गरोदरपणात महिला शारीरिक आणि मानसिक बदल अनुभवत असतात. बाळाला जन्म दिल्यानंतर सुटलेलं पोट आणि बेढप झालेलं शरीर यांपासून सुटका कशी मिळवायची हा अनेक महिलांसाठी मोठा प्रश्न असतो. त्यात स्वत:च्या फिटनेसने आपल्याला हैराण करुन सोडतात ते आपले सेलेब्रिटीज! आपण कितीही घाम गाळला, जीभेचे चोचले बाजूला सारले, तरी प्रसुतीनंतर फिगर ‘बॅक टू नॉर्मल’ व्हायला बराच वेळ जातो. साधारण किमान एक वर्ष तरी. पण आपल्या सेलेब ‘मॉमिज’ मात्र डिलिव्हरीनंतर महिन्याभरात ‘बॅक टू नॉर्मल साईज’ झालेल्या दिसतात. मग त्या होऊ शकतात, तर आपण का नाही? त्यांचं अगदी सहज वजन कमी करण्याचं सिक्रेट (weight loss secret) नक्की काय आहे?
आपणही बाळंतपणानंतर आपली फिगर पुन्हा आधीसारखी करु शकतो, तेही आपली आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेऊन आणि तब्बेतीला जपून. यासाठी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अनुष्का शर्माचा फिटनेस मंत्रा (weight loss secret).
अनुष्का शर्मा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. वामिकाला जन्म दिल्यानंतर महिन्याभरातच तिने तिची फिगर पुन्हा मिळवली आणि चाहत्यांना आश्चर्यचकीत केलं. अनुष्कानं काय रुटिन फॉलो केलं ज्यामुळे इतक्या कमी वेळात तिनं फॅट लॉस केला?
‘द हेल्थ साईट’ या प्लॅटफॉर्मला दिलेल्या माहितीत अनुष्काची न्यूट्रिशन म्हणाली, ‘प्रेगनंन्सीनंतर आपल्या शरीरात काय आणि कसा बदल झालाय हे समजून घेऊन आपला वेटलॉस प्लॅन आखावा. प्रेगनंन्सीनंतर हेल्दी आणि संतुतिल आहार घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवत, स्तनपान करताना कोणत्या कॅलरीजची शरीराला आवश्यकता आहे आणि कोणत्या कॅलरीज टाळायला हव्या हे ठरवायला हवं. स्तनपान करतोय हे लक्षात घेऊन आपल्या आहारात वजन कमी करण्याच्या दृष्टीने पोषक तत्वांचा समावेश करायला हवा. प्रेगनंन्सीनंतर वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि हेल्दी आहार यांची सांगड घालणे हा उत्तम मंत्र आहे.”
प्रेगनंन्सीनंतर सुटलेलं पोट एका रात्रीतून गायब नाही होऊ शकत त्यासाठी संयम बाळगणं आवश्यक आहे. काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमचं सुटलेलं पोट कमी करु शकता (weight loss secret).
====
हे देखील वाचा: ऑस्करचे नामांकन मिळालेला हा माहितीपट नक्की कशावर आधारित आहे?
====
- दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करा. यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स आणि कॅल्शिअम मिळेल.
- जिरे, तिळ यांचा शक्य तितका जास्त वापर करा.
- आहारातले फॅट्स कमी करा. योग्य वेळी जिम लावा आणि हलके व्यायाम करा.
- सकारात्मक राहा. कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नका. टेन्शनमुळे अनेक महिलांचं वजन आणखी वाढतं.
- मालिश करा. मालिश केल्याने पोटावरची चरबी कमी होते.
- ग्रीन टी प्या. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स मेटाबॉलिझम सुधारायला मदत करतात.
- डिलिव्हरीनंतर पोटाची चरबी कमी करण्याचा सर्वात प्रभावशाली मार्ग आहे टोमॅटो! टोमॅटो रक्तातील साखर संतुलित राखायला मदत करतात. त्यामुळे सतत लागणारी भूक नियंत्रित राहते.
- रोज सकाळी उपाशी पोटी दोन ते चार लसणाच्या पाकळ्या चावल्याने सुद्धा पोटाची चरबी कमी होते.
====
हे देखील वाचा: द ग्रेट इंडियन किचन’ फेम निमिषा सजयन करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
====
टीप : ही प्राथमिक माहिती आहे. कोणत्याही गोष्टींचा प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.
– वेदश्री ताम्हणे