आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक व्यक्तीने स्वतःची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. कारण आजकाल कोणतेही आजार व्हायला वयाचे बंधन राहिलेले नाही. कोणताही आजार कोणाला कधीही होतो. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम, योगा करणे आवश्यक झाले आहे. दररोज सकाळी जास्त नाही पण बेसिक योगा करण्याचा दंडक प्रत्येक व्यक्तीने घातला पाहिजे. असाच एक योगा प्रकार म्हणजे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम करण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. त्यामुळे अतिशय सोपा मात्र फायदेशीर असा हा प्राणायाम सगळ्यांनीच केला पाहिजे. मग नक्की भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय? आणि त्याचे फायदे कोणते? चला जाणून घेऊया. (Marathi News)
भ्रामरी प्राणायम म्हणजे काय?
भ्रामरी हा शब्द ‘भ्रमर’ या शब्दापासून आला असून, याचा अर्थ भुंगा असा आहे. या प्राणायाममध्ये जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा भुंग्यासारखा आवाज निर्माण होतो. हा आवाज संपूर्ण अंतर्मनाला आराम देतो. हा आवाज थेट तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि विश्रांतीची भावना निर्माण करतो. एका मुलाखतीमध्ये तज्ञ व्यक्तीने सांगितले, ‘न्यूरोलॉजिकल सायन्सच्या संशोधनानुसार, भ्रामरी प्राणायाम कोणत्याही वयात तुमचे मन समतोल करू शकतो. हा सराव मेंदूच्या त्या भागाला शांत करण्यास मदत करतो जो ताण, चिंता आणि राग नियंत्रित करतो.’ (Todays Marathi HEadline)
भ्रामरी प्राणायाम कसे करावे?
भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ बसा. त्यानंतर दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी दोन्ही कानं बंद करा. दोन्ही हातांच्या तर्जनी कपाळावर ठेवा. मधले बोट आणि त्याच्या बाजुचे बोट डोळ्यांवर ठेवून डोळे बंद करा. दोन्ही हातांच्या करंगळी गालावर ठेवा. यानंतर दिर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत हळूहळू ओंकार म्हणा. यातला ओमकार लहान ठेवून म कार मोठा असावा. असे साधारण २१ वेळा करावे. (Latest Marathi News)
भ्रामरी प्राणायामचे करण्याचे फायदे
> मनाला तात्काळ आराम देते. सर्व चिंता, नैराश्य आणि ताण काढून टाकण्यास मदत मिळते
> भ्रामरी प्राणायममुळे झोप सुधारते आणि त्यामुळे शरीरालाही आराम मिळतो
> भ्रामरी प्राणायाम केल्याने रागावर नियंत्रण मिळवता येते.
> ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी भ्रामरी प्राणायाम केला पाहिजे.
> विद्यार्थ्यांनी देखील या प्राणायामाचा अभ्यास केला पाहिजे. कारण यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि सोबतच एकाग्रता देखील चांगली होते.
> चिंता आणि पॅनिक अटॅकपासून त्वरित आराम मिळतो
> मानसिक लक्ष केंद्रित करणे आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी भ्रामरी प्राणायमचा उपयोग करून घेऊ शकता.
=========
हे देखील वाचा :
Health Care : शरीरातील रक्त वाढीसाठी लोहयुक्त गोळ्यांचे सेवन करता? लक्षात ठेवा या गोष्टी
=========
> मुले, वृद्ध आणि काम करणाऱ्या लोकांसह सर्वांसाठी फायदेशीर असून विज्ञानदेखील त्याच्या परिणामावर विश्वास ठेवते.
> दररोज भ्रामरी प्राणायाम केल्याने शांत झोप लागते. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, अशा लोकांनी भ्रामरी प्राणायामाचा सराव केला पाहिजे.
> भ्रामरी प्राणायामाचा सराव केल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी दररोज भ्रामरी प्राणायाम करावा.
(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics