पावसाळा सुरु झाला की, त्यापाठोपाठ लगेच सणवार येतात. शिवाय विविध छोटे मोठे कार्यक्रम देखील या काळात प्रत्येकाच्याच घरी होत असतात. आता कार्यक्रम आणि सणवार म्हटले की, नटणे मुरडणे आलेच. छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील मेकअप करण्याची आवड महिलांना असतेच. मेकअपशिवाय राहणे कोणालाच पसंत नसते. मात्र पावसाळ्यात अनेक महिलांचा मेकअप जास्त काळ टिकत नाही. त्यासाठी त्यांना सतत टच अप करावा लागतो. मात्र आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात देखील तुम्ही तुमचा मेकअप जास्त काळ कसा टिकवू शकता यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. (Marathi NEws)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेकअप केल्यानंतर तो लगेच खराब होतो. याचे कारण म्हणजे या काळात वातावरणात आद्रता मोठ्या प्रमाणावर असते. याच आद्रतेचा परिणाम आपल्या मेकअपवर होतो. त्यासाठी पावसाळ्यात मेकअप करणे खूपच आव्हानात्मक असते. ऑफिसला जाताना किंवा पावसाळ्यात फिरताना ओले होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र ओले झाल्यानंतर मेकअप लगेच निघून जातो. पावसाळ्यात मेकअप नीट केला नाही तर तुमचा लूक बिघडू शकतो. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात मेकअप कडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. (Beauty Tips)
पावसाळ्यात मेकअप टिकण्यासाठी टिप्स
> पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील अद्र्तेचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्वचा लगेच तेलकट होते. त्यामुळे मेकअप केल्यानंतर तो लगेच त्वचेला चिकटतो. त्यामुळे मेकअप करताना जास्त प्रमाणात मेकअप लिक्विड आणि क्रीम लावू नये.
> जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर फाउंडेशन लावण्यापूर्वी, मेकअपला टचअप देण्यासाठी अॅस्ट्रिंजंट लोशन किंवा पावडरचा वापर करा. यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकेल. पाण्यात जरी भिजले तरी चेहऱ्याला नुकसान होणार नाही. (Todays Marathi Headline)
> मेकअप करण्याआधी हात नेहमी स्वच्छ धुवावेत. चेहरा देखील क्लिंजरने स्वच्छ करावा. या ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो. त्यामुळे त्वचेला संसर्ग होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे हेवी मेकअप करणे टाळा.
> कमी प्रमाणात क्रीम घेऊन संपूर्ण त्वचेला लावावी. पावसाळ्यामध्ये क्रीम प्रॉडक्ट न वापरता पावडर बेस प्रॉडक्ट वापरावे. पावसाळ्यात मेकअप करताना फाउंडेशन वापरू नये.
> पावसाळ्यात आपला मेकअप जास्त टिकावा यासाठी सेटिंग पावडरचा वापर करा. एक चांगली सेटिंग पावडर वापरून तुमचा मेकअप सेट करा. यामुळे मेकअप जासत काळ टिकून राहतो. सेटिंग पावडर लावण्यासाठी मोठ्या ब्रशचा वापर करावा. (Top Marathi News )
> पावसाळ्यात मेकअप करताना फाउंडेशन वापरू नये. फाउंडेशन ऐवजी कन्सीलर वापरावे.
> मेकअप करताना सगळ्यात आधी प्रायमर लावावे. त्यानंतर कन्सीलर लावून सगळीकडे पसरवून घ्यावे. मेकअप पूर्ण करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी सेटिंग स्प्रे मारून मेकअप सेट करावा. जेणेकरून मेकअप जास्त वेळ टिकून राहील. (Top Trending News)
> मान्सूनमध्ये बोल्ड लिप कलर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमचा मेकअप उठून दिसेल. आजकाल बाजारात अनेक वॉटर प्रूफ लिपस्टीक्स सहज उपलब्ध होतात.
> पावसाळा या ऋतूमध्ये जड आणि क्रिमी फाउंडेशन वापरल्याने चेहऱ्याला अधिक घाम येऊ लागतो त्यामुळे त्वचा चिकट होते. यासाठी वॉटर-बेस्ड किंवा मॅट फिनिशसह हलके फाउंडेशनचा वापर करा. दमट हवामानात बीबी क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर वापरणे फायदेशीर ठरू शकते. (Marathi Latest News)
> डोळ्यांच्या आणि ओठांच्या मेकअपसाठी वॉटरप्रूफ आयलाइनर, लिपस्टिक आणि मस्कारा वापरा. यामुळे घाम किंवा पावसामुळे मेकअप त्वचेवर पसरणार नाही.
> पावसाळ्यात त्वचेवर चिकटपणा येतो त्यामुळे मेकअप त्वचेवर राहत नाही. मेकअप करण्यापूर्वी, बर्फाच्या तुकड्याने १५ मिनिटे आपल्या चेहऱ्याचे मसाज करा. असे केल्याने त्वचा थंड राहते आणि मेकअप केल्यानंतर बराच काळ टिकतो. (Social News)
==========
हे देखील वाचा : Health : छातीत कफ साठल्यामुळे त्रास होतो? ‘हे’ उपाय करा आणि आराम मिळवा
Coconut Water : आरोग्याच्या दृष्टीने अमृतासमान आहे नारळ पाणी
============
> आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर जास्त घाम येतो आणि मस्करा किंवा लाइनर निघून जाते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही काजळ पेन्सिल वापरा. काजळ पेन्सिलने तुम्ही लाइनर लावू शकता आणि आयब्रो देखील करू शकता. (Top Stories)
> -लूज पावडरऐवजी, कॉम्पॅक्ट पावडर जास्त काळ टिकते आणि गुळगुळीत फिनिश देते. मेकअपला टचअप देण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर वापरा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics