अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प सध्या चर्चेत आल्या आहेत. सोशल मिडियावर मेलानिया यांच्यावर युक्रेनची एजंट, म्हणजेच गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मेलानिया यांच्यावर युक्रेनची साथीदार म्हणून मीम्सही शेअर होत आहेत. याला कारण ठरले आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे रशिया आणि पुतिनबाबतचे बदलते धोरण. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी युक्रेनला होणारा शस्त्रपुरवठा थांबवणार असल्याचेही सांगितले. पण काही काळानंतर ट्रम्प यांचे युक्रेनबाबतचे धोरण बदलले. यात मेलानियाचा वाटा असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. पुतिन यांच्याबद्दला दृष्टीकोन फर्स्ट लेडीमुळे बदलला असे ट्रम्पनी सांगितले आणि मेलानिया यांचा उल्लेख ट्रम्पेन्को असा होऊ लागला. वास्तविक मेलानियाच्या नावातील ‘अंको’ हा भाग प्रत्यक्षात युक्रेनियन आडनावाचा भाग आहे. याचा अर्थ वंशजाचा मुलगा असा होतो. (Melania Trump)
मेलानिया यांचा जन्म स्लोव्हेनियामध्ये झाला आहे. आजही त्या युरोपियन युनियनच्या नागरिक आहेत. त्यातून त्या कट्टर पुतिन विरोधी समजल्या जातात. या सर्वांचा परिणाम ट्रम्प यांच्या रशियानितीवर झाला असून ट्रम्प यांनी युक्रेनला मदत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच मेलानिया यांच्यावर युक्रेनची गुप्तहेर असल्याची टीका अमेरिकेच्या सोशल मिडियातून कऱण्यात येत आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला म्हणजेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प या चर्चेत आल्या आहेत. मेलानियामुळेच डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादेमिर पुतिन यांची मैत्री संपुष्टात आली, अशी चर्चा अमेरिकेत आहे. यासाठी सोशल मीडियामध्ये 2018 मधील एक व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. ट्रम्प यावेळी अमेरिकेचे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यावेळी ते आणि मेलानिया फिनलंडच्या दौऱ्यावर होते. येथेच त्यांची रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट झाली. (International News)
या भेटीदरम्यान मेलानिया या पुतिन यांच्याकडे रागानं बघतानाचा हा व्हिडिओ आहे. या सर्वामागे मेलानिया यांचे जन्मस्थान आहे. त्यांचा जन्म स्लोव्हेनियामध्ये झाला आहे. स्लोव्हेनियामधील नागरिक युक्रेनच्या पाठिशी कायम राहिले आहेत. स्लोव्हेनिया हा युगोस्लाव्हियाचा भाग होता. 1991 मध्ये स्लोव्हेनियाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले. मेलानियाचे बालपण कम्युनिस्ट राजवटीत गेले. रशियन दडपशाहीचा अनुभव त्यांनी घेतला आहे. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या मोठ्या आक्रमणानंतर, मेलानियाने तिच्या सोशल मीडियावरुन युक्रेनसाठी फंड गोळा करण्याचे कामही केले आहे. युक्रेनियन लोकांना होत असलेला त्रास पाहणे हे हृदयद्रावक आणि भयानक असल्याचे त्यांनी आपल्या मेसेजमध्ये सांगितले आहे. मेलानिया ट्रम्प अजूनही युरोपियन युनियनच्या नागरिक आहेत. त्या इंग्रजी ऐवजी स्लोव्हेनियन भाषा व्यवहारात वापरतात. या सर्वातून मेलानिया यांचा युक्रेनला मोठा पाठिंबा असल्याचे उघड होते. (Melania Trump)
ट्रम्प जेव्हा दुस-यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करणार अशी घोषणा केली. तेव्हा ट्रम्प रशियाच्या बाजुने असल्याचे जाहीर दिसत होते. ट्रम्प नेहमी पुतिन यांचा, आपला मित्र, असा उल्लेख करत असत. पुतिन यांना खूश करण्यासाठीच ट्रम्पनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमध्ये बोलावून त्यांचा अपमान केला, असे सांगण्यात येते. मात्र या घटनेनंतर ट्रम्प, झेलेन्स्की प्रती मवाळ झाल्याचे दिसले. त्यांनी दुस-यांचा झेलेन्स्कींची भेट घेतली आणि युक्रेनला शस्त्रसाठा देण्यात येऊ लागला. शिवाय राजनैतिक पाठिंबा आणि आर्थिक मदतही दिली. (International News)
=============
हे देखील वाचा : Britain : ब्रिटनचे आई-वडिल गुन्हेगारांच्या नावाच्या प्रेमात !
=============
अलिकडील काही दिवसात ट्रम्प यांनी पुतिन यांना युद्ध थांबवण्यासाठी मुदत दिली आहे, अन्यथा रशियन वस्तूंवर अधिक कर लावण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या या बदललेल्या भुमिकेमागे मेलानिया ट्रम्प असल्याचे सांगितले जाते. मेलानिया यांनी पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यावर अनेकवेळा सार्वजनिकपणे टीका केली आहे. मेलानिया फर्स्ट लेडीच्या भूमिकेतून राष्ट्रपतींच्या परराष्ट्र धोरण सल्लागारांसोबत अनेक बैठका करतात. यात त्यांनी, अमेरिका स्वतःला लोकशाही देशांचा नेता मानत असेल तर अमेरिकेनं युक्रेनसारख्या असहाय्य देशांचे संरक्षण करावे, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. मेलानिया यांच्या या ठाम भूमिकेमुळेच युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्र अमेरिकेने दिली असून यानंतर लांब पल्ल्याच्या टॉम हॉक क्षेपणास्त्रांचा पुरवठा देखील होणार आहे. यामुळेच मेलानिया यांच्यावर युक्रेनची गुप्तहेर म्हणून आरोप करण्यात येत आहेत. (Melania Trump)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics