इतिहास आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या लेखातून जाणून घेऊया.(Top Trending News)
‘फ्रेंडशिप डे’ची सुरुवात कशी झाली ?
फ्रेंडशिप डेची सुरुवात कशी झाली यावरुन अनेक अख्यायिका आहेत. असे म्हटले जाते की 1935 मध्ये अमेरिकन सरकारने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीला मृत्यूदंड झाला होता. ही बातमी कळल्यानंतर त्याचा मित्राने देखील जीव दिला, ‘फ्रेंड शिप डे’ची ही कहाणी या घटनेनंतर सुरुवात झाली.जीवनात मैत्रीचे महत्व कळण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. (Top Marathi News)
फ्रेंडशिप डेचा इतिहास खूप जुना आहे. ३० जुलै १९५८ मध्ये पॅराग्वे या देशात पहिल्यांदा फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. २०११ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतरित्या ३० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. बहुतांश देशात या तारखेला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. त्यानुसार, यंदाच्या वर्षी ४ ऑगस्ट रोजी भारतात मैत्री दिवसाचा उत्सव साजरा केला जाईल. (Top Marathi HEadline)
मैत्रिला समर्पित असणाऱ्या या दिवसाचे जगभरात विशेष महत्त्व आहे. तसेही मैत्रीला विशेष अशा कोणत्याही दिवसाची गरज नसली तर एक दिवस खास मैत्रीसाठी राखीव ठेवला गेला आहे. अशा या फ्रेंडशिप डे च्या दिवसाची सर्वच मित्र आतुरतेने वाट पाहतात. मैत्रीचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यंदा भारतात ३ ऑगस्ट २०२५ रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल. (Marathi Latest News)
मैत्री म्हणजे प्रेम, आपुलकी, आनंद, समाधान, उत्साह. मैत्रीचे नाते हे रक्ताच्या नात्याहूनही अधिक घट्ट असते. प्रत्येकाच्याच आयुष्यात जीवाला जीव देणारा किमान एक तरी मित्र असलाच पाहिजे. मैत्रीच्या नात्यात कधीही जात, धर्म, वंश, वर्ण अशा प्रकारच्या मर्यादा, अडथळे येत नाहीत. आपल्या देशात जर पाहिले तर द्वापारयुगातच खऱ्या आणि निखळ मैत्रीचे मोठे उदाहरण पाहायला मिळते. कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे उदाहरण तर आजही दिले जाते. श्रीमंत कृष्ण आणि गरीब ब्राह्मण असलेल्या सुदामा यांच्या मैत्रीला आजही सर्वच सलाम करताना दिसतात. (Top Stories)
==================
हे देखील वाचा : Japan : अजबच… जपानमध्ये वाढतोय गायब होण्याचा ट्रेण्ड !
Jodhpur : एलियन, भूकंप आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचं रहस्य!
==================
याशिवाय जर आपण पाहिले तर आपल्या लोकांच्या आयुष्यातील मैत्रीचे स्थान ओळखून बॉलीवूडने देखील त्याला कायमच चित्रपटांच्या माध्यमातून पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलिवूडमध्ये अनेक मैत्रीवर आधारित सिनेमे तुफान गाजले. अगदी शोलेपासून ते दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारापर्यंत अनेक मैत्रीवर आधारित चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवले आहे. मैत्रीचे नाते शब्दात व्यक्त की करणे खूपच अवघड आहे. मात्र एक नक्की मित्र प्रत्येकाच्याच आयुष्यात असावे पण “मित्र नेहमी अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढवणारे नसावेत, स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील, पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र दैवानेच लाभतात” व. पु, काळेंनी मार्मिक शब्दातच मित्र कसे असावे आणि कसे असू नये हे मांडले आहेत. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics