सध्या सगळीकडे फक्त एकाच सिनेमाची चर्चा आहे आणि तो सिनेमा म्हणजे ‘सैयारा’. अहान पांडे आणि अनीत पड्डा या नवोदित कलाकारांच्या सिनेमाने बॉक्स ऑफिस अक्षरशः दणाणून सोडले आहे. जिकडे तिकडे फक्त ‘सैयारा’ बद्दलच चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील या सिनेमाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. अतिशय सुंदर आणि आकर्षक प्रेमकहाणी ‘सैयारा’मधून दाखवण्यात आली आहे. कोणतेही प्रमोशन न करता देखील या सिनेमाने एकच धमाका केला आहे. सगळ्यांनाच सिनेमाची कमाई आणि हे यश पाहून आश्चर्य वाटत आहे. (Marathi News)
‘सैयारा’ चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत नवनवे कमाईचे विक्रम रचले आहेत. प्रदर्शनानंतर या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात प्रचंड कमाई केली. ‘सैयारा’ने ‘रेड 2’ आणि ‘केसरी चॅप्टर 2’ सारख्या मोठ्या चित्रपटांना देखील मागे टाकले. गोष्ट इथेच थांबली नाही तर अहान पांडे आणि अनित पड्डा अभिनीत या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी २०२५ सालातल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० बॉलीवूड चित्रपटांमध्येही दमदार एन्ट्री घेतली आहे. ‘सैयारा’ चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी देखील चांगली कमाई केली आहे. (Todays Marathi Headline)
सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सैयारा’ या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच, सोमवारी १८.५७ कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह, ‘सैयारा’ची चार दिवसांत एकूण कमाई आता १०१.८२ कोटी रुपये झाली आहे. अर्थात सिनेमाने चारच दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट बनला आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, ‘सैयारा’ सिनेमाचे बजेट ४५ कोटींचे आहे आणि या सिनेमाने प्रदर्शनानंतर केवळ चारच दिवसांत आपल्या बजेटच्या दुप्पट कमाई करुन इतिहास रचला आहे. त्यामुळे रिलीजच्या चौथ्या दिवशीच ‘सैयारा’ने हिट फिल्मचा टॅग मिळवला आहे. (Celebrity News)
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असलेली पाहायला मिळते. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या ‘सैयारा’ चित्रपटातून पदार्पण केलं आहे आणि त्यांच्या दोघांच्याही अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून येत आहे, विशेषतः तरुणांमध्ये हा चित्रपट जास्त पसंत केला जात आहे. असे असले तरी अनेक जणं आता इंटरनेटवर ‘सैयारा’ या शब्दाचा अर्थ देखील शोधताना दिसत आहे. बऱ्याच लोकांनी या सिनेमाच्या निमित्तानेच हा शब्द पहिल्यांदा ऐकला आहे. त्यामुळे या शब्दाचा नक्की अर्थ काय? (Latest Marathi News)
‘सैयारा’ हा मूळ शब्द उर्दू आणि अरबी भाषेतला आहे. या शब्दाचा अर्थ आकाशात फिरणारा तारा किंवा खगोलीय पिंड असा होतो. उर्दू भाषेत, ‘सैयारा’ हा शब्द सामान्यतः आकाशात फिरणाऱ्या ग्रह किंवा ताऱ्यांसाठी वापरला जातो. तर अरबी भाषेत ‘सैयारा’चा अर्थ सतत फिरतीवर असणारा किंवा निरंतर चालत राहणारा व्यक्ती असा होतो. याशिवाय, प्रेमात पडलेल्या एकाकी व्यक्तीला देखील ‘सैयारा’ असेच संबोधले जाते. ‘सैयारा’च्या ट्रेलरमध्ये देखील या शब्दाचा अर्थ सांगण्यात आला आहे. ट्रेलरच्या एका दृश्यात, अनीत पड्डा अहान पांडेला सैयरा या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना दिसत आहे. (Bollywood News)
============
हे देखील वाचा :
Uttar Pradesh : बाजीराव पेशवे, १८५७ चा उठाव आणि युपीमधलं मराठी गाव….
Maya Dolas लोखंडवाला शूटआउट आणि खरं सत्य!
=============
कोणत्याही विशेष प्रमोशनशिवाय ‘सैयारा’ हा चित्रपट थेट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा हा फंडा कामी आला आहे. जिथे आजकाल चित्रपटांच्या प्रमोशनवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तिथे या सिनेमाने प्रमोशनवर काहीही विशेष खर्च केला नाही. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकच त्याचं प्रमोशन करत आहेत. दरम्यान ‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला याच दिवशी अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ आणि सोनाक्षी सिन्हाचा ‘निकिता रॉय’ हे दोन चित्रपट देखील प्रदर्शित झाले. मात्र या सर्व चित्रपटांना मागे टाकत, सैयारा प्रेक्षकांचा आवडता चित्रपट बनला आणि कमाईच्या बाबतीतही त्याने त्यांना मागे टाकले आहे. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics