Home » Health : छातीत कफ साठल्यामुळे त्रास होतो? ‘हे’ उपाय करा आणि आराम मिळवा

Health : छातीत कफ साठल्यामुळे त्रास होतो? ‘हे’ उपाय करा आणि आराम मिळवा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी झालेली असते. त्यामुळे या दिवसांमध्ये विविध आजार होण्याची दात शक्यता असते. असे असले तरी पावसाळ्यात अतिशय सामान्य आणि सर्रास होणार आजार म्हणजे, सर्दी आणि खोकला. वातावरणात थंडावा वाढला की, लगेच सर्दी आणि खोकला होण्यास सुरुवात होते. हा आजार जरी किरकोळ असला तरी खूपच त्रासदायक असतो. काहींना तर सर्दी आणि खोकल्यासोबतच कफाचा देखील मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. दमट वातावरणामुळे कफ वाढतच जातो आणि त्याचे मोठे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात. (Marathi News)

बऱ्याच वेळा खोकला जाऊनही छातीत कफ अडकतो, ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि उरलेल्या कफामुळे अस्वस्थता जाणवते. कफ निघून जाणे हे श्वसनसंस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण कफामुळे छातीत जडपणा येतो आणि श्वासाची गुणवत्ता कमी होते. पचनसंस्थेवर याचा परिणाम होत असतो. त्यामुळे ही समस्या कायम राहिल्यास स्थिती गंभीर देखील होऊ शकते. कफामुळे अनेकदा छातीतून एक विचित्र घरघर आवाज येतो. हा घरघर आवाज वायुमार्ग अरुंद झाल्यामुळे होतो. (Todays Marathi Headline)

या कफाचा त्रास फक्त मोठ्यांना होतो असे नाही, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कफाच्या समस्येला सामोरे जावे लागते. रात्री या कफामुळे नीट झोप देखील लागत नाही. अस्वस्थता जाणवते. काहींच्या बाबतीत तर डॉक्टरांची औषधं देखील उपयोगी ठरत नाही. अशावेळी कफासाठी घरगुती उपचार देखील लाभदायक ठरतात. सोपे आणि साधे काही घरगुती उपचार आज आपण जाणून घेऊ, जे करून नक्कीच तुम्ही कफापासून मुक्ती मिळवू शकता.

हळदीचे गरम दूध
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे कफ काढून टाकण्यास लाभदायक ठरतात. त्यामुळे गरम दूध आणि हळदीच्या सेवनाने शरीरातील कफ लवकर मोकळा होतो. हळद श्वसन नलिकांना स्वच्छ करण्यास फायदेशीर ठरते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास हळदीचे दूध घेतल्यास लवकर आराम मिळतो. (Health Care News)

Health

मध आणि आल्याचा रस
मध आणि आलं हे दोन्ही गोठी कफ दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. आलं खाल्ल्यामुळे कफ विरघळतो, तर मधामुळे छातीत साठलेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. यासाठी एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून त्याचे सेवन केल्यास छाती मोकळी होते. (Marathi Latest News)

त्रिफळा चूर्ण
कफाची समस्या दूर करण्यासाठी त्रिफळाचे चूर्ण सेवन करा. हे चूर्ण म्हणजे तीन आयुर्वेदिक फळांची पावडर आहे जे तीव्र कफाची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. हे त्रिफळा चूर्ण रोज कोमट पाण्यासोबत घेतल्यास लवकर आराम मिळतो.

पपईचे सेवन
कफापासून सुटका होण्यासाठी पिकलेल्या पपईचा आहारात समावेश करा. रोज थोडीशी पपई खाल्ल्याने अनेक पोषक तत्वे शरीराला मिळतात. शिवाय पपई ल्यूब्रिकेंट म्हणूनही काम करते, ज्यामुळे कफापासून सुटका होण्यास मदत होते. (Latest Marathi Headline)

काळी मिरी आणि मध
काळी मिरी मधात मिसळून या मिश्रणाचे सेवन केल्यास सर्दी, घसा खवखवणे, सूज आणि कफ यापासून सुटका मिळण्यास खूप फायदा होतो. १, २ चमचे मध घेऊन त्यात चिमूटभर काळी मिरी मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा हे चाटण घ्यावे. यामुळे कफामध्ये आराम मिळतो. (Marathi Top Headline)

तुळस आणि आल्याचा चहा
तुळस आणि आलं यामध्ये दाहक-विरोधी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल हे गुणधर्म असतात. तुळस आणि आल्याचा चहा प्यायल्याने सर्दी, खोकला इत्यादीपासून खूप आराम मिळतो आणि कफ सहज बाहेर पडतो. (Social Updates)

==========

हे देखील वाचा :  Coconut Water : आरोग्याच्या दृष्टीने अमृतासमान आहे नारळ पाणी

============

लिंबाचा रस आणि मध
लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण छातीतील कफ दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. याच्या सेवनाने खोकल्यापासून आराम मिळण्यासोबतच छातीची सूज कमी होण्यास मदत होते. यामुळे घशाला आरामही मिळतो. (Top Stories)

पुदीना तेल टाकून वाफ
गरम पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे २-३ थेंब टाकून वाफ घेतल्यास छातीत जमा झालेला कफ निघून जातो. दिवसातून २-३ वेळा वाफ घेऊ शकता, यामुळे नक्कीच आराम मिळेल. याशिवाय गरम पाण्यात लसणाच्या पाकळ्या टाकून वाफ घेतल्यास देखील कफामध्ये फायदा होतो. (Marathi Top Stories)

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.