पुलिस आयेंगा ना, बत्ती लगा के, तो बोलने का माया भाई आया था! समझा! हा डायलॉग ऐकल्यावर नक्कीच ती फिल्म आठवेल किंवा तो खरा प्रसंग. मुंबईतला कुख्यात गुंड, ज्याची पाॅप्युलॅरिटी आजही कमी झाली नाही, ज्याने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी अंडरवर्ल्डमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. त्याच्यावर शूटआऊट ॲट लोखंडवाला नावाची फिल्मदेखील आली होती आणि विवेक ओबेरॉईमुळे जे नाव भरपूर चर्चेत आलं, ते नाव म्हणजे ‘माया डोळस.’ … खरं नाव महेंद्र डोळस. पण एकदा त्याच्या आईने त्याला भंकसमध्ये माया म्हणून हाक मारली आणि नंतर महेंद्रचा ‘माया भाई’ झाला. शूटआउट ॲट लोखंडवाला बऱ्याच लोकांनी पाहिला, फिल्मला चांगली पाॅप्युलॅरिटी मिळाली, विवेक ओबेरॉयच्या त्या कामाचं आजही कौतुक होतं, पण एक गोष्ट ऐकून नक्कीच धक्का बसेल की, या फिल्ममध्ये बऱ्याच गोष्टी दाखवल्याच गेल्या नव्हत्या, तर काही चुकीच्या दाखवल्या गेल्या. माया डोळसबद्दल आणि त्या लोखंडवाला शूटआउटच्या दिवशी एक्स्जॅक्ट काय घडलं.. हे जाणून घेऊ. (Maya Dolas)
माया डोळस हा काही छोटा डॉन नव्हता, त्याने असे काही कांड केले की, त्या काळात मोठ्यातला मोठा डॉन देखील असं काही करण्यापूर्वी थरथरायचा. त्याचे कारनामेच असे होते की, त्याच्या आयुष्यावर फिल्म बनवली गेली. शूटआउट ॲट लोखंडवाला ही फिल्म २००७ मध्ये अपूर्व लाखियायाने डायरेक्ट केली होती. माया हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा नव्हता. माया हा त्याचे वडील विठोबा डोळस आणि आई रत्न प्रभा यांच्या सहा मुलांपैकी एक होता. कदाचित ही गोष्ट फिल्ममध्ये दाखवली नाही. आणखी एक असंही वाटेलंं की, माया शिकलेला नव्हता, पण त्याने आपलं शिक्षण मुंबईच्या आयटीआय कॉलेजमधून पूर्ण केलं होतं. शिक्षणात तसं पाहायला गेलं तर तो ठीकठाकच होता.
वयाच्या २२ व्या वर्षीच तो अशोक जोशीच्या गँगमध्ये सामील झाला होता. तो जोशी, अरुण गवळी आणि रमा नाईक यांच्यासाठी काम करायचा. आता भायखळा कंपनी हे नाव ऐकलंच असेल, ही गँग १९८० आणि १९९० दशकात अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होती. मायाने आपल्या जीवावर मुंबईवर आपली छाप पाडली. माया तसा सनकी डोक्याचा आणि बिंधास, त्याने जोशी गॅंगमध्ये आपली मजबूत पकड बनवली आणि तो जोशी गॅंगचा टॉपचा शूटर बनला. तो जोशी गँगसाठी खंडणीचं रॅकेट चालवायचा. असं म्हणतात, दाऊद गँग आणि अशोक गँग यांच्यात वाद झाला, तेव्हा दाऊद इब्राहीमच्या ऑर्डरनुसार छोटा राजनच्या अन्डर हीट स्क्वॉडने ३ डिसेंबर १९८८ला पनवेलजवळ अशोक जोशीला ठार मारलं. पण त्यांनी अशोकच्या सगळ्याच मुलांना मारलं नव्हतं. त्यापैकी एक होता माया. (Maya Dolas)
माया या गँग वॉरमध्ये बचावला होता, यामध्ये अजून एक जण होता तो म्हणजे शार्प शुटर दिलीप बुवा. इतकंच काय, तर त्यानंतर छोटा राजनने माया आणि दिलीप बुवाला डी कंपनीमध्ये सामील करून घेतलं, कारण त्यांनी माया आणि त्याच्या कारनाम्यांचे किस्से ऐकले होते. त्यामुळे ते खूप आधीपासून मायाला आपल्या गॅंगचा हिस्सा बनवू इच्छित होते आणि अशा प्रकारे माया डी कंपनीसाठी काम करू लागला. दाऊदबरोबर काम करताना मुंबईत मायाचं नाणं आणखी खणखणीत वाजायला लागलं. खरं तर तो दाऊदसाठी काम तर करायचा, पण त्याची आपलीच मर्जी चालवायचा. तो आपल्या मर्जीने बिल्डरांना धमकवायचा, त्यांच्याकडून खंडणी वसूल करायचा.
मायाबद्दल असं सांगितलं जातं की, त्याला कोणाच्या अंडर काम करायला आवडायचं नाही. तो दाऊद सारख्या मोठ्या डॉनच्या विरोधात जाऊन बिल्डरकडून पुन्हा हप्ता वसूल करायचा. मायाच्या या कारनाम्यामुळे दाऊदच्या डोक्यात खुपायला लागला होता. असं म्हणतात, मायाचा एंकाऊंटरच्या मागे दाऊदचा हात होता.(Top Stories)
साल १९९१, गुन्हेगारी प्रचंड वाढली होती. मुंबई पोलीस लाजिरवाण्या परिस्थितीतून जात होते. त्यातच १६ नोव्हेंबरची सकाळची वेळ होती. १०.४५ वाजले होते. बांद्र्याच्या कार्टर रोडवर पोलिस कमिशनर ए.ए. खान यांच्या ऑफिसमध्ये अँटी-टेररिझम स्क्वॉड (एटीएस) चे मेंबर थोड्या वेळानंतर होणाऱ्या मोठ्या ऑपरेशनची तयारी करत होते. इन्स्पेक्टर एम.ए. कवी, प्रमोद राणे, अंबादास पोते, सब-इन्स्पेक्टर झुंझारराव घरल, सुनील देशमुख, जगदाळे, इकबाल शेख, राजा मांडगे आणि लोकल आर्म्स डिव्हिजनचे सात कॉन्स्टेबल पुढच्या कारवाईसाठी सज्ज होते. एका कॉन्स्टेबलला स्टोअर रूममधून बुलेटप्रूफ जॅकेट्स आणायला सांगितलं गेलं.(Maya Dolas)
तो परत येऊन म्हणाला, “साहेब, तिथे टाळं आहे आणि चावीवाला कॉन्स्टेबल अजून आलाच नाही.” मग एका इन्स्पेक्टरने त्याला टाळं तोडून जॅकेट्स काढायला सांगितलं. तिथे आठ ऑफिसर आणि फक्त पाच बुलेटप्रूफ जॅकेट्स त्यांना मिळाली. जॅकेट्स वाटले गेले तेव्हा इकबाल शेख आणि घरल यांनी त्यांना जॅकेट नको सांगितलं. मग हत्यारं घेऊन सगळे निघाले. सकाळचे ११.३० वाजले होते. तेव्हा इन्स्पेक्टर प्रमोद राणे म्हणाले, “चला, अंधेरी लोखंडवाला जाऊया. टेलिफोन नंबर मिळालाय!” आणि सगळे अंधेरीच्या दिशेने निघाले. त्यांना आधीच टीप मिळाली होती की, माया मुंबईच्या लोखंडवाला येथील स्वाती बिल्डिंगच्या फ्लॅट नंबर पाचमध्ये आहे.(Top Stories)
मायाबरोबर दिलीप बुआ आणि बाकी मेंबर्ससुद्धा त्या फ्लॅटमध्ये होते. आता बाकी मेम्बर्स नक्की कोण… तर आपल्याला मुव्हीमधले character माहितच असतील, फट्टू, आरसी, डब्लिंग वगैरे वगैरे… पण त्यांच्या खऱ्या gang मध्ये होते… माया डोळस, दिलीप बुवा, गोपाल पुजारी, राजू नाडकर्णी, अनिल पवार आणि अनिल खुबचंदानी… अस्लम कसाई आधीच मारला गेला होता. तर मायाची एका बिल्डरबरोबर मीटिंग होती, ज्याला मायाने खंडणीसाठी धमकावलं होतं. त्याचसाठी ते सगळे त्या फ्लॅटमध्ये होते. पोलिस तिथे पोहोचले. फ्लॅटबाहेर दोन मारुती एस्टिम गाड्या उभ्या होत्या. सगळ्यांना माहीत होतं की, दिलीप बुवा पांढरी मारुती एस्टिम चालवतो. पोलिसांना माहित होतं की, तो गाडीची चावी इग्निशनमध्येच ठेवायचा, म्हणजे गरज पडली तर तो लगेच पळू शकतो.
इन्स्पेक्टर कवी यांनी त्या ठिकाणाचा नकाशा बनवला होता. रूम नंबर ५ हा एकमेव फ्लॅट होता ज्याला दोन दरवाजे होते. म्हणून मग काही पोलिस दोन भागात डिवाईड झाले. साऊथ साइडच्या दाराच्या बाजूने कवी, घरल आणि देशमुख यांनी जायचं ठरवलं आणि नॉर्थ साइडच्या दरवाज्याच्या दिशेने राणे, मांडगे आणि शेख निघाले. बाकी कॉन्स्टेबल आणि ऑफिसर कॉम्प्लेक्सच्या बाहेर तैनात होते. सगळ्यांनी आपापली जागा घेतली. कवी आपल्या टीमसह आत घुसले. शेख उत्तरेकडच्या दरवाज्याला कान लावून ऐकत होते आणि मग गोळी झाडण्याचा आवाज आला आणि सुरुवात झाली लोखंडवाला शूटआउटची.(Maya Dolas)
============
हे देखील वाचा : Mills to Mafia : म्हणून गिरणी कामगारांच्या मुलांनी अंडरवर्ल्डचा रस्ता धरला!
============
कवी, घरल आणि देशमुख आत घुसले. दिलीप बुवा टेबलावर रिव्हॉल्व्हर ठेवून खुर्चीवर बसला होता. त्याने तिघांना बघितलं, हत्यार उचललं आणि गोळ्या झाडायला सुरुवात केली. ते त्यांच्या यूनिफाॅर्ममध्ये नव्हते म्हणून बुवाला वाटलं की, हे दुसऱ्या गँगचे लोक आहेत. पहिल्याच राऊंडमध्ये घरल यांच्या छातीत गोळी लागली. त्यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घातलं नव्हतं. कवी यांच्या हाताला जखम झाली, पण जॅकेटमुळे ते वाचले. देशमुख आणि कवी या दोघांनी कसंबसं घरल यांना ओढत मागे सरकत गोळ्या झाडल्या. बाहेरच्या सगळ्या वायरलेस युनिट्स ॲक्टिव्हेट झाल्या. पण याआधी कधीच कोण्याच गँगस्टरने जाणूनबुजून पोलिसांवर गोळी झाडली नव्हती. ही पहिलीच वेळ होती आणि हा असा अपमान होता जो पोलिसांना सहन होणार नव्हता. त्यांनी शपथ घेतली की गँगस्टर्सला जिवंत बाहेर पडू द्यायचं नाही.
१.३५ वाजले, पोलिसांची दोन माणसं जखमी झाली होती आणि आता ते कोणताच धोका पत्करणार नव्हते. या दरम्यान कवींच्या टीमचं लक्ष एका महत्त्वाच्या गोष्टीवर गेलं. त्यांनी बुवाच्या फ्लॅटमध्ये माया डोलसला पाहिलं. आता आली गेम चेजिंग मुव्हमेंट. माया डोळस जो कधीकाळी एक सामान्य गुंड होता, पण याच वर्षी १४ऑगस्टला तो पोलिस कोठडीतून पळाला आणि त्याने लक्ष वेधलं. त्याने माझगाव कोर्टातून पळण्यासाठी एका कॉन्स्टेबलवर हल्ला केला होता. अलीकडे दाऊद इब्राहिमशी त्याचे संबंध वाढत असल्याच्या बातम्या येत होत्या. बुवा आणि माया डोळस सोबत पोलिसांनी फ्लॅटमध्ये इतरांनाही पाहिलं होतं.(Top Stories)
खान यांनी लाउडस्पीकरवरून गँगस्टर्सना अनाऊन्समेंट दिली की, ते घेरले गेलेत आणि त्यांनी ताबडतोब सरेनडर व्हा. तेवढ्यात दिलीप बुवा रूममधल्या त्या अन्नोन व्यक्तीसोबत साऊथ साइडच्या दरवाज्यातून पळत, अंधाधुंद गोळ्या झाडत आपल्या एस्टिमकडे धावला. पण तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. पोलिसांनी एकाच वेळी सगळ्या बाजुने त्याच्यावर गोळीबार केला आणि बुवा आणि तो अन्नोन माणूस जागीच ठार झाला. आता माया डोळस आणि त्याचे पंटर ऊरले होते. तोवर १.४० वाजले होते. आता दोन विंग्जना जोडणाऱ्या बिल्डिंगच्या छतावर कारवाई सुरू होती. पोलिसांचं एक युनिट बी विंगच्या छतावरून ए विंगच्या छतावर पोहोचलं. ते छतावर पोहोचले आणि त्यांना गोपाल पुजारी आणि राजू नाडकर्णी पायऱ्या चढताना दिसले. पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. राजू नाडकर्णी सेकंड फ्लोरला आणि गोपाल पुजारी फर्स्ट फ्लोरला ठार झाले. (Maya Dolas)
आता माया आणि पवार बाकी होते. अनिल खूबचंदानीचा काही पत्ता नव्हता. या दरम्यान खान सतत सरेनडर करा अशी मागणी करत होते आणि तुम्ही जिवंत बाहेर पडू शकत नाही, असं सांगत होते. पण जसं फिल्म मध्ये दाखवलं तसं एक्जॅक्ट घडलं नाही. आता माया आणि पवार पायऱ्यांच्या दरवाज्यातून बाहेर आले. पण ते सरेनडरचा विचाराने नव्हते आले, तर हातात एके-47 रायफल्स होत्या. पोलिसांनी ताबडतोब गोळीबार सुरू केला आणि १६ नोव्हेंबरला दुपारी जवळपास ४.३० वाजता माया आणि पवार पोलिसांच्या गोळ्यांनी ठार झाले. (Top Stories)
असं सांगितलं जातं की एकट्या मायाच्या शरीरात ८०-९० गोळ्या घुसल्या होत्या. हा शूटआउट तब्बल चार तास सुरू होता. ज्यात २५००पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या गेल्या आणि हा शूटआउट पहिल्यांदा न्यूजचॅनलवले तेव्हा लाइव दाखवत होते. त्यानंतर पोलिस धडाधड फ्लॅट नं. ५ मध्ये घुसले. त्यांनी पाहिलं की, फ्लॅट उद्ध्वस्त झाला आहे आणि सगळीकडे गोळ्यांचा खुणा आहेत. टीव्ही स्क्रीनचे तुकडे पडले होते. त्यातच रक्ताच्या थारोळ्यात अनिल खूबचंदानी मेला होता आणि गुरुच्या कपाळातून गोळी आरपार गेली होती.
===============
हे देखील वाचा : Jai Singh : मुघलांचे मन जिंकणारा जयसिंह, पण औरंगजेबाचा रोष ओढवून घेणारा राजा
===============
घरल यांना खानच्या गाडीतून हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ते वाचले. कवी यांच्या जखमाही बऱ्या झाल्या. डी.एन. नगर पोलिस ठाण्यात सब-इन्स्पेक्टर सुनील देशमुख यांनी तक्रार नोंदवली. तक्रारीत मेलेल्या गुन्हेगारांवर बेकायदा टोळी, धोकादायक हत्यारांचा वापर, पोलिस आणि इतर लोकांवर हल्ल्याचा प्रयत्न आणि सार्वजनिक सेवकांच्या कर्तव्यात अडथळा आणण्याचे आरोप लावले गेले. त्या अन्नोन व्यक्तीची ओळख नंतर विजय चकोर अशी पटली, जो येरवडा जेलमधला २८ वर्षांचा कॉन्स्टेबल होता. पण तो तिथे का होता, हे कधीच कळलं नाही, पण असा अंदाज लावला गेला की, तो येरवडा जेलमधल्या एखाद्या गँगस्टरचा निरोप घेऊन आला असावा. पण या प्रकरणाची कधीच अशी चौकशी झाली नाही, त्यातून काहीच निष्कर्ष निघाले नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्काराची शिफारस करण्यात आली, पण ते पुरस्कार कधीच दिले गेले नाहीत.(Maya Dolas)
यांनंतर काही अफवा पसरायला लागल्या, काही चर्चा बाहेर यायला लागल्या. असं म्हणतात की, मायाला मारण्याची टिप दाऊद इब्राहिमने दिली होती आणि सोबत असंही सांगितलं जातं की, त्या वेळी दाऊदच्या सांगण्यावरूनच मुंबई पोलिसांनी हे शूटआउट केलं होतं. कारण त्या वेळी मायापेक्षा मोठे गँगस्टर मुंबईत राहून बेकायदेशीर कामं करत होते. पण माया एकमेव असा होता त्याने दाऊदच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दाऊदच्या सांगण्यावरून त्याचा एंकाऊंटर झाला. असंही म्हटलं जातं, एनकाउंटरनंतर अँटी टेररिस्ट स्क्वॉडला मायाकडे ७ लाखांची कॅश सापडली होती, तिचं नंतर काय झालं किंवा कॅश खरंच होती का? याचे पुरावे सापडले नाहीत. (Maya Dolas)
आणखी एक इंट्रेस्टिंग गोष्ट सांगायची झाली. दिलीप बुवा हा माया डोळसपेक्षा जास्त खतरनाक होता. तरी जास्त पोप्युलॅरिटी माया डोळसला मिळाली. खान स्वतः म्हणाले, पण माया डोळसची क्रेझ त्याच्या मृत्यूनंतरच जास्त वाढली. तर अशी होती शूटआउट ॲट लोखंडवालाची खरी कहाणी. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics